माझा लाडका भाऊ योजना २०२४ महाराष्ट्र राज्य |Maza Ladka Bhau Yojana :महाराष्ट्र राज्य सरकारने “माझी लाडकी बहिण” योजनेनंतर राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी एका खास योजनेची घोषणा केली आहे.या योजनेंतर्गत राज्यातील बेरोजगार तरुणांना दर महिन्याला जवळपास १००००/- रुपये इतकी आर्थिक सहायता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणारआहे.राज्यातील शेकडो बेरोजगार युवकांना बेरोजगारीतून मुक्त करण्यासाठी हा निर्णय शासनाने घेतला आहे.या योजनेंतर्गत राज्यातील सुशिक्षित तरुणांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार आर्थिक साहाय्य मिळणार आहे,हे आर्थिक साहाय्य ६ हजारापासून ते १० हजारापर्यंत दिले जाणार आहे.तर चला पाहूया काय आहे योजना आणि काय आहेत या योजनेचे फायदे.तुम्हाला जर या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही खाली दिलेल्या लेखामध्ये याची संपूर्ण माहिती जाणून घेऊन अर्ज करू शकता.तर चला पाहूया काय आहे नेमकी योजना.या आणि अश्याच योजनांची माहिती तुमच्या मोबाईलवर पाहिजे असल्यास आमच्या अधिकृत संकेतस्थळाला तुमच्या बुकमार्क मध्ये सेव करून ठेवा.
देशामध्ये युवकांची सर्वात मोठी समस्या म्हणजे आवश्यक शिक्षण घेतल्यानंतर मनासारखी न मिळणारी नोकरी.देशामध्ये बेरोजगारीचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.तरुणांच्या हाती रोजगार नसल्यामुळे तरुणांचे भविष्य हे धोक्यात येण्याची शक्यता आहे.महाराष्ट्र राज्य काय यासाठी अपवाद नाही आहे.देशाचा बेरोजगारीचा दर हा जून २०२४ च्या अहवालानुसार ९.१ % इतके होता तर महाराष्ट्र राज्याचा बेरोजगारीचा दर किंवा प्रमाण हे ३.१ % इतके आहे.बेरोजगारीचा हा दर चिंताजनक असून याचा दुष्परिणाम देश्याच्या प्रगतीवर सुद्धा होऊ शकतो.याचा विचार करून महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील १२ वी पास,आयटीआय,तसेच पदवीधर बेरोजगार तरुणांसाठी आर्थिक सहाय्य म्हणून एक उपक्रम चालू केला आहे.”माझा लाडका भाऊ योजना” हे या योजनेचे नाव असून या योजनेंतर्गत राज्यातील बेरोजगार तरुणांना औद्योगिक प्रशिक्षण तसेच दर महिन्याला ठराविक रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे.राज्यातील तरुणांना अश्याप्रकारे विद्यावेतन देऊन बेरोजगारी कमी करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे.राज्यातील १२ वी पास विध्यार्थ्यांना महिना ६००० रुपये,आयटीआय किंवा डिप्लोमा पास विध्यार्थ्यांना महिना ८००० रुपये तसेच पदवीधर तरुणांना दर महिना १२००० रुपये इतके विद्यावेतन दिले जाणार आहे.या योजनेसाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही तुम्ही या योजनेसाठी अर्ज हा घरबसल्या करू शकता.तर चला पाहू काय आहे योजना.
माझा लाडका भाऊ योजना थोडक्यात:
योजनेचे नाव | माझा लाडका भाऊ योजना २०२४ महाराष्ट्र राज्य |
सुरुवात कोणी केली | महाराष्ट्र राज्य |
कोणी घोषणा केली | अर्थ मंत्री मान.अजित पवार |
योजनेचा उद्देश | बेरोजगार तरुणांना औद्योगिक प्रशिक्षण तसेच अर्थसहाय्य. |
लाभ | १००००/- रुपया पर्यंत |
लाभार्थी | राज्यातील बेरोजगार युवक |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
अधिकृत संकेतस्थळ | 👉येथे क्लिक करा. |
योजनेची सुरुवात :
“माझा लाडका भाऊ योजना २०२४” या योजनेची सुरुवात हि महाराष्ट्र राज्याचे अर्थ मंत्री मा.श्री.अजितदादा पवार यांनी सन २०२४-२०२५ सालच्या बजेट मध्ये या योजनेची घोषणा केली आहे.
माझा लाडका भाऊ योजना २०२४ GR PDF :
माझा लाडका भाऊ २०२४ योजनेची उद्दिष्टे:
“माझा लाडका भाऊ २०२४” योजनेची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे :
- युवकांना रोजगाराच्या संधी:
- १. बेरोजगार तरुणांना आधुनिक तसेच विकसित तंत्रज्ञान तसेच कौशल्य शिकवून त्यांना रोजगारक्षम बनवणे.
