‘पी एम किसान योजना २०२४’ या दिवशी जमा होणार १८ वा हप्ता|P M Kisan Yojana 18 th installment :पंतप्रधान मान्य श्री.नरेंद्र मोदी यांनी यांनी संपूर्ण भारत देशातील या योजनेमधील सर्व पात्र शेतकरी बंधू भगिनींना दिनांक १८ जून २०२४ रोजी [वाराणसी ]१७ वा हप्ता देय केला.या १७ व्या देय मध्ये जवळपास ९ कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांना जवळपास रुपये २०,००० कोटींपेक्षा जास्त रक्कम अदा केली गेली.या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचा आधार E-KYC असणे आवश्यक आहे .दरम्यान सर्वच शेतकऱ्यांना आता पुढील हप्ता म्हणजे १८ वा हप्ता कधी जमा होतो याचीच उत्सुकता लागली आहे.सरकारने १८ व्या हप्त्याची तारीख जाहीर केली असून या लेखामध्ये तुम्हाला याची सविस्तर माहिती मिळणार आहे. या लेखामध्ये आम्ही या योजनेची सविस्तर माहिती,१८व्या हप्त्याची माहिती,तसेच नोंदणी प्रक्रिया,अर्ज प्रक्रिया, ई-केवायसी कशी करावी याबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे.या आणि अश्याच योजनेच्या माहितीसाठी आमच्या अधिकृत संकेतस्थळाला तुमच्या बुकमार्क मध्ये सेव करून ठेवा.
काय आहे PM किसान योजना ?
PM किसान योजना म्हणजेच पंतप्रधान किसान सन्मान योजना हि योजना कृषिप्रधान असलेल्या भारत देशातील सर्व शेतकऱ्यांना पाठबळ देण्यासाठी हि योजना चालू करण्यात आली होती.या योजनेंतर्गत देण्यात येणारी रक्कम हि थेट केंद्र सरकार कडून देण्यात येते त्यामुळे या योजनेमध्ये कोणत्याही प्रकारचा गोंधळ किंवा भ्रष्टाचार होण्याची शक्यता फारच कमी आहे.जे शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत त्यांना या योजनेंतर्गत दरमहा २००० रुपये अशी रक्कम देण्यात येते.हि रक्कम दर चार महिन्यांनी लाभार्थी शेतकऱ्याच्या थेट बँक खात्यामध्ये जमा होते.हि रक्कम तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा केली जाते.हि रक्कम ज्या शेतकऱ्यांनी आपली E-KYC प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांनाच मिळणार आहे .जर तुम्ही अजूनही E-KYC प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर लवकरात लवकर ती पूर्ण करून घ्या.म्हणजे तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला या योजनेचा संपूर्ण लाभ घेता येईल.
थोडक्यात माहिती :-
योजनेचे नाव | PM किसान योजना |
कोणी चालू केली | भारत सरकार. |
विभाग | कृषी कल्याण विभाग |
लाभार्थी | भारत देशातील शेतकरी |
लाभ | ६००० प्रती वर्षी |
पी एम किसान योजना १८वा हप्ता तारीख | ऑक्टोबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये |
अधिकृत संकेतस्थळ | pmkisan.gov.in |
१८ वा हप्ता कधी जारी केला जाणार ?
PM किसान योजनेची रक्कम हि दर चार महिन्यानंतर पात्र शेतकरी लाभार्थ्याच्या खात्यावर थेट जमा केली जाते.हि रक्कम २००० रुपये इतकी जमा केली जाते.२०२३ सालापासून महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी सन्मान योजना चालू केली आहे या योजनेंतर्गत पात्र शेतकरी लाभार्थ्यास वार्षिक एकूण रुपये १२,००० रुपये थेट बँक खात्यात जमा होणार आहेत.PM किसान योजनेचा १८ वा हप्ता हा ऑक्टोबर महिन्यामध्ये जमा होण्याची शक्यता होती आणि शासनाने ती तारीख जाहीर केली आहे.PM किसान योजनेचा १८ हप्ता हा ऑक्टोबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजेच १५ सप्टेंबर २०२४ रोजी टाटानगरमधून मान.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.
ऑक्टोबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीला जमा होणारा हप्ता हा “DIRECT BENEFITS TRANSFER [DBT]” योजनेतून सर्व लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.DBT पद्धतीने होणारे व्यवहार हे थेट शासन आणि शेतकरी यांच्यामध्ये होणार असून हि योजना पारदर्शी पद्धतीने पार पाडली जाईल.या योजनेचा फायदा हा देशातील तसेच महाराष्ट्रातील १०.७४ करोड शेतकऱ्यांना होणार आहे.महाराष्ट्रामध्ये नमो शेतकरी महा सन्मान निधी तसेच पी एम किसान योजनेचा १८ वा हप्ता एकत्रित जमा होण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांना नमो शेतकरी महा सन्मान निधी या योजनेतून वर्षाला ६ हजार रुपयांचा निधी दिला जातो.त्यामुळे शेतकऱ्यांना यावेळी पी एम किसान योजनेच्या १८ व्या हप्त्यासोबत २००० हि रक्कम जमा होऊ शकते.
source/credit:प्रभात खबर.
PM किसान योजनेसाठी तुम्ही नोंदणी कशी कराल ?
- १. सर्वप्रथम pmkisan.gov.in संकेत स्थळावर जा.
- २. फॉर्म कॉर्नर पर्यायावर क्लिक करा आणि नवीन माजी नोंदणी या पर्यायावर क्लिक करा .
- ३. यामध्ये ग्रामीण शेतकरी नोंदणी किंवा शहरी शेतकरी नोंदणी या पर्यायावर क्लिक करा .
