प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना २०२४ :
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना २०२४| pradhan mantri jeevan jyoti bima yojana:भारत सरकार किंवा केंद्र सरकार नेहमीच देशातील नागरिकांच्या उत्तम आरोग्य,अर्थिक दुर्बलता,जेष्ठ नागरिकांचे प्रश्न,युवा वर्ग,बाल आणि महिला विकास,इत्यादी बाबींवर नेहमीच लक्ष ठेवून त्या बाबींचा नेहमीच विकास होत राहावा यासाठी तत्पर असते.भारत देश हा सध्या विकसित राष्ट्र होण्याच्या मार्गावर खूपच वेगाने कूच करत आहे.भारत देश हा सध्यस्थितीत जगाचा एक महत्वाचा भाग बनला आहे.भारत हि जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे.जशी देशाची अर्थव्यवस्था मजबूत होत आहे तशीच देशातील नागरिकांची हि आर्थिक साक्षरता वाढावी या दृष्टीकोनातून भारत सरकाने देशातील १८ ते ५० वयोगटातील सर्वच युवक तसेच नागरिकांसाठी तसेच त्यांच्या संरक्षणासाठी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना अंमलात आणली आहे.आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये नागरिक किंवा खाजगी क्षेत्रातील कामगार आपला जीव धोक्यात घालून आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करत आहेत.त्यांचे संरक्षण तसेच त्यांची गुंतवणूक वाढावी हाच यापाठीमागाचा उद्देश आहे.या योजनेतून भारत सरकार फक्त रुपये ४३६ मध्ये विमा धारकांना 2 लाखाचे विमा संरक्षण देणार आहे.तर चला पाहू काय आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना ?,काय आहेत योजनेचे लाभ?,अर्ज कसा करायचा ?,त्याचबरोबर अवश्यक कागदपत्रे. अशाच योजनांच्या माहितीसाठी आमच्या अधिकृत संकेतस्थळाला आपल्या बुकमार्क मध्ये सेव करा.
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना
योजनेचे नाव | प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना |
योजनेची उद्धीष्ठे | कमी किंमतीमध्ये विमा सरंक्षण देणे जेणेकरून त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळेल. |
शासन/सरकार | भारत सरकार/केंद्र सरकार |
योजनेचा लाभ | 2 लाखांपर्यंत विमा संरक्षण |
लाभार्थी | १८ ते ५० वयोगटातील भारतीय नागरिक. |
योजना प्रारंभ | २०१५ |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन/ऑफलाईन |
अधिकृत संकेतस्थळ | www.jansuraksha.gov.in |
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना उद्दिष्टे
- प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा मुख्य हेतू हा आहे कि भारतातील प्रत्येकी नागरिक हा आर्थिकदृष्ट्या संरक्षित असला पाहिजे जेणेकरून त्याला व त्याच्या कुटुंबाला मदत होईल.
- हि योजना १८ ते ५५ वयोगटातील भारतीय नागरिकांसाठी राबवली जात आहे.त्याच्या कोणत्याही कारणामुळे मृत्यू झाल्यास विमाधारकाच्या कुटुंबास 2 लाख इतकी विमा संरक्षण रक्कम म्हणून दिली जाते,जेणेकरून त्यांच्या कुटुंबास आर्थिक मदत होईल.
- हि योजना सर्वसामान्य तसेच गरीब जनतेला परवडेल अश्या हेतूने सुरु करण्यात आली आहे.फक्त रुपये ४३६मध्ये सामान्य जनता आपले तसेच आपल्या कुटुंबाचे संरक्षण करू शकते.
- किफायतशीर दरामध्ये सामान्यांना सर्वोत्तम विमा संरक्षण.
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना वैशिष्ट्ये
- या योजनेंतर्गत विमाधारकाच्या कुटुंबास कोणत्याही कारणास्तव मृत्यू झाल्यास २ लाख इतकी विमा सरंक्षण रक्कम म्हणून प्रदान केली जाते.
- कमीतकमी म्हणजेच फक्त रु ४३६ मध्ये विमा संरक्षण मिळते.