- २ .मोठ मोठ्या औद्योगिक क्षेत्रांमध्ये बेरोजगार तरुणांना नवनवीन संधी उपलब्ध करून देणे.
- उद्योग क्षेत्रातील मागणी पूर्ण करणे:
- १.माझा लाडका भाऊ योजनेंतर्गत राज्यातील औद्योगिक क्षेत्रां मधील कुशल कामगार पुरवठा करणे.
- २. युवकांना योग्य ते प्रशिक्षण देऊन उद्योगाच्या मागण्या पूर्ण करणे.
- महाराष्ट्र राज्यातील सर्व सुशिक्षित तरुणांना या योजनेचा लाभ मिळवून देणे.
- राज्यातील बेरोजगार तरुणांना व्यवसाय करण्यास प्रोत्साहन देणे.
- युवकांना स्वयंरोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध करून देणे.
माझा लाडका भाऊ योजना हि एक राज्यातील बेरोजगारांसाठी एक सुवर्णसंधी असून त्यांना विकसित करण्यासाठी एक महत्वाचे पाउल महाराष्ट्र राज्य सरकारने उचलले आहे.
माझा लाडका भाऊ २०२४ योजनेची वैशिष्ठे :
“माझा लाडका भाऊ २०२४” योजनेची वैशिष्ठे पुढीलप्रमाणे :
१. प्रशिक्षण : राज्यातील बेरोजगार तरुणांना योग्य ते प्रशिक्षण तसेच विद्यावेतन या योजनेंतर्गत प्रदान केले जाते.
२. रोजगार उपलब्धता : माझा लाडका भाऊ २०२४ योजनेंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना विविध औद्योगिक क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात.
३. आकर्षक विद्यावेतन : या योजनेंतर्गत जे बेरोजगार तरुण योग्य रित्या प्रशिक्षण करतील त्यांना दर महिना आकर्षक विद्यावेतन देण्यात येणार आहे.
१२ वी पास विध्यार्थ्यांना | महिना ६००० रुपये |
आयटीआय किंवा डिप्लोमा पास विध्यार्थ्यांना | महिना ८००० रुपये |
पदवीधर तरुणांना | महिना १२००० रुपये |
४. विविध औद्योगिक क्षेत्रातील अनुभव: उद्योग क्षेत्रातील विविध कंपन्यांबरोबर असेलेला करार तसेच संलग्नता त्यामुळे तरुणांना विविध नवनव्या क्षेत्रांमध्ये काम करण्याचा अनुभव मिळतो.
५. प्रमाणपत्र: बेरोजगार तरुणाने निवड झालेल्या कंपनीमध्ये योग्यरीत्या प्रशिक्षिण पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र दिले जाणार आहे,त्यामुळे त्या तरुणास भविष्यामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
६.नवीन तंत्रज्ञानाची माहिती : नवनवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घेतल्यामुळे तरुणांना डिजिटल क्षेत्रात नोकरी मिळवणे अधिक सुलभ होते.
माझा लाडका भाऊ २०२४ योजनेचे फायदे किंवा लाभ :
माझा लाडका भाऊ २०२४ योजना अनेक फायदे प्रदान करते ते पुढीलप्रमाणे आहेत –
रोजगाराची उपलब्धता :
१ . या योजनेंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या तरुणांना नवनवीन औद्योगिक क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी तसेच नवीन रोजगार निर्माण होणार आहे.
२. औद्योगिक क्षेत्रामध्ये कुशल कामगारांची कमतरता पूर्ण होते.
प्रमाणपत्र:
१. माझा लाडका भाऊ या योजनेंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर युवकांना प्रमाणपत्र प्रदान केले जाणार आहे त्याचा फायदा त्यांना नवीन नोकरीमध्ये होणार आहे.
२. प्रमानपत्रामुळे युवकाच्या कौश्यल्याची ओळख संबधित कंपनीमध्ये होते.
आर्थिक सहकार्य :
१. प्रशिक्षण घेत असताना युवकांना महाराष्ट्र राज्य सरकारकडून विध्यावेतन स्वरूपामध्ये त्यांना आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे.
२. विद्यावेतानामुळे संबधित युवक स्वावलंबी बनून संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी उचलू शकतो.
- लाडका भाऊ योजनेंतर्गत युवकांना खालीलप्रमाणे विद्यावेतन दिले जाणार आहे–
- १२ वी पास विध्यार्थांना दरमहिना ६००० रुपयांचे विद्यावेतन दिले जाणार आहे.
-
- डिप्लोमा किंवा आयटीआय पास विध्यार्थ्यांना दरमहिना ८००० रुपये इतके विद्यावेतन दिले जाणार आहे.
-
- पदवीधर उमेदवारांना दरमहिना १०००० रुपये विद्यावेतन म्हणून त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत
माझा लाडका भाऊ २०२४ योजनेची पात्रता :
अर्जदार हा महाराष्ट्र रहिवाशी असला पाहिजे.
अर्जदाराचे वय हे १८ ते ३५ दरम्यान असायला पाहिजे.
अर्जदाराने १२ वी ,आयटीआय किंवा पदवीधर अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा तसेच त्याच्याकडे उत्तीर्ण प्रमाणपत्र असावे.
अर्जदार हा बेरोजगार असायला हवा.
अर्जदाराचे बँकेत खाते असावे.
बँक खाते हे आधार कार्डशी सलंग्न केलेले असावे.
माझा लाडका भाऊ २०२४ योजनेसाठी अटी आणि शर्थी :
अर्जदाराने किमान १२ वी उत्तीर्ण असावा.
अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.
आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक.
अर्जदाराने प्रशिक्षण कालावधीमध्ये नियमित हजर असणे आवश्यक आहे.
माझा लाडका भाऊ २०२४ योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :
आधार कार्ड
रहिवाशी दाखला
पासपोर्ट साईझ फोटो
मोबाईल क्रमांक
इमेल आयडी
बँक खाते [आधार कार्ड सलग्न असणे अनिवार्य]
शैक्षणिक गुणपत्रिका
माझा लाडका भाऊ २०२४ | Maza Ladka Bhau Yojana योजनेसाठी अर्ज प्रक्रिया:
माझा लाडका भाऊ २०२४ योजनेसाठी अर्ज करण्यासाठी खाली दिलेप्रमाणे अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.
१. माझा लाडका भाऊ २०२४ योजनेसाठी अर्ज हा https://www.mahaswayam.gov.in/ या महाराष्ट्र राज्य सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर करावा.
२.अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून घ्या.
३. नोंदणी प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर अर्ज तुमच्यासमोर येणार आहे.
४.अर्ज भरत असताना तुम्हाला विचारालेली संपूर्ण माहिती अचूकरीत्या भरायची आहे उदा : नाव ,पत्ता,जन्मतारीख,शैक्षणिक माहिती,इमेल आयडी इत्यादी.
५. तसेच सर्व कागदपत्रे हि पीडीएफ स्वरूपामध्ये अपलोड करायची आहेत उदा : आधार कार्ड,रहिवाशी दाखला,बँक खातेबुक,शैक्षणिक प्रमाणपत्रे,पासपोर्ट आकाराचा फोटो इत्यादी.
६.सर्व माहिती तसेच कागदपत्रांची यशस्वीरीत्या पूर्तता केल्यानंतर तुम्हाला अर्ज दाखल करायचा आहे.
७.अर्ज यशस्वीरीत्या भरल्यानंतर तुम्हाला एक अर्ज क्रमांक मिळेल तो सुरक्षित जपून ठेवा या क्रमांकावरून तुम्ही तुमच्या अर्जाची प्रक्रिया तपासू शकता.
८.अश्याप्रकारे तुमची “माझा लाडका भाऊ २०२४ योजने“साठी अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
सतत विचारले जाणारे प्रश्न :
माझा लाडका भाऊ २०२४ योजनेअंतर्गत कोणकोणत्या कंपनी काम करू शकतो ?
उत्तर:
संबधित कंपनी हि महाराष्ट्रामध्ये असायला हवी तसेच ती ३ वर्षे जुनी असायला हवी.
.
माझा लाडका भाऊ २०२४ योजनेअंतर्गत किती विद्यावेतन मिळणार आहे ?
उत्तर:
लाडका भाऊ योजनेंतर्गत युवकांना खालीलप्रमाणे विद्यावेतन दिले जाणार आहे-
१२ वी पास विध्यार्थांना दरमहिना ६००० रुपयांचे विद्यावेतन दिले जाणार आहे.
डिप्लोमा किंवा आयटीआय पास विध्यार्थ्यांना दरमहिना ८००० रुपये इतके विद्यावेतन दिले जाणार आहे.
पदवीधर उमेदवारांना दरमहिना १०००० रुपये विद्यावेतन म्हणून त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत.
.
माझा लाडका भाऊ २०२४ योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ?
उत्तर:
आधार कार्ड
रहिवाशी दाखला
पासपोर्ट साईझ फोटो
मोबाईल क्रमांक
इमेल आयडी
बँक खाते [आधार कार्ड सलग्न असणे अनिवार्य]
शैक्षणिक गुणपत्रिका
.
माझा लाडका भाऊ २०२४ योजनेसाठी वयोमर्यादा किती आहे ?
उत्तर:
१८ ते ३५ .