अण्णासाहेब पाटील कर्ज योजना महाराष्ट्र २०२४:
Annasaheb Patil Loan Scheme 2024|अण्णासाहेब पाटील कर्ज योजना महाराष्ट्र २०२४ आता मिळावा व्यवसायासाठी बिनव्याजी १० ते ५० लाखापर्यंतचे कर्ज.तरुणांसाठी सुवर्णसंधी.
भारत देश हा युवा राष्ट्र किंवा तरुणांचा देश म्हणून जगभरामध्ये ओळखला जातो.सन २०२२ च्या अहवालानुसार भारत देशामध्ये लोकसंखेच्या[१४० कोटी] एकूण जवळपास ५४% लोखसंख्या हि युवा किंवा तरुण आहेत.पण देशामध्ये तरुण बेरोजगारीचे प्रमाण हि तितकेच आहे म्हणून केंद्र सरकार तसेच राज्य सरकार नेहमीच देशातील तरुणांसाठी नवनवीन उपक्रम घेऊन येत असते.या उपक्रमांअंतर्गत देशातील तरुणांनी विविध योजनांचा फायदा घेऊन आत्मनिर्भर बनून देशातील बेरोजगार तरुणांना रोजगार निर्माण करून देणे,त्यांना सक्षम बनवने आणि देश्याच्या प्रगतीमध्ये हातभार लावणे हा सरकारचा मानस आहे.देशातील अपुऱ्या मनुष्यबळावर विचार करता या उपकाक्रांद्वारे या समस्येला आपण कमी करू शकतो.तसेच तरुणांना त्यांचा स्वतःचा व्यवसाय उभारणीस आर्थिक सहाय्य करणे,तरुणांना प्रशिक्षित करणे,कुशल बनवणे,तसेच आर्थिक सक्षम बनवणे हा या उपक्रमांचा उद्देश आहे.युवा वर्गाला आर्थिक सक्षम तसेच त्यांचा नवनवीन व्यवसाय करता यावेत याकरिता महाराष्ट्र राज्य सरकार तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ यांच्यामार्फत एक योजना सुरु करण्यात आली आहे.या योजनेंतर्गत राज्यातील तरुणांना आर्थिक साहाय्य केले जाते .आर्थिक सहाय्य जवळपास १० लाख ते ५० लाखांपर्यंत असून हि रक्कम तरुण बिनव्याजी वापरून आपला व्यवसाय सुरु करू शकतात.तर चला पाहूया काय आहे हि महाराष्ट्र सरकार तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ यांची योजना.या आणि अश्याच प्रकारच्या योजनांच्या तसेच सरकारी अपडेट साठी आमच्या अधिकृत संकेतस्थळा ला तुमच्या बुकमार्क मध्ये सेव करा.
महाराष्ट्र राज्य सरकार तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ यांच्यामार्फत “अण्णासाहेब पाटील कर्ज योजना “सुरु करण्यात आली आहे.या योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्यातील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या तसेच जे युवक व्यवसाय करू इच्छितात अश्या तरुणांना बिनव्याजी जवळपास १० लख ते ५० लाखापर्यंतचे कर्ज स्वरुपात आर्थिक सहाय्य केले जाते.तर चला पाहूया काय आहे योजना.
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना थोडक्यात :
योजनेचे नाव | अण्णासाहेब पाटील कर्ज योजना २०२४ |
कोणी सुरुवात केली | कौशल्य विकास व उद्योजकता विकास विभाग |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील नागरिक |
लाभ | १० ते ५० लाखापर्यंत आर्थिक सहाय्य |
उद्देश | राज्यातील तरुणांना व्यवसायासाठी कर्ज साहाय्य. |
अर्ज पद्धत | ऑनलाईन |
अधिकृत संकेतस्थळ | https://udyog.mahaswayam.gov.in/ |
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना उद्दिष्ठे
⦿ तरुणांना / तरुणींना व्यवसायासाठी प्रोत्साहन देणे : अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेचे ग्रामीण तसेच शहरी भागातील शिक्षित युवक व युवतींना व्यवसाय सुरु करण्यास प्रोत्साहन देणे हा मुख्य उद्देश आहे.या योजनेंतर्गत युवक तसेच युवतींना कर्ज उपलब्घ करून त्यांना व्यवसायाकडे वळवणे तसेच त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्घ करून देणे.