- हि योजना भारतातील १८ ते ५५ वयोगटातील सर्वांसाठी लागू करण्यात आली आहे.
- अर्ज प्रक्रियेसाठी कोणत्याही वैद्यकीय चाचणीची गरज नाही.
- हि योजना १००% कागदमुक्त असल्यामुळे कोणत्याही कागदांची झेरोक्स गरजेची नाही तुम्ही ऑनलाइ/ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो.
- आतापर्यंत या योजनेचा लाखो नागरिकांनी सहाभाग नोंदवून त्याचा फायदा घेतला आहे.
- या योजनेचा कालावधी हा एक वर्षापर्यंत असून त्यानंतर तो नूतनीकरण करता येतो.
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना फायदे
- विमाधारकाचा अपघात,नैसर्गिक मृत्यू,किंवा इतर कारणांमुळे मृत्यू झाल्यास विमाधारकाच्या कुटुंबीयांना २ लाख इतकी अर्थूक मदत केली जाते जेणेकरून विमाधारकाच्या कुटुंबास आर्थिक मदत मिळेल.
- या योजनेची वार्षिक भरावयाची रक्कम हि ४३६ रुपये असल्यामुळे गोरगरीब जनताही या योजनेचा फायदा घेऊ शकते आणि आपल्या कुटुंबाचे सरंक्षण करू शकते.
- या योजनेसाठी कोणत्याही वैद्यकीय चाचणीची किंवा तपासणीची गरज नाही.
- पेपरलेस अर्ज प्रक्रिया असल्यामुळे सर्वसामन्यांना सोयीस्कर.
- १८ ते ५५ वयोगटातील सर्वच भारतीय नागरिक या योजनेचा फायदा घेवू शकतात.
- एक वर्षाचा कालावधी असल्यामुळे वर्षानंतर नुतनीकरण करता येते.
- बँक खात्याशी सलंग्न असल्यामुळे अपोआप तुमच्या खात्यामधून पैसे कापून घेतले जातील.
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना पात्रता
- या योजनेत सहभागी होण्यासाठी अर्जदाराचे वय हे १८ ते ५५ वर्ष असले पाहिजे.
- कोणत्याही भारतीय किंवा राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे आवश्यक.
- अर्जदाराकडे स्वताचे आधार कार्ड असणे आवश्यक त्याचबरोबर ते बँकेच्या खात्याशी सलंग्न असणे आवश्यक.
- कोणत्याही वैद्यकीय तपासणीची किंवा प्रमाणपत्राची आवश्यक्यता नाही.
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- मतदान कार्ड
- मोबाईल क्रमांक
- बँक खाते
- रहिवाशी दाखला
- उत्पन्नाचा दाखला
- रेशन कार्ड
- पासपोर्ट आकाराचे फोटो
pradhan mantri jeevan jyoti bima yojana -अर्ज कसा कराल ?
- अर्ज प्रक्रिया हि संपूर्ण ऑफलाईन पद्धतीने असल्यामुळे अर्जदारास कोणत्याही प्रकारच्या समस्येला सामोरे जावे लागणार नाही.
- अर्ज करण्यासाठी प्रथम शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्जाची प्रत [फॉर्म ] डाऊनलोड करून घ्या.
- अर्जामध्ये विचारलेल्या किंवा आवश्यक असणाऱ्या बाबींची पूर्तता योग्यरित्या करा.
- संपूर्ण फॉर्म भरून झाल्यानंतर तो बँकेच्या अधिकाऱ्यांकडे जमा करा.
- काही दिवसांनी अर्जाची पडताळणी होऊन तुमचा विमा सुरु करण्यात येईल त्याची अधिकृत माहिती तुम्हाला बँक विभागाद्वारे कळवण्यात येईल.
- अश्या प्रकारे तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता.
अधिकृत संकेतस्थळ :- www.jansuraksha.gov.in
FAQ’s :
- प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना काय आहे ?
- प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना म्हणजे काय?
- प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेसाठी पात्रता काय आहे?
- प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेसाठी वार्षिक भरणा किती आहे?
- प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेसाठी विमा संरक्षण किती आहे?