पिंक ई-रिक्षा योजना २०२४ महाराष्ट्र राज्य
पिंक ई-रिक्षा योजना २०२४ महाराष्ट्र राज्य|Pink E Rickshaw Yojana Maharashtra :महाराष्ट्र राज्य सरकार नेहमीच राज्यातील महिलांच्या आरोग्य ,रोजगार,नोकरी,व्यावसाय इत्यादी बाबींसाठी नवनवीन योजना तसेच उपक्रम राबवत असते.या बाबींचा विचार करून भारत सरकार तसेच महाराष्ट्र सरकारने महिलासाठी पिंक ई-रिक्षा योजना अंमलात आणली आहे .या योजनेमधून महिलांना समाजामध्ये आत्मसन्मानाने वावरता येणार आहे तसेच महिला प्रवर्ग आत्मनिर्भर होणार आहे.महिला पिंक ई-रिक्षा चालवून त्यामधून होणाऱ्या आर्थिक कमाईतून आपल्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या सधृढ बनवू शकतात.सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये प्रत्येक व्यक्ती आपल्या सोयीसाठी वयक्तिक वाहनाचा वापर करत आहे आणि हा वापर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे, त्यासाठी रिक्षा चालक काही अपवाद नाही.रिक्षा यासुद्धा इंधनावरच धावतात उदा : पेट्रोल,CNG इत्यादी.पण या वाहनामधून निघणाऱ्या घातक विषारी धुरामुळे पर्यावरणाला खूपच आघात पोहचत आहे.दिवसेंदिवस पृथ्वीवरील तापमानामध्ये खूपच वाढ होत चालली आहे.या गोष्टींचा विचारू करून महिलांना आत्मनिर्भर तसेच पर्यावरणपूरक वाहतुकीचा पर्याय म्हणून महाराष्ट्र सरकारने हि पिंक ई-रिक्षा योजना अंमलात आणली आहे.हि योजना सुरुवातीला मुंबई,नवी मुंबई ,ठाणे,पुणे ,नागपूर सारख्या इतर दहा शहरांमध्ये राबवण्यात येत आहे.याबाबतचा अराखडा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री मान्य.श्री अजित पवार यांनी आखला आहे.या योजनेसाठी महिला आणि बालविकास विभागाचे आयुक्त मान्य.डॉ.प्रशांत ननावरे यांनी पहिल्या वर्षासाठी जवळपास ५००० पिंक ई-रिक्षा सुचवल्या आहेत.या योजनेंतर्गत अर्जदार किंवा लाभार्थी महिलेस महाराष्ट्र सरकार २०% सबसिडी तसेच ७०% अनुदान बँकेतून कर्जस्वरूपात मिळणार आहे. अर्जदारास सुरवातील १०% खर्चाची रक्कम भरून या योजनेचा लाभ घेऊ शकतात.तर चला पाहूया या योजनेमुळे काय फायदा होणार आहे,काय आहे पात्रता ,कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे ?, कसा अर्ज करू शकता. या लेखामध्ये आम्ही या योजने बाबत संपूर्ण माहिती दिली आहे तर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचावा हि विनंती. तसेच अजून नवनवीन योजनांची माहिती आपल्याला आपल्या मोबाईलवर हवी असल्यास आमच्या http://www.marathiyojanainfo.com या संकेतस्थलाळा तुमच्या बुकमार्क मध्ये सेव करा.
पिंक ई-रिक्षा योजना २०२४ महाराष्ट्र राज्य थोडक्यात :
योजनेचे नाव | पिंक ई-रिक्षा योजना २०२४ महाराष्ट्र राज्य |
राज्य/शासन | महाराष्ट्र राज्य |
विभाग | महिला आणि बाल विकास विभाग |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील महिला |
उद्दिष्टे | महिलांना आत्मनिर्भर आणि सक्षम बनवणे |
राज्य | महाराष्ट्र |
अधिकृत संकेतस्थळ | – |
पिंक ई-रिक्षा योजना २०२४ उद्दिष्टे :
- महिलांना रोजगाराची संधी उपलब्घ करून देणे जेणेकरून कुटुंबाचा आर्थिक प्रश्न सुटला जाईल.
- महिलांना आत्मनिर्भर बनवणे.
- महिलांसाठी संरक्षण प्रदान करणे.
- वाहनांमुळे होणारे प्रदूषण टाळून पर्यावरणपूरक वाहतूक करणे.
- ई-वाहनांना प्रोत्साहन देणे.
पिंक ई-रिक्षा योजना २०२४ महाराष्ट्र राज्य फायदे
- पिंक ई-रिक्षा योजनेमुळे समाजातील आर्थिक दुर्बल असणाऱ्या तसेच रोजगारापासून वंचित असलेल्या महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे.
