PM किसान योजनेचा १७वा हप्ता कधी मिळणार ? PM KISAN 17TH INSTALLMENT DATE 2024. सविस्तर माहिती मिळवा एका क्लिक वर…

marathiyojanainfo.com
8 Min Read
PM किसान योजनेचा १७वा हप्ता कधी मिळणार ? PM KISAN 17TH INSTALLMENT DATE 2024. सविस्तर माहिती मिळवा एका क्लिक वर…
PM किसान योजनेचा १७ वा हप्ता कधी मिळणार ? सविस्तर माहिती मिळवा एका क्लिक वर…
PM किसान योजनेचा १७वा हप्ता कधी मिळणार ?

PM किसान योजना :-

  PM किसान योजनेचा १७ वा हप्ता कधी मिळणार? -पंतप्रधान मान्य श्री.नरेंद्र मोदी यांनी यांनी संपूर्ण भारत देशातील या  योजनेमधील सर्व पात्र शेतकरी बंधू भगिनींना दिनांक २८ फेब्रुवारी २०२४ रोजी १६ वा हप्ता देय केला.या १६ व्या देय मध्ये जवळपास ८ कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांना जवळपास  रुपये १८००० कोटींपेक्षा जास्त रक्कम अदा केली गेली.या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचा आधार E-KYC असणे आवश्यक आहे .दरम्यान सर्वच शेतकऱ्यांना आता पुढील हप्ता म्हणजे १७ वा हप्ता कधी जमा होतो याचीच उत्सुकता लागली आहे.सरकारने १७ व्या हप्त्याची तारीख जाहीर केली असून या लेखामध्ये तुम्हाला याची सविस्तर माहिती मिळणार आहे. या लेखामध्ये आम्ही या योजनेची सविस्तर माहिती,१७व्या हप्त्याची माहिती,तसेच नोंदणी प्रक्रिया,अर्ज प्रक्रिया, ई-केवायसी कशी करावी याबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे.या आणि अश्याच योजनेच्या माहितीसाठी आमच्या अधिकृत संकेतस्थळाला तुमच्या बुकमार्क मध्ये सेव करून ठेवा.

काय आहे PM किसान योजना ?

PM किसान योजना म्हणजेच पंतप्रधान किसान सन्मान योजना हि योजना कृषिप्रधान असलेल्या भारत देशातील सर्व शेतकऱ्यांना पाठबळ देण्यासाठी हि योजना चालू करण्यात आली होती.या योजनेंतर्गत देण्यात येणारी रक्कम हि थेट केंद्र सरकार कडून देण्यात येते त्यामुळे या योजनेमध्ये कोणत्याही प्रकारचा गोंधळ किंवा भ्रष्टाचार होण्याची शक्यता फारच कमी आहे.जे शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत त्यांना या योजनेंतर्गत दरमहा २०००रुपये अशी रक्कम देण्यात येते.हि रक्कम दर चार महिन्यांनी लाभार्थीशेतकऱ्याच्या थेट बँक खात्यामध्ये जमा होते.हि रक्कम तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा केली जाते.हि रक्कम ज्या शेतकऱ्यांनी आपली E-KYC प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांनाच मिळणार आहे .जर तुम्ही अजूनही E-KYC प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर लवकरात लवकर ती पूर्ण करून घ्या.म्हणजे तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला या योजनेचा संपूर्ण लाभ घेता येईल.

योजनेचे नाव PM किसान योजना
कोणी चालू केली भारत सरकार.
विभाग कृषी कल्याण विभाग
लाभार्थी भारत देशातील शेतकरी
लाभ २००० प्रती वर्षी
पी एम किसान योजना
१७वा हप्ता तारीख
१८ जून २०२४
अधिकृत संकेतस्थळpmkisan.gov.in

१७ वा हप्ता कधी जारी केला जाणार ?

PM किसान योजनेची रक्कम हि दर चार महिन्यानंतर पात्र शेतकरी लाभार्थ्याच्या खात्यावर थेट जमा केली जाते.हि रक्कम प्रती महिना २००० रुपये इतकी जमा केली जाते.२०२३ सालापासून महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी सन्मान योजना चालू केली आहे या योजनेंतर्गत पात्र शेतकरी लाभार्थ्यास वार्षिक एकूण  रुपये १२,००० रुपये थेट बँक खात्यात जमा होणार आहेत.PM किसान योजनेचा १७ वा हप्ता हा जून महिन्यामध्ये जमा होण्याची शक्यता होती आणि शासनाने ती तारीख जाहीर केली आहे.PM किसान योजनेचा १७ हप्ता हा १८ जून २०२४ ला लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.

१८ जून २०२४ ला जमा होणारा हप्ता हा “DIRECT BENEFITS TRANSFER [DBT]” योजनेतून सर्व लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.DBT पद्धतीने होणारे व्यवहार हे थेट शासन आणि शेतकरी यांच्यामध्ये होणार असून हि योजना पारदर्शी पद्धतीने पार पाडली जाईल.या योजनेचा फायदा हा देशातील तसेच महाराष्ट्रातील ९.३ करोड शेतकऱ्यांना होणार आहे.महाराष्ट्रामध्ये नमो शेतकरी महा सन्मान निधी तसेच पी एम किसान योजनेचा १७ वा हप्ता एकत्रित जमा होण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांना नमो शेतकरी महा सन्मान निधी या योजनेतून वर्षाला ६ हजार रुपयांचा निधी दिला जातो.त्यामुळे शेतकऱ्यांना यावेळी पी एम किसान योजनेच्या १७व्या हप्त्यासोबत २००० हि रक्कम जमा होऊ शकते.

PM किसान योजनेसाठी तुम्ही नोंदणी कशी कराल?

  • सर्वप्रथम pmkisan.gov.in संकेत स्थळावर जा.
  • फॉर्म कॉर्नर पर्यायावर क्लिक करा  आणि  नवीन माजी नोंदणी या पर्यायावर क्लिक करा .
  • यामध्ये ग्रामीण शेतकरी नोंदणी किंवा शहरी शेतकरी नोंदणी या पर्यायावर क्लिक करा .
  • आधार कार्ड ,मोबाईल नंबर हि माहिती त्यामध्ये भरा आणि आपल्या मोबाईलवर OTP मिळवा या पर्यायावर क्लिक करा.
  •  OTP मिळाल्या नंतर तो भरा.
  • वयक्तिक माहिती भरा,आधार कार्ड नुसार तुमची योग्य  माहिती भरा .
  • आधार प्रमाणीकरण ” यावर क्लिक करा .
  • आधार प्रमाणीकरण यशस्वी रित्या पूर्ण झाल्यानंतर तुमच्या जमिनीची माहिती भरा.
  • तुमची कागदपत्रे अपलोड करा आणि सेव्ह यावर क्लिक करा.

PM किसान योजनेमध्ये तुमचे नाव कसे तपासाल ?

  • सर्वप्रथम pmkisan.gov.in संकेत स्थळावर जा
  • उजव्या कोपऱ्यामध्ये “लाभार्थी यादी ” यावर क्लिक करा .
  • येणाऱ्या पर्यायामधून  तुमचे राज्य ,जिल्हा, शहर,गाव यासारखे पर्याय निवडून “गेट रिपोर्ट ” या बटनावर क्लिक करा .
  • येणाऱ्या यादीमधून तुम्ही तुमचे नाव तपासू शकता.

PM किसान योजनेचा १७ वा हप्ता जमा होण्यासाठी ‘हे’ करा अन्यथा योजनेचा लाभ मिळणार नाही..

शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा १७ वा हप्ता सुलभरित्या आपल्या खात्यामध्ये मिळवायचा असेल तर अर्जदार शेतकऱ्याने प्रथम “ई-केवायसी“करणे अनिवार्य आहे अन्यथा PM किसान योजनेची १७ व्या हप्त्याची तसेच नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेमधून मिळणारी रक्कम हि शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार नाही.आम्ही या लेखामध्ये ई-केवायसी कशी कराल? याबाबत संपूर्ण माहिती दिली आहे ती तुम्ही वाचून तुमची ई-केवायसी पूर्ण करू शकता.

PM किसान योजनेमध्ये e-KYC ऑनलाइन अपडेट कशी कराल ?

  • सर्वप्रथम pmkisan.gov.in संकेत स्थळावर जा.
  • उजव्या कोपऱ्यामध्ये “e-KYC” यावर क्लिक करा .
  • आधार कार्ड आणि कॅप्चा भरून शोध वर क्लिक करा .
  • आधार शी लिंक असलेला मोबाईल क्रमांक टाका.
  • गेट OTP ” वर क्लिक करा फिल्ड मध्ये OTP भरा.
  • हि प्रकिया पूर्ण झाल्या नंतर तुमची  e-KYC ऑनलाइन अपडेट होईल.

पैसे जमा झाले कि नाही हे कसे तपासाल ?

  • सर्वप्रथम सरकारच्या ” pmkisan.gov.in ” या संकेतस्थळावर भेट द्या .
  • त्यानंतर “फार्मर कॉर्नर” यावर क्लिक करून “बेनिफिसिअरी स्टेटस” या पर्यायावर क्लिक करा.
  • पुढील पायरीमध्ये तुमचा अधिकृत आधार कार्ड,मोबाईल नंबर,खाते क्रमांक टाका.
  • त्यानंतर बॉक्स मध्ये दिसत असलेला कॅप्चा कोड टाका.
  • कोड यशस्वीपणे भरल्यानंतर “गेट स्टेटस् ” या पर्यायावर क्लिक करा .
  • हि सगळी प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला संकेतस्थळावर तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये PM किसान योजनेचे अनुदान जमा झाले आहे कि नाही याची माहिती मिळून जाईल.

PM किसान योजना हेल्पलाईन क्रमांक

PM किसान योजनेचा लाभ घेत असलेल्या किंवा नवीन अर्ज केलेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने हेल्पलाईन चालू केलेली आहे .या हेल्पलाईनच्या मदतीने शेतकरी लाभार्थी योजनेशी सलग्न असलेल्या अडथळ्यांवर निशुल्क मदत मिळवू शकतात. PM किसान योजना हेल्पलाईन क्रमांक :-

  • 1555261
  • 1800115526
  • 011-23381092

अधिक माहितीसाठी खाली दिलेला विडीओ पहा.

FAQ’s

  • पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ?
  • पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना २०२४?
  • पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी कशी करावी ?
  • नमो शेतकरी महा सन्मान निधी २०२४?
  • नमो शेतकरी महा सन्मान निधीसाठी ऑनलाईन नोंदणी कशी करावी ?
  • १७ वा हप्ता कधी मिळणार ?
  • e-KYC” ऑनलाइन अपडेट कशी करायची ?
  • PM किसान योजनेची माहिती ?
  • PM किसान योजनेसाठी तुम्ही नोंदणी कशी कराल ?
  • PM किसान योजनेचा १७ वा हप्ता किती मिळणार ?
  • कोण कोण या योजनेचा लाभ घेऊ शकते ?
  • कोण कोण या योजनेचा लाभ घेऊ शकते ?

PM किसान योजनेचा १७ वा हप्ता कधी मिळणार ? सविस्तर माहिती मिळवा एका क्लिक वर…

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *