काय आहे लेक लाडकी योजना ?
लेक लाडकी योजना महाराष्ट्र राज्य – महाराष्ट्र राज्य सरकार नेहमीच राज्यातील महिला,वयोवृद्ध नागरिक,अपंग,विधवा यांच्यासाठी नेहमीच नवनवीन योजना अंमलात घेऊन येत असते.महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास कल्याण विभाग अंतर्गत राज्य सरकारने २०२३ – २०२४ च्या अर्थसंकल्पामध्ये राज्यातील मुलींसाठी एक योजना जाहीर केली.या योजनेतून राज्यातील मुलींना त्यांच्या जन्मापासून ते शिक्षण पूर्ण होई पर्यंत त्यांना आर्थिक सहाय्य करण्याचा सरकारचा मानस आहे. या योजनेची घोषणा राज्याचे अर्थमंत्री मान्य.श्री.देवेन्द्र फडवणीस यांनी २०२३ – २०२४ च्या अर्थसंकल्पामध्ये केली.या योजनेचा मुख्यता फायदा हा गरीब कुटुंबातील मुलींना होणार आहे.गरीब कुटुंबातील मुलीला तिच्या चालू शैक्षणिक वर्गवारीनुसार मदत केली जाते. तर चला पाहूया काय आहे हि लाडकी लेक योजना ? काय आहेत या योजनेचे फायदे ? कसा अर्ज कराल ? आवश्यक कागदपत्रे या सर्व बाबींची माहित आपण या लेखामध्ये घेणार आहोत.तसेच या आणि अश्याच प्रकारच्या योजनाची माहिती तुम्हाला तुमच्या मोबाईलवर हवी असल्यास तुमची आमच्या अधिकृत वेबसाईट ला तुमच्या बुकमार्क मध्ये सेव करून ठेवा.
देशाचे पंतप्रधान मान्य.नरेंद्र मोदी यांनी देशातील मुलींच्या सक्षमीकरणासाठी विविध प्रकारच्या योजना अंमलात आणल्या आहेत.महाराष्ट्र राज्य सरकारनेही मुलींच्या सक्षमीकरणासाठी या लेक लाडकी योजनेची घोषणा केली आहे.य योजनेचा लाभ हा गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलींना प्रामुख्याने होणार आहे.या योजनेंतर्गत मुलीला तिच्या जन्मापासून ते तिचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत एकूण पाच हप्त्यामध्ये हि आर्थिक मदत प्रदान केली जाणार आहे.तसेच मुलीला तिच्या वयाची अठरा वर्षे पूर्ण होताच तिच्या खात्यामध्ये एकरकमी ७५००० रुपये जमा केले जाणार आहेत.अशी घोषणा अर्थमंत्री मान्य.श्री.देवेन्द्र फडवणीस यांनी २०२३ – २०२४ च्या अर्थसंकल्पामध्ये केली.या योजनेसाठी महाराष्ट्र राज्य सरकारने एकूण १०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
लेक लाडकी योजना थोडक्यात :
योजनेचे नाव | लेक लाडकी योजना २०२४ |
कोणी सुरु केली | महाराष्ट्र सरकार |
योजनेचा उद्देश | मुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करणे. |
विभाग | महिला व बाल कल्याण विभाग |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुली. |
लाभ | १,०१,०००/-रुपये |
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा. |
लेक लाडकी योजना २०२४
लेक लाडकी योजना उद्देश :
- महाराष्ट्र सरकारने चालू केलेल्या लेक लाडकी योजनेचा मुख्य उद्देश हा राज्यातील आर्थिक तसेच दुर्बल घटकातील कुटुंबातील मुलींना त्यांच्या जन्मापासून ते त्यांचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत आर्थिक साहाय्य करणे,त्याचबरोबर मुलींच्या शिक्षण तसेच आरोग्यासाठी त्यांना आर्थिक मदत करणे.या योजनेमुळे मुलींना समाजामध्ये आर्थिक मदत होऊन त्यांना समाजामध्ये इतरांबरोबर समानतेने राहण्यास मदत होणार आहे.तर चला पाहूया काय आहेत या योजनेचे मुख्य उद्देश.