- पिंक ई-रिक्षा योजनेमुळे समाजातील महिलांच्या सुरक्षित प्रवासाचा प्रश्न मार्गी लागेल.
- या योजनेमुळे रिक्षाचालक महिला आणि महिला प्रवाशी यांना हा प्रवास परवडणारा ठरेल.
- इंधनाच्या तुलनेत या योजनेतून मिळणाऱ्या रिक्षाचे प्रदूषण हे शून्य असल्यामुळे पर्यावरणास याचा आघात होत नाही.
- ई वाहनांना प्रोत्साहन मिळते.
- पिंक ई-रिक्षा योजनेसाठी सरकारकडून अनुदान मिळत असल्यामुळे आर्थिक भार कमी होणास मदत होते.
पिंक ई-रिक्षा योजना २०२४ महाराष्ट्र राज्य अनुदान:
महाराष्ट्र राज्य अनुदान | २० % |
बँक कर्ज | ७० % |
अर्जदाराचा हिस्सा | १० % |
पिंक ई-रिक्षा योजना पात्रता :
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिला हि महाराष्ट्र राज्याची नागरिक असली पाहिजे.
- अर्जदाराचे वय हे १८ पेक्षा जास्त असले पाहिजे.
- अर्जदार हा महिला असली पाहिजे.
- अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2 लाखापेक्षा कमी असले पहिजे.
- अर्जदाराकडे वैद्य वाहन चालवण्याचा परवाना आवश्यक.
पिंक ई-रिक्षा योजना अर्ज प्रक्रिया:
- पिंक ई-रिक्षा योजनेसाठी महाराष्ट्र सरकारने अद्यापही अधिकृत संकेतस्थळ जाहीर केलेले नाही आहे.थोड्या दिवसात महाराष्ट्र सरकार अधिकृत संकेतस्थळ जाहीर करेल त्यावेळी आम्ही आपल्यापर्यंत याची माहिती नक्कीच पुरवू.
पिंक ई-रिक्षा योजना आवश्यक कागदपत्रे :
पिंक ई-रिक्षा योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे
- आधार कार्ड
- मोबाईल क्रमांक
- राष्ट्रीयकृत बँकेचे खातेबुक
- रहिवाशी दाखला
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- ईमेल आयडी
पिंक ई-रिक्षा योजना या शहरांमध्ये राबवली जाईल :
- मुंबई शहर
- मुंबई उपनगर
- नवी मुंबई
- ठाणे
- पनवेल
- पुणे
- पिंपरी-चिंचवड
- नाशिक
- छत्रपती संभाजी नगर
काय असेल पिंक ई-रिक्षाची किंमत ?
अद्यापही महाराष्ट्र राज्य सरकारने पिंक ई-रिक्षा योजना २०२४ महाराष्ट्र राज्य संदर्भात कोणतीही अधिकृत माहित प्रसारित केलेली नाही.सूत्रांच्या माहितीनुसार या योजनेतून मिळणाऱ्या रिक्षाची किंमत/pink e rickshaw price हि जवळपास १ लाख ३५ हजार पर्यंत असू शकते.या रकमेतून सरकार २०% म्हणजेच २७०००/- इतकी रक्कम अनुदान स्वरुपात लाभार्थ्यास देणार आहे तसेच ७०% रक्कम बँकेकडून मंजूर करून देण्यात येणार आहे.या योजनेतून लाभार्थ्याला लाभ घ्यायचा असेल तर फक्त १०% रक्कम भरावी लागणार आहे आणि ती जवळपास १३ हजार ते १४ हजार असू शकते. या बाबतची अधिकृत घोषणा सरकारकडून करण्यात येईल ,त्यावेळी आम्ही तुम्हाला ती माहिती पुरवू त्यासाठी आमच्या संकेतस्थलाळा तुमच्या बुकमार्क मध्ये सेव करून ठेवा.
महाराष्ट्र राज्य सरकारच्या योजना २०२४
FAQ’s :
- पिंक ई-रिक्षा योजना २०२४ महाराष्ट्र राज्य साठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
- पिंक ई-रिक्षा योजना २०२४ महाराष्ट्र राज्य कोण अर्ज करू शकते?
- पिंक ई-रिक्षा योजनेसाठी किती अनुदान मिळते?
- पिंक ई-रिक्षा योजना काय आहे?
- पिंक ई-रिक्षा योजना २०२४ महाराष्ट्र राज्य?
- पिंक ई-रिक्षा योजना २०२४ महाराष्ट्र राज्य अंतिम तारीख?
- मी अर्ज करू शकतो काय?