कडबा कुट्टी मशीन योजना महाराष्ट्र (२०२४) | मिळणार ५०% अनुदान . Kadaba Kutti Machine Yojana 2024.असा करा अर्ज.

marathiyojanainfo.com
10 Min Read
कडबा कुट्टी मशीन योजना महाराष्ट्र (२०२४) | मिळणार ५०% अनुदान . Kadaba Kutti Machine Yojana 2024.असा करा अर्ज.

कडबा कुट्टी मशीन योजना महाराष्ट्र २०२४

कडबा कुट्टी मशीन योजना महाराष्ट्र २०२४|KADABA KUTTI MACHINE YOJANA 2024 : भारत हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो.देशातील जवळपास ५४ % लोक हे शेती करत असून त्यांचे जीवन शेतीवरच अवलंबून आहे.देशातील बहुतांश शेतकरी हे शेतीस पूरक तसेच शेतीस जोडव्यवसाय म्हणून दुग्धव्यवसाय,कुकुटपालन,शेळीपालन इत्यादी व्यवसाय करत असतात. महाराष्ट्र राज्यात जवळपास दीड कोटी शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे.राज्यातील शेतकरी शेतीस पूरक व्यवसाय म्हणून शेतीबरोबर दुग्धव्यवसायामध्ये उतरू लागला आहे.महाराष्ट्र राज्य सरकार नेहमीच राज्यातील शेतकऱ्यांसाठी तसेच पशुपालकांसाठी  नेहमीच नवनवीन उपक्रम राबवत असते.जेणेकरून शेतकरी ,पशुपालक यांना व्यवसाय करण्यास प्रोत्साहन तसेच त्यांना त्याच्या आर्थिक आलेखामध्ये वृद्धी करता यावी.महाराष्ट्र राज्यामध्ये ग्रामीण भागांमध्ये बहुतांश नागरिक हे शेतीवरच अवलंबून आहेत.शेतातून मिळणाऱ्या चाऱ्याचा उपयोग शेतकरी त्यांच्या पशुपालन या व्यवसायामध्ये करत असतात.शेतातून मिळणारा चार हा लांब तसेच मोठ्या उंचीचा असल्यामुळे तो जास्त जागा घेऊन शेतकऱ्याच्या जागा व्यवस्थापनामध्ये अडथळा निर्माण करतो.चाऱ्याची उंची जास्त असल्यामुळे त्याचे लहान भाग करून तो जनावरांना द्यावा लागतो यासाठी खूप मेहनत तसेच यामध्ये जास्त मनुष्यबळ हि लागते.या पद्धतीमध्ये शेतकऱ्यास इजाही होऊ शकते.लहान भाग केलेला चार हा सम प्रमाणात नसल्याने जनावरांना खाण्यास त्रास होतो तसेच व्यवस्थितपणे रवंथ हि होत नाही.या सर्व गोष्टींवर उपाय म्हणून महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक उपक्रम किंवा योजना अंमलात आणली आहे.या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासापासून मुक्तता मिळणार आहे तसेच शेतकऱ्यांना आर्थिक मदतही होणार आहे.कारण महाराष्ट्र सरकारने शेतकरी तसेच पशुपालकांसाठी एक योजना सुरु केली आहे ,“कडबा कुट्टी मशीन योजना” असे या योजनेचे नाव असून या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना तसेच पशुपालकांना विजेवर चालणाऱ्या,चाऱ्याची सम प्रमाणात भाग करणारी कडबा कुट्टी घेण्यास ५० टक्के आर्थिक मदत होणार आहे.

Contents
कडबा कुट्टी मशीन योजना महाराष्ट्र २०२४ कडबा कुट्टी मशीन योजना थोडक्यात:कडबा कुट्टी मशीन योजना २०२४ उद्दिष्टे :कडबा कुट्टी मशीन योजना २०२४ वैशिष्टे :कडबा कुट्टी मशीन योजनेचे फायदे :कडबा कुट्टी मशीन योजना २०२४ पात्रता :कडबा कुट्टी मशीन योजना २०२४ आवश्यक कागदपत्रे :कडबा कुट्टी मशीन योजना २०२४| KADABA KUTTI MACHINE YOJANA 2024 अर्ज प्रक्रिया:कडबा कुट्टी मशीन योजना मराठी माहिती महाराष्ट्र २०२४ कडबा कुट्टी मशीन योजना काय आहे?कडबा कुट्टी मशीन योजनेचे उद्दिष्ट काय आहे?कडबा कुट्टी मशीन योजनेची पात्रता काय आहे?कडबा कुट्टी मशीन योजनेसाठी अर्ज कसा करायचा?कडबा कुट्टी मशीन योजनेसाठी अनुदान किती आहे?