- स्त्री भृणहत्या :
- या योजनेमुळे स्त्री भृणहत्या रोखण्यास मदत होणार आहे.त्याचबरोबर मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देण्यास हि योजना महत्वाची भूमिका बजावणार आहे.या योजनेमुळे मुलींच्या जन्मास प्रोत्साहन मिळेल.
- मुलींच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन :
- आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये मुलींचे शिक्षणही तितकेच महत्वाचे आहे जितके कि मुलांचे आहे.या योजनेचा मुख्य उद्देश हा मुलीना शिक्षणासाठी अर्थिक सहायता प्रदान करणे हा आहे.
- मुलींना त्यांच्या जन्मापासून ते १८ वर्षांपर्यंत शासन या योजनेंतर्गत आर्थिक मदत प्रदान करते.आर्थिक सहयातेमुळे मुलींना शिक्षणामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागत नाही.
- समाजामध्ये महिलांचे सक्षमीकरण :
- या योजनेंतर्गत मुलींना आर्थिक मदत करून त्यांना उच्च दर्जाचे शिक्षण त्याचबरोबर त्यांना स्वावलंबी बनवून समाजामध्ये महिला सक्षमीकरण तसेच महिला सबलीकरण करणे.
- या योजनेमुळे मुली राज्याच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये जावून उच्च दर्जाचे शिक्षण घेऊन स्वावलंबी होऊ शकतात.
- कुटुंबास आर्थिक सहाय्य :
- पूर्वी मुलगी जन्माला आल्यांनतर तिच्या होणाऱ्या खर्चांमुळे ती कुटुंबास ओझे वाटायची,पण या योजनेमुळे कुटुंबासही आता मुलींच्या शिक्षणासाठी आता खर्च करण्याची काहीहि गरज नाही.
- कारण, आता सरकार या योजनेंतर्गत मुलीच्या शिक्षणासाठी संपूर्ण आर्थिक मदत करणार आहे.त्यामुळे मुलींच्या शिक्षणाची चिंताही मिटली आहे.
लेक लाडकी योजना वैशिष्ठे :
- गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलींना या योजनेचा लाभ होणार आहे.
- या योजनेंतर्गत गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलींना जन्मापासून ते शिक्षण पूर्ण होईपर्यंत आर्थिक मदत होणार आहे.
- या योजनेमुळे मुलींच्या पालकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार नाही आहे.
- पिवळ्या तसेच तांबड्या रेशनकार्ड धारक कुटुंबात जन्म झालेल्या मुलीला जन्मावेळी ५००० रुपयांची मदत केली जाणार आहे.
- मुलीच्या इयत्ता पहिलीच्या प्रवेशानंतर ६००० रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे
- मुलगी इयत्ता सहावीमध्ये गेल्यानंतर ७००० रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे.
- मुलगी इयत्ता अकरावी मध्ये गेल्यानंतर ८००० रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे.
- या योजनेची मुख्य बाब म्हणजे मुलगीचे वय वर्ष १८ पूर्ण झाल्यानंतर तिच्या खात्यामध्ये एकरकमी ७५००० सरकारकडून आर्थिक मदत मिळेल.
- मुलीचा जन्म सरकारी दवाखान्यामध्ये होणे आवश्यक आहे.
- या योजनेसाठी मुलीच्या पालकांनी मुलीच्या जन्मावेळीस लेक लाडकी योजनेस अर्ज करणे गरजेचे आहे.
लेक लाडकी योजनेचे फायदे :
- लेक लाडकी योजनेंतर्गत गरीब कुटुंबामध्ये जन्मलेल्या मुलींना तिच्या जन्मापासून ते तिचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत सरकारकडून आर्थिक मदत दिली जाते.
- लेक लाडकी योजनेंतर्गत गरीब कुटुंबामध्ये जन्मलेल्या मुलीच्या जन्मावेळी ५००० रुपयांची आर्थिक मदत हि थेट तिच्या पालकांच्या खात्यामध्ये जमा केली जाते.
- मुलगीच्या इयता पहिलीच्या प्रवेशानंतर ६००० रुपयांची आर्थिक मदत केली जाते जेणेकरून तिच्या शिक्षणामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा निर्माण होऊ नये.
- तसेच ७००० हजार रुपयांची आर्थिक मदत हि मुलगी इयत्ता सहावीला गेल्यानंतर तिला प्रदान केली जाते.
- ८००० रुपयांची आर्थिक मदत हि मुलगी इयत्ता अकरावीला गेल्यानंतर तिला दिली जाते.
- मुलगीच्या वयाची १८ वर्षे पूर्ण होतील त्यावेळी तिच्या खात्यामध्ये एकूण ७५००० रुपये एवढी रक्कम जमा केली जाते.
- या योजनेतून मिळालेल्या आर्थिक रक्कमेतून लाभार्थी तिच्या शिक्षणासाठी लागणारी सर्व सामुग्री खरेदी करून शिक्षण पूर्ण करू शकते.
- मुलींच्या शिक्षण तसेच इतर गोष्टीसाठी होणारा खर्च या योजनेंतर्गत कमी करता येतो.
- लेक लाडकी योजनेमुळे मुलींना त्यांच्या कुटुंबाचे ओझे म्हणून नाही तर आधार म्हणून सांभाळण्यात येईल.
- या योजनेचा फायदा घेऊन मुली आपले भविष्य उज्ज्वल करू शकतात.
- समाजामध्ये मुलींना समानतेची वागणूक दिली जाईल.
लेक लाडकी योजना आर्थिक सहाय्य :
वय/ शिक्षण | आर्थिक सहाय्य |
मुलगी जन्माला आल्यानंतर- | ५००० रुपये |
इयत्ता पहिलाला गेल्यानंतर- | ६००० रुपये |
इयत्ता सहावीला गेल्यानंतर- | ७००० रुपये |
इयत्ता अकरावीला गेल्यानंतर- | ८००० रुपये |
१८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर- | ७५००० रुपये |
एकूण | १,०१,००० रुपये |
लेक लाडकी योजनेसाठी पात्रता :
लेक लाडकी योजेनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असल्यास खालील गोष्टींची पात्रता आवश्यक असेल.
- अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा मुळ रहिवाशी असला पाहिजे.
- या योजनेसाठी फक्त महाराष्ट्र राज्यातील मुलीच पात्र असतील.
- अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे १ लाखापेक्षा कमी असायला हवे.
- राज्यातील पिवळ्या तसेच केशरी रेशनकार्ड धारक कुटुंबच या योजनेचा फायदा घेऊ शकतात.
- अर्जदार हि मुलगी असायला हवी.
- अर्जदार मुलीचा जन्म हा १ एप्रिल २०२३ नंतर झालेला असायला हवा.
- अर्जदाराचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे आवश्यक.
- या योजनेचा लाभ हा वय वर्ष १८ पर्यंत घेता येईल.
लेक लाडकी योजनेची सुरुवात कधी झाली ?
लेक लाडकी योजनेची सुरुवात हि २०२३-२०२४ अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली.
[दिनांक:३० ऑक्टोबर २०२३].
महाराष्ट्र सरकार योजना २०२४ :
लेक लाडकी योजना महाराष्ट्र सरकार pdf
लेक लाडकी योजनेच्या अटी आणि शर्थी :
लेक लाडकी योजनेच्या अटी आणि शर्थी खालीलप्रमाणे –
- या योजनेचा लाभ हा पिवळ्या किंवा केशरी रेशनकार्ड धारकांच्या घरी जन्मलेल्या मुलींना होणार आहे.
- १ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या एक किंवा दोन मुलींना या योजनेचा लाभ घेता येतो.
- पिवळ्या किंवा केशरी रेशनकार्ड धारकांच्या घरी एक मुलगा आणि एक मुलगी असल्यास त्या मुलीला या योजनेचा फायदा घेता येईल.
- कुटुंबाचे वार्षिक आर्थिक उत्पन्न हे १ लाखापेक्षा कमी असावे.
- अर्जदार हा महाराष्ट्राचा मुळचा रहिवाशी असला पाहिजे.
- पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या तसेच दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी आवेदन अर्ज करत असतांना पालकांना कुटुंब नियोजन प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
लेक लाडकी योजेसाठी आवश्यक कागदपत्रे :
अर्जदार मुलीचे जन्म प्रमाणपत्र. |
पालकांचे आधार कार्ड. |
मुलीचा पालकांसोबत फोटो. |
रेशन कार्ड.[ पिवळे आणि केशरी ] |
उत्पन्न दाखला. |
जात प्रमाणपत्र. |
रहिवाशी दाखला. |
बँकेमध्ये खाते असणे आवश्यक. |
मोबाईल क्रमांक. |
इमेल आयडी. |
लेक लाडकी योजना PDF फॉर्म :
लेक लाडकी योजना PDF फॉर्म येथून डाऊनलोड करा.
लेक लाडकी योजनेसाठी अर्ज कसा कराल ?
लेक लाडकी योजनेसाठी अर्ज कसा करावा याची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.खाली दिलेल्या पायऱ्यांचा अवलंब करून तुम्ही यशस्वीरीत्या अर्ज करू शकता.
- २०२३-२०२४ अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री मान्य.श्री.देवेंद्र फडवणीस यांनी सादर केलेल्या लेक लाडकी योजनेसाठी तुम्ही अर्ज ऑफलाईन पद्धतीने कि ऑनलाईन पद्धतीने भरू याची अद्यापही घोषणा झालेली नाही आहे.
- परंतु अर्ज करण्याची पद्धत लवकरच सरकारद्वारे जाहीर करण्यात येईल.
- अर्ज प्रक्रिया चालू चालू झाल्यांनतर तुम्हाला आमच्या अधिकृत संकेतस्थळावर त्याची माहिती दिली जाईल.आमच्या अधिकृत संकेतस्थळाला तुमच्या बुकमार्क मध्ये सेव करून ठेवा.
- अर्ज प्रक्रिया सुरु होण्याआधी वर दिलेल्या आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करून ठेवावी म्हणजे अर्ज करतेवेळी धावपळ होणार नाही.
- अर्ज भरतांना विचारलेली माहिती अचूक तसेच योग्यरीत्या भरा.
- योग्य ती कागदपत्रे व त्यांच्या प्रती जोडा.
सतत विचारलेले जाणारे प्रश्न [FAQ] :
लेक लाडकी योजना कोणत्या राज्यासाठी लागू आहे?
उत्तर:
लेक लाडकी योजना हि महाराष्ट्र राज्यासाठी आहे.
लेक लाडकी योजन कोणत्या वर्षी चालू करण्यात आली ?
उत्तर:
लेक लाडकी योजना हि सन २०२३-२०२४ साली चालू करण्यात आली आहे.
लेक लाडकी योजनेसाठी पात्रता काय आहे ?
उत्तर:
पिवळ्या तसेच केशरी कार्डधारक कुटुंबामध्ये जन्मलेली मुलगी.
लेक लाडकी योजनेंतर्गत किती लाभ मिळतो ?
उत्तर:
लेक लाडकी योजनेंतर्गत पिवळ्या तसेच केशरी कार्डधारक कुटुंबामध्ये जन्मलेल्या मुलीला एकूण १,०१,०००/- लाभ घेता येतो.