⦿ आर्थिक सहाय्य:
महाराष्ट्र राज्यातील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या तरुण-तरुणींना जवळपास १० लाख ते ५० लाखांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाते जेणेकरून तरुण तसेच तरुणी स्वतःचा व्यवसाय उभा करून समाजातील इतर बेरोजगार नागरिकांना रोजगार उपलब्ध करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे.या कर्जाच्या व्याजाची रक्कम हि सरकार कर्जदारास ठराविक दिवसांनी त्याच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते.
⦿ रोजगार निर्मिती :
आर्थिक सहाय्य सहजरीत्या तसेच बिनव्याजी उपलब्ध झाल्यामुळे नवनवीन उद्योग धंदे उदयास येतील त्यामुळे बेरोजगार नागरिकांना रोजगार सहजरीत्या उपलब्ध होऊन समाजातील बेरोजगारीचे प्रमाण कमी होईल.त्याचबरोबर प्रशिक्षित मनुष्यबळाचा पुरवठा होऊन मनुष्यबळाची कमतरता भरून काढली जाईल.
⦿ ग्रामीण तसेच शहराचा आर्थिक विकास :
अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेमुळे ग्रामीण तसेच शहरी भागामध्ये नवनवीन उद्योगांना चालना मिळाली जाते त्याचाच फायदा हा तेथील आर्थिक घडामोडीवर होतो.मोठ मोठ्या उद्योगापाठोपाठ लघु उद्योगांना हि बाजारपेठ मिळून मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होते.याचा फायदा तेथील स्थायिक नागरिकांना होतो.
⦿ तरुणांचा आर्थिक विकास :उद्योगांना चालना मिळाल्यामुळे समाजामध्ये नवनवीन रोजगार उपलब्ध होतील त्यामुळे बेरोजगार तरुणांना काम मिळून त्यांचा तसेच कुटुंबाचा आर्थिक विकास होईल.
अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेची वैशिष्ट्ये
अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे :
⦿अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेचा मुख्य तसेच प्रमुख्य उद्देश हा समाजातील बेरोजगार तरुणांना त्यांचा स्वतःचा व्यवसाय उभा करण्यासाठी आर्थिक मदत करणे.
⦿ या योजनेतून लाभार्थ्याला १० लाख ते ५० लाखांपर्यंतचे कर्ज मिळू शकते.
⦿ दिलेल्या कर्जावर सरकारकडून व्याज सवलत दिली जाते.
⦿दिलेल्या कर्जाच्या परतफेडीसाठी जवळपास ७ वर्षाचा कालावधी हा कर्जदाराला दिला जातो.
⦿ या योजनेमुळे समाजातील बेरोजगार तरुणांना त्यांचा व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन मिळते.
⦿ कर्ज मंजुरी नंतर येणारी कर्जाची रक्कम हि थेट कर्जदाराच्या खात्यामध्ये जमा केली जाते.
⦿ किमान १० वी उत्तीर्ण असलेला तरुण हि या योजनेसाठी अर्ज करू शकतो.
Annasaheb Patil Arthik Vikas Mahamandal Maryadit
अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेचे फायदे
अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेचे फायदे खालीलप्रमाणे :
⦿ कर्ज उपलब्धता :
राज्यातील बेरोजगार तसेच जे तरुण स्वतःचा व्यवसाय करू इच्छितात अश्या पात्र तरुणांना या योजनेंतर्गत बँकेमार्फत कमी व्याजदरामध्ये कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
⦿उद्योजक होण्याची संधी:
या योजनेंतर्गत मिळालेल्या कर्जाचा योग्य तो वापर करून लाभार्थी स्वतःचा व्यवसाय उभा करू शकतो.तो स्वतःबरोबर इतरानाही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून एक उत्तम उद्योजक बनू शकतो.
⦿ ग्रामीण तसेच शहरी भागातील तरुणांना सुवर्णसंधी :
हि योजना फक्त शहरापूर्ती सीमित नसून याचा लाभ राज्यातील कानाकोपऱ्यातील तसेच ग्रामीण भागातील सर्व तरुण तसेच तरुणी घेऊ शकतात.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत चालवण्यात येणाऱ्या योजना :
१.वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना
Annasaheb Patil Loan Scheme 2024|अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेची पात्रता
⦿ अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असला पाहिजे.
⦿ अर्जदार पुरुषाचे वय हे जास्तीत जास्त ५० तर महिलेचे वय हे ५५ असावे.
⦿ अर्जदाराकडे स्वतःचे आधार कार्ड असणे आवश्यक.
⦿ अर्जदाराकडे स्वतःचे मोबाईल क्रमांक असणे आवश्यक.
⦿ अर्जदाराचे बँक खाते हे आधार कार्ड शी सलग्न असावे.
अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड |
उत्पन्नाचा दाखला |
जातीचा दाखला |
रेशनकार्ड |
रहिवाशी दाखला |
वयाचा दाखला |
पासपोर्ट साईझचा फोटो |
मोबाईल नंबर |
प्रकल्प अहवाल |
ईमेल आयडी |
अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी अटी आणि शर्थी :
वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेसाठी अटी आणि शर्थी :
⦿ अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवाशी असावा.
⦿ अर्जदाराचे आधार कार्ड हे बँकेशी सलग्न असावा.
⦿ अर्जदार पुरुषाचे वय हे १८ ते ५० तर महिलांसाठी १८ ते ५५ असावे.
⦿ अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाच्या वेबपोर्टल वर नोंदणी असणे आवश्यक आहे.
⦿ अर्जदाराचे उत्पन्न हे निवडून दिलेल्या प्रमाणानुसार असावे.उदा: २.५ लाख
⦿ अर्जदार दिव्यांग असेल तर त्याच्याकडे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
⦿ अर्जदाराने यापूर्वी कधी या योजनेचा लाभ घेतला नसावा.
⦿ अर्जदाराची संबधित बँकेमध्ये कोणतीही थकबाकी नसावी.
⦿ या योजनेचा लाभ हा उमेदवाराला एकदाच घेता येणार आहे.
⦿ जर लाभार्थ्याने वेळेवर कर्ज फेड केली नाही तर व्याज परतावा मिळणार नाही.
गट कर्ज योजनेसाठी अटी आणि शर्थी :
गट कर्ज योजनेसाठी खालीलप्रमाणे गट पात्र असतील:
⦿ शासनमान्य बचत गट
⦿ भागिरथी संस्था
⦿ कंपनी
⦿ गटातील अर्जदार उमेदवाराने यापूर्वी कधी या योजनेचा लाभ घेतला नसावा.
⦿ गटातील उमेदवार कोणत्याही बँकेचा थकबाकीदार नसावा.
⦿ गटातील अर्जदार उमेदवाराने यापूर्वी कधी मंडळाच्या गट किंवा वैयक्तिक योजनेचा लाभ घेतला नसावा.
अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी अर्ज कसा करावा ?
नोंदणी प्रक्रिया :
अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी अर्ज करण्यासाठी प्रथमता अर्जदाराला नोंदणी करणे अनिवार्य आहे.त्याची पद्धत खालीलप्रमाणे आहे.
अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी अर्ज करण्यासाठी प्रथमता तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर जा.
तुम्हाला वेबसाईटच्या मुख्य पृष्ठावर “नोंदणी”पर्यायावर क्लिक करा.
तुमच्यासमोर नोंदणी करण्यासाठी एक नोंदणी अर्ज येईल त्यामध्ये विचारलेली माहिती योग्यरीत्या भरा.संपूर्ण माहिती भरल्यानंतर नोंदणी करा बटनावर क्लिक करा.
संपूर्ण माहिती योग्यरीत्या भरल्यानंतर तुमची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल.
नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला “USERNAME“आणि “PASSWORD“प्राप्त होईल.
मिळालेल्या “USERNAME“,”PASSWORD“आणि “CAPTCHA” चा वापर करून यशस्वीरीत्या “लॉगीन“करा.
लॉगीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमच्या समोर “अर्ज करण्यासाठी” असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.त्यानंतर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची निवड करून लागू करा बटनावर क्लिक करायचे आहे.
त्यानंतर तुम्हला तुमच्या समोर वैयक्तिक माहिती भरण्यासाठी एक पृष्ठ येईल त्यामध्ये तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे तसेच मागणी केलेली सगळी कागदपत्रे योग्यरीत्या अपलोड करायची आहे.
अश्याप्रकारे संपूर्ण विचारलेली माहिती तसेच कागदपत्रे यशस्वीरीत्या अपलोड केल्यानंतर तुमचा अर्ज यशस्वीरीत्या भरला जाईल.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ थोडक्यात माहिती-
मंडळाचे नाव | अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ |
मंडळाची स्थापना | २७ नोव्हेंबर १९९८ |
राज्य | महाराष्ट्र राज्य. |
मंडळाचा उद्देश | राज्यातील आर्थिक मागास घटकांचा विकास घडवून देणे. |
शासन विभाग | आर्थिक कल्याण विभाग. |
लाभार्थी | महामंडळाद्वारे जाहीर केलेल्या पात्रतेनुसार पात्र उमेदवार |
लाभ | ५० लाखांपर्यंत कर्ज परतावा. |
मंडळाद्वारे राबवण्यात येणाऱ्या योजना | १. वयक्तिक कर्ज व्याज परतावा. २. गट कर्ज व्याज परतावा. ३. गट प्रकल्प कर्ज व्याज परतावा. |
अर्ज करण्याची पद्धत | अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करणे. |
मुख्य कार्यालयीन पत्ता | अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित. जी. टी. हॉस्पिटल कंपाउंड, बर्रुद्दिन तय्यब्बजी मार्ग, जे. जे स्कूल ऑफ आर्ट्स च्या पाठीमागे, सी.एस.टी स्टेशन जवळ.मुंबई 400001 |
महाराष्ट्र राज्य सरकारच्या योजना २०२४:
सतत विचारले जाणारे प्रश्न :
१. अण्णासाहेब पाटील कर्ज योजना काय आहे ?
उत्तर :
राज्यातील बेरोजगार तरुण तसेच ज्यांना आपला स्वतःचा व्यवसाय करायचा आहे अश्या तरुणांना कर्ज पुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारचा एक उपक्रम आहे.
.
२. अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी अर्ज कसा करावा ?
उत्तर:
अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी अर्ज करण्यासाठी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा.
.
३. अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी कर्ज फेडीचा कालावधी किती आहे ?
उत्तर:
अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी कर्ज फेडीचा कालावधी हा ५ ते ७ वर्षापर्यंत असू शकतो.
.
४. अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ?
उत्तर:
आधार कार्ड
उत्पन्नाचा दाखला
जातीचा दाखला
रेशनकार्ड
रहिवाशी दाखला
वयाचा दाखला
पासपोर्ट साईझचा फोटो
मोबाईल नंबर
प्रकल्प अहवाल
ईमेल आयडी
.
५. अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी कोणत्या वेबसाईट वर अर्ज करू शकतो ?
उत्तर:
मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतो.
https://udyog.mahaswayam.gov.in/
100000