विजेवर चालणारी कडबा कुट्टी हि शेतकरी तसेच पशुपालकांना एक वरदान आहे.विजेवर चालणारे कडबा कुट्टी मशीन हे एक यंत्र असून याद्वारे आपण पासुधानासाठी लागणारा चारा उदा: गवत,उस,कडबा,नेफिअर लहान लहान तुकड्यामध्ये करून जनावरांना खाद्यामध्ये देऊ शकतो.या मशीनची रचना अशी आहे कि याद्वारे आपण जनावरांना लागणारा चारा जलद गतीने तसेच हव्या त्या आकारामध्ये कुट्टी करून जनावरांना खायला देऊ शकतो.विजेवर चालणाऱ्या या यंत्रामुळे पशुपालक तसेच शेतकऱ्यांचा भरपूर वेळ तसेच श्रम देखील वाचणार आहे.तसेच यंत्राची बांधणी साधी आणि सोप्या पद्धतीची असल्यामुळे वापरण्यासाठी हि सोयीस्कर आहे.विजेवर चालणारे अनेक मोडेल्स बाजारामध्ये उपलब्घ आहेत.पारंपारिक पद्धतीमुळे शेतकरी तसेच पशुपालक यांना इजा होण्याची शक्यता जास्त आहे.विजेवर चालणारे कडबा कुट्टी यंत्र हे अतंत्य सुरक्षित असल्यामुळे शेतकरी बांधवाना याचा कोणताही दुष्परिणाम नाही.कडबा कुट्टी मशीन हे शेतकरी तसेच पशुपालकांना एक अत्याधुनिक अत्यावश्यक यंत्र आहे जे कुट्टी करण्यास एक उत्तम साधन आहे.

कडबा कुट्टी मशीन योजना थोडक्यात:

योजनेचे नाव कडबा कुट्टी मशीन योजना
कोणी सुरु केली केंद्र व राज्य सरकार
विभाग पशुसंवर्धन विभाग
लाभार्थीराज्यातील शेतकरी
लाभ ५० ते ८० टक्क्यांपर्यंत अनुदान
उद्देश पशुपालानामध्ये यांत्रिकी करणास
आर्थिक सहाय्य करणे.
अर्ज प्रक्रिया ऑनलाईन / ऑफलाईन
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा.
कडबा कुट्टी मशीन योजना थोडक्यात

कडबा कुट्टी मशीन योजना २०२४ उद्दिष्टे :

कडबा कुट्टी मशीन योजना २०२४ उद्दिष्टे खालीलप्रमाणे :-

  • आर्थिक सहाय्य आणि अनुदान उपलब्धता :
    • कडबा कुट्टी योजनेंतर्गत पशुपालक तसेच शेतकऱ्यांना महाराष्ट्र राज्य सरकारकडून कडबा कुट्टी यंत्रासाठी आर्थिक सहाय्य तसेच अनुदान उपलब्ध करून देणे.
    • आर्थिक सहाय्य तसेच अनुदान या बाबींमुळे शेतकरी तसेच पशुपालक यांचा कडबा कुट्टी वर होणारा आर्थिक भार कमी होण्यास मदत होणार आहे.
    • कडबा कुट्टी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ५०% पर्यंत अनुदान दिले जाते.
  • शेती व पशुपालनामध्ये यांत्रिकीकरणास प्रोत्साहन :
    • पशुपालनामध्ये विजेवर चालणाऱ्या कडबा कुट्टी मशीन ला अनुदान तसेच आर्थिक सहाय्य करून लहान तसेच मध्यमवर्गीय शेतकऱ्यांना यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देणे.
    • पशुपालनामध्ये विजेवर चालणाऱ्या कडबा कुट्टी या अत्याधुनिक यंत्राचा वापर करून पशुपालक आपल्या उत्पादनामध्ये तसेच उत्पन्नामध्ये वाढ करू शकतात.
  • उत्पादन वाढ:
    • शेती तसेच पशुपालनामध्ये कडबा कुट्टी मशीनचा वापर करून पशुपालक पशूंना जलद गतीने तसेच हवा तसा चारा उपलब्ध करून त्यांच्या उत्पादनामध्ये वाढ करू शकतात.
    • या यंत्रामुळे चारा कुट्टी करण्याची पद्धत हि सुलभ होते आणि उत्पादन वाढीमध्ये याची मदत होते.
    • पशुपालानासाठी आवश्यक असलेला तसेच उच्च गुणवत्ता पूर्ण चाऱ्याची मागणीही पूर्ण होते.
    • अत्यावश्यक मनुष्यबळ कमी होऊन उत्पन्नामध्ये वाढ होते.

लेक लाडकी योजना-महाराष्ट्र राज्य २०२४ | Lek Ladaki Yojana 2024.सरकार करणार मुलींना १,०१,०००/- रुपयांची आर्थिक मदत |असा करा अर्ज.

कडबा कुट्टी मशीन योजना २०२४ वैशिष्टे :

कडबा कुट्टी मशीन योजना २०२४ वैशिष्टे खालीलप्रमाणे :-

  • कडबा कुट्टी मशीन योजनेमुळे पशुसांठी लागणारा चार जलद गतीने तसेच अचूकरित्या कुट्टी करून दिला जातो.
  • कडबा कुट्टी मशीन योजनेमुळे पशुपालक तसेच शेतकरी यांचा वेळ तसेच परिश्रम कमी होईल.
  • कडबा कुट्टी मशीनची बांधणी हि टिकाऊ आणि मजबूत असल्यामुळे देखभाल खर्चही कमी येतो.
  • विद्युत मोटारवर चालणारे यंत्र उपलब्ध.
  • कडबा कुट्टी मशीन योजनेमुळे पशुपालकांना सुरक्षित तसेच वापरण्यास सोयीस्कर कुट्टी यंत्र मिळते.

कडबा कुट्टी मशीन योजनेचे फायदे :

कडबा कुट्टी मशीन योजनेचे फायदे खालीलप्रमाणे आहेत :

कडबा कुट्टी मशीन योजनेअंतर्गत राज्यातील शेतकरी तसेच पशुपालकांना आर्थिक सहाय्य तसेच अनुदान उपलब्ध होते.

५० % पर्यंतचे अनुदान हे कडबा कुट्टी मशीन योजनेअंतर्गत राज्यातील शेतकरी तसेच पशुपालकांना मिळणार आहे.

या योजनेंतर्गत मिळणारे अनुदान हे थेट शेतकरी किंवा पशुपालक यांच्या बँक खात्यामध्ये “डी बी टी” प्रणालीद्वारे पाठवले जाणार.

कडबा कुट्टी मशीन योजनेचा लाभ घेऊन शेतकरी पशुधनासाठी जलद गतीने तसेच अचूकरीत्या चार उपलब्ध करू शकतात.

या योजनेचा मुख्यता फायदा हा ज्या पशुपालकांची आर्थिक स्थिती हि कमजोर आहे.

कडबा कुट्टी मशीन योजनेसाठी शेतकरी ऑफलाईन तसेच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

 कडबा कुट्टी मशीन योजनेचा लाभ घेऊन शेतकरी तसेच पशुपालक आपल्या उत्पादनामध्ये वाढ करून आपली आर्थिक परिस्थिती सुधारू शकतात तसेच ते स्वावलंबी बनू शकतात.

कडबा कुट्टी मशीन योजना २०२४ पात्रता :

कडबा कुट्टी मशीन योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असल्यास खाली दिलेल्या पात्रता तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील.

  • अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असला पाहिजे.
  • अर्जदार हा महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील रहिवाशी असला पाहिजे.
  • अर्जदाराकडे कमीत कमी २ पशुधन असणे अनिर्वाय असेल.
  • अर्जदाराकडे १० एकर पेक्षा कमी जमीन असणे आवश्यक.
  • ज्या शेतकऱ्यांचे तसेच पशुपालकांचे वार्षिक उत्पन्न हे 2 लाखापेक्षा कमी आहे असेच शेतकरी किंवा पशुपालक या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
  • कडबा कुट्टी योजनेसाठी अर्जदार पशुपालकाचे बँक खाते हे आधार कार्डशी सलंग्न असणे आवश्यक.