- ४. आधार कार्ड ,मोबाईल नंबर हि माहिती त्यामध्ये भरा आणि आपल्या मोबाईलवर OTP मिळवा या पर्यायावर क्लिक करा.
- ५. OTP मिळाल्या नंतर तो भरा.
- ६. वयक्तिक माहिती भरा,आधार कार्ड नुसार तुमची योग्य माहिती भरा .
- ७. “आधार प्रमाणीकरण ” यावर क्लिक करा .
- ८. आधार प्रमाणीकरण यशस्वी रित्या पूर्ण झाल्यानंतर तुमच्या जमिनीची माहिती भरा.
- ९. तुमची कागदपत्रे अपलोड करा आणि सेव्ह यावर क्लिक करा
PM किसान योजनेमध्ये तुमचे नाव कसे तपासाल ?
- १. सर्वप्रथम pmkisan.gov.in संकेत स्थळावर जा
- २. उजव्या कोपऱ्यामध्ये “लाभार्थी यादी ” यावर क्लिक करा .
- ३. येणाऱ्या पर्यायामधून तुमचे राज्य ,जिल्हा, शहर,गाव यासारखे पर्याय निवडून “गेट रिपोर्ट ” या बटनावर क्लिक करा .
- ४. येणाऱ्या यादीमधून तुम्ही तुमचे नाव तपासू शकता.
PM किसान योजनेचा १८ वा हप्ता जमा होण्यासाठी ‘हे’ करा अन्यथा योजनेचा लाभ मिळणार नाही.
शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा १८ वा हप्ता सुलभरित्या आपल्या खात्यामध्ये मिळवायचा असेल तर अर्जदार शेतकऱ्याने प्रथम “ई-केवायसी“करणे अनिवार्य आहे अन्यथा PM किसान योजनेची १८ व्या हप्त्याची तसेच नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेमधून मिळणारी रक्कम हि शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार नाही.आम्ही या लेखामध्ये ई-केवायसी कशी कराल? याबाबत संपूर्ण माहिती दिली आहे ती तुम्ही वाचून तुमची ई-केवायसी पूर्ण करू शकता.
PM किसान योजनेमध्ये e-KYC ऑनलाइन अपडेट कशी कराल ?
- ⦿ सर्वप्रथम pmkisan.gov.in संकेत स्थळावर जा.
- ⦿ उजव्या कोपऱ्यामध्ये “e-KYC” यावर क्लिक करा .
- ⦿ आधार कार्ड आणि कॅप्चा भरून शोध वर क्लिक करा .
- ⦿ आधार शी लिंक असलेला मोबाईल क्रमांक टाका.
- ⦿ ” गेट OTP ” वर क्लिक करा फिल्ड मध्ये OTP भरा.
- ⦿ हि प्रकिया पूर्ण झाल्या नंतर तुमची e-KYC ऑनलाइन अपडेट होईल.
पैसे जमा झाले कि नाही हे कसे तपासाल ?
- ⦿ सर्वप्रथम सरकारच्या ” pmkisan.gov.in ” या संकेतस्थळावर भेट द्या .
- ⦿त्यानंतर “फार्मर कॉर्नर” यावर क्लिक करून “बेनिफिसिअरी स्टेटस” या पर्यायावर क्लिक करा.
- ⦿ पुढील पायरीमध्ये तुमचा अधिकृत आधार कार्ड,मोबाईल नंबर,खाते क्रमांक टाका.
- ⦿ त्यानंतर बॉक्स मध्ये दिसत असलेला कॅप्चा कोड टाका.
- ⦿ कोड यशस्वीपणे भरल्यानंतर “गेट स्टेटस् ” या पर्यायावर क्लिक करा .
- ⦿ हि सगळी प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला संकेतस्थळावर तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये PM किसान योजनेचे अनुदान जमा झाले आहे कि नाही याची माहिती मिळून जाईल.
PM किसान योजना हेल्पलाईन क्रमांक:
PM किसान योजनेचा लाभ घेत असलेल्या किंवा नवीन अर्ज केलेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने हेल्पलाईन चालू केलेली आहे .या हेल्पलाईनच्या मदतीने शेतकरी लाभार्थी योजनेशी सलग्न असलेल्या अडथळ्यांवर निशुल्क मदत मिळवू शकतात. PM किसान योजना हेल्पलाईन क्रमांक :-
- 1555261
- 1800115526
- 011-23381092
अधिक माहितीसाठी खाली दिलेला विडीओ पहा.
महाराष्ट्र राज्य सरकारच्या योजना २०२४:
FAQ’s :
पी एम किसान योजनेचा १८वा हप्ता कधी जमा होणार ?
उत्तर:
पी एम किसान योजनेचा १८वा हप्ता हा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जमा होणार असून या तारखेमध्ये बदल होऊ शकतो.
——————————————————————————————————————
या योजनेसाठी कोण पात्र आहे ?
उत्तर:
केंद्र सरकारच्या नियमानुसार पात्र शेतकरी या योजनेसाठी पात्र असतील.
——————————————————————————————————————
पी एम किसान योजनेसाठी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे ?
उत्तर:
पी एम किसान योजनेसाठी अर्जदार शेतकऱ्याचे आधार कार्ड,बँक खात्याचे तपशील,पासपोर्ट आकाराचा फोट,जमिनीचा पुरावा इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता आहे.
——————————————————————————————————————
पी एम किसान योजनेअंतर्गत कश्याप्रकारे अनुदान जमा केले जाते?
उत्तर:
डी बी टी पद्धतीने जमा केले जाते.
——————————————————————————————————————