कडबा कुट्टी मशीन योजना २०२४ आवश्यक कागदपत्रे :

कडबा कुट्टी मशीन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे :-

आधार कार्ड 
रहिवाशी दाखला 
उत्पन्नाचा दाखला 
७/१२ उतारा
बँक खातेबुक
पासपोर्ट आकाराचा फोटो 
मोबाईल क्रमांक
इमेल आयडी
कडबा कुट्टी खरेदीपत्र
पशुधनाचा विमा प्रमाणपत्र
कडबा कुट्टी मशीन योजना २०२४ आवश्यक कागदपत्रे :

कडबा कुट्टी मशीन योजना २०२४| KADABA KUTTI MACHINE YOJANA 2024 अर्ज प्रक्रिया:

कडबा कुट्टी मशीन योजनेसाठी ऑनलाईन तसेच ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतो तर चला पाहूया काय आहे अर्ज करण्याची प्रक्रिया.

कडबा कुट्टी मशीन योजना २०२४ अर्ज प्रक्रिया

जर तुम्ही कडबा कुट्टी मशीन योजनेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू इच्छीत तर तुम्ही खाली दिलेल्या पायऱ्यांचा अवलंब करावा लागेल.

  • सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. –
  • अधिकृत संकेतस्थळ :-  https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login
  • तुमच्या समोर होम पेज उघडेल.
  • होमपेज वर कडबा कुट्टी मशीन योजनेसाठी “NEW REGESTRATION”/ “नवीन नोंदणी “ या पर्यायावर क्लिक करा.
  • नवीन नोंदणीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला “LOGIN ” करण्यासाठी आयडी आणि पासवर्ड तुमच्या इमेल आयडी वर येईल.
  • योग्य ती आयडी आणि पासवर्ड माहिती भरून यशस्वीरीत्या LOGIN करा.
  • LOGIN केल्यानंतर तुमच्या समोर एक योजना अर्ज उघडेल.
  • अर्जामध्ये विचारलेली माहिती योग्य तसेच अचूकरीत्या भरा.
  • अर्जामध्ये मागणी केलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करा.
  • अर्जामध्ये संपूर्ण माहिती तसेच कागदपत्रांची पूर्तता अचूकरीत्या केल्यानंतर “SUBMIT“या पर्यायावर क्लिक करा.
  • आता तुम्हाला नोंदणी क्रमांक मिळेल,त्या नोंदणी क्रमांकावरून तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती जाणून घेऊ शकता.
  • अशाप्रकारे तुमचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून पूर्ण होईल.

जर तुम्ही कडबा कुट्टी मशीन योजनेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू इच्छीत तर तुम्ही खाली दिलेल्या पायऱ्यांचा अवलंब करावा लागेल.

  • सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या जवळच्या कृषी कार्यालय ,किंवा ग्रामपंचायत,पंचायत समिती, जिल्हा परिषद या ठिकाणी कडबा कुट्टी मशीन योजनेसाठी लागणारा मागणी अर्ज घ्या.
  • मागणी अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती अचूकरीत्या भरा तसेच सर्व कागदपत्रे जोडा.
  • सर्व माहिती तसेच कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर तुम्ही जेथून अर्ज घेतला होता त्या ठिकाणी जमा करा.
  • तुमच्या अर्जाची महाराष्ट्र राज्य अधिकृत विभागाकडून तपासणी होईल.
  • तपासणी यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर अनुदानित रक्कम तुमच्या दिलेल्या खात्यामध्ये जमा होईल.

कडबा कुट्टी मशीन योजना मराठी माहिती महाराष्ट्र २०२४

कडबा कुट्टी मशीन योजना काय आहे?

उत्तर:
कडबा कुट्टी मशीन योजना हि एक महाराष्ट्र सरकारद्वारे चालू केलेली योजना असून यामध्ये शेतकरी तसेच पशुपालक यांना कडबा कुट्टी मशीन घेण्यास अनुदान प्रदान केले जाते.
.

कडबा कुट्टी मशीन योजनेचे उद्दिष्ट काय आहे?

उत्तर:
शेतकरी तसेच पशुपालकांना पशुपालन करण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देणे जेणेकरून त्यांच्या उत्पादनामध्ये वाढ होईल.
.

कडबा कुट्टी मशीन योजनेची पात्रता काय आहे?

उत्तर:
या योजनेसाठी छोटे व मध्यम आकाराचे शेतकरी तसेच पशुपालक पत्र आहेत.
.

कडबा कुट्टी मशीन योजनेसाठी अर्ज कसा करायचा?

उत्तर:
कडबा कुट्टी मशीन योजनेसाठी अर्ज हा ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने करता येतो.
.

कडबा कुट्टी मशीन योजनेसाठी अनुदान किती आहे?

उत्तर :
कडबा कुट्टी मशीन योजनेसाठी अनुदान हे विविध बाबींवर अवलंबून आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *