APANG PENSION YOJANA 2024 MAHARASHTRA |अपंग पेन्शन योजना महाराष्ट्र राज्य २०२४ फायदे,पात्रता,अर्ज कसा करायचा ? .

marathiyojanainfo.com
8 Min Read
अपंग पेन्शन योजना महाराष्ट्र राज्य २०२४ | फायदे,पात्रता,अर्ज कसा करायचा ? APANG PENSION YOJANA 2024 MAHARASHTRA.

अपंग पेन्शन योजना महाराष्ट्र राज्य २०२४

APANG PENSION YOJANA 2024 MAHARASHTRA|अपंग पेन्शन योजना महाराष्ट्र राज्य २०२४|फायदे,पात्रता,अर्ज कसा करायचा ?. महाराष्ट्र सरकार प्रत्येक घटकातील प्रत्येक व्यक्तीसाठी नेहमीच नवनवीन योजना अमंलात आणत आहे. महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक अपंग व्यक्ती,अपंग महिला,अपंग तरुण,अपंग मुले यांसाठी सरकारने अपंग पेन्शन योजना [APANG PENSION YOJANA MAHARASHTRA 2024] योजना  सुरु केली आहे .  या योजनेमुळे राज्यातील प्रत्येक अपंग व्यक्तीला आर्थिक मदत होणार आहे.महाराष्ट्र सरकार सदैव अपंग कल्याण योजना अंमलात घेऊन येत असते त्यामधील हि एक फायेदिशीर योजना. तर चला पाहू काय आहेत या योजनेचे फायदे,काय आहे पात्रता ,अर्ज कसा करायच.केंद्र सरकारने फेब्रुवारी २००९ साली अपंगत्व योजनेला प्रारंभ केला होता ,या योजनेमध्ये १८ वर्षा खालील  तसेच ८०% अपंग असलेले अपंग व्यक्ती या योजनेसाठी पात्र असतील आणि तेच व्यक्ती या योजनेसाठी अर्ज करू शकतील हि योजना प्रामुख्याने अपंगांना आर्थिक तसेच सामाजिक आधार देण्यासाठी चालू केली गेली होती.राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमांतर्गत चालू करण्यात आलेल्या या योजनेतून अपंगाना आर्थिक मदत प्रदान करण्यात येते .
जर तुम्ही दिव्यांग असाल आणि तुम्हाला या योजनेचा पुरेपूर फायदा करून घ्यायचा असेल तर तर तुम्ही बिनधास्त या योजनेसाठी अर्ज करू शकता .  तुम्हाला जर योग्य त्या पद्धतीने अर्ज करायचा असेल तर तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा .यामध्ये आम्ही तुम्हाला अर्जा साठी कोण कोणते कागदपत्रे लागतात त्याचबरोबर हा अर्ज कसा कसा करायचा याची पुरेपूर माहित यामध्ये आम्ही दिली आहे .या योजनेमध्ये किती रक्कम मिळते ,ती कशी भेटते ,वायोमार्यादा त्याचबरोबर आणखी काही गोष्टी आम्ही तुम्हाला या लेखामध्ये सांगणार आहोत तर हा लेख तुम्ही शेवटपर्यंत वाचा

अपंग पेन्शन योजना महाराष्ट्र राज्य २०२४ उद्देश

या योजनेचा प्रमुख उद्देश असा आहे कि ,राज्यातील प्रत्येक विकलांग किंवा अपंग व्यक्तीला आर्थिक मदत करणे.अपंग व्यक्तीना इतर व्यक्तींवर अवलंबून राहावे लागते त्यामुळे ते आपला आत्मविश्वास हरवून बसतात .त्यासाठीच सरकारचा हा उपक्रम आहे कि ज्या अपंग व्यक्ती आपला आत्मविश्वास हरवून बसलेले आहेत त्यांना आपल्या दररोजच्या इतर खर्चांसाठी किंवा कुटुंबाचा उदरनिर्वाहासाठी आर्थिक मदत करणे.या योजनेमुळे अपंग व्यक्तींना इतर व्यक्तीकडे मदतीसाठी हात पसरावायची गरज पडणार नाही . कारण महाराष्ट्र सरकार आता प्रत्येक अपंग व्यक्तीला दर महिना ६०० रुपयांची मदत करणार आहे .

अपंग पेन्शन योजना महाराष्ट्र राज्य २०२४ उद्दिष्टे

  • अपंग पेन्शन योजना या योजनेतून राज्य सरकार लाभार्थ्याला प्रती महिना ६०० रुपये प्रदान करते .या निधीचा वापर करून अपंग किंवा विकलांग व्यक्ती आर्थिक स्वातंत्र्य मिळवू शकतो त्याचबरोबर तो त्याच्या दैनंदिन जीवनात लागणाऱ्या जवळपास संपूर्ण गरजा भागवू शकतो.
  • या योजनेचा वापर करून अपंग किंवा दिव्यांग व्यक्ती समाजामध्ये प्रतिष्ठा मिळवू शकतो.
  • या योजनेचा मुख्य हेतू हा आहे कि,अपंग किंवा दिव्यांग व्यक्ती हि स्वावलंबी व्हावी आणि त्याचे जीवन सुखमय जगावे .
  • अपंग पेन्शन योजनेमुळे अपंग किंवा दिव्यांग व्यक्तीला समाजामध्ये आत्मविश्वास आणि सन्मानाने जगता यावे.
  • अपंग पेन्शन योजनेचा फायदा घेऊन अपंग किंवा दिव्यांग एखादा लघुउद्योग चालू करू शकते आणि आपले व आपल्या कुटुंबाचे आर्थिक जीवन सुधारू शकते.
  • अपंग पेन्शन योजनेचा फायदा घेऊन अपंग किंवा दिव्यांग व्यक्ती कुटुंबावरील आर्थिक भार कमी करू शकते.
  • अपंग पेन्शन योजनेचा फायदा घेऊन अपंग किंवा दिव्यांग व्यक्ती आपले आरोग्य सुधारू शकते.
    • उदा : नियमित व्यायाम करणे ,चांगला आहार घेणे , आरोग्याशी निगडीत उपकरणे घेणे इत्यादी.

अपंग पेन्शन योजना महाराष्ट्र राज्य २०२४ फायदे

  • राज्यातील अपंग व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे .
  • या योजनेमुळे अपंग व्यक्तींना रोजगार उपलब्ध होणार आहे त्याचबरोबर ते आपली उपजीविका चालवू शकतात .
  • लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याकाठी ६०० प्रदान केले जातील .
  •  या योजनेसाठी ८० % अपंगत्व असलेले व्यक्ती अर्ज करून या योजनेचा फायदा घेऊ शकणार आहेत .
  • या योजनेमधून भेटणारी राशी सरळ लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये दिली जाणार आहे त्यामुळे लाभार्थ्याचे बँक खाते असणे अनिर्वाय आहे .
  • जर तुम्हाला ऑफ लाईन अवेदन करायचे असेल तर तुम्ही PDF फॉर्म डाऊनलोड करू शकता .
  • जर तुम्हाला ऑनलाईन आवेदन करायचे असेल तर तुम्ही सरकारची अधिकृत वेब साईट आहे त्यावर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता .
  • जर तुम्हाला आवेदन करता येत नसेल तर तुम्ही जवळच्या महा -ई सेवा केंद्रावर जाऊन आवेदन करू शकतो .

अपंग पेन्शन योजना महाराष्ट्र राज्य २०२४ आवश्यक कागदपत्रे

  • ८० % अपंगत्व असलेले प्रमाणपत्र 
  • रहिवाशी दाखला 
  • ओळखपत्र 
  • आधार कार्ड 
  • आयु प्रमाणपत्र 
  • पासपोर्ट साईझ फोटो 
  • बँक खाते पासबुक
  • फोने नंबर [आधार कार्ड ला सलग्न असला पाहिजे.

अपंग पेन्शन योजना महाराष्ट्र राज्य २०२४ ऑनलाईन अर्ज कसा करावा?

जर तुम्हाला या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्ही खाली दिलेल्या स्टेप करून अर्ज करू शकता .

  • अर्ज करण्यासाठी सर्व प्रथम तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेब साईट जा .
  • त्यानंतर अपंग व्यक्ती रजिस्ट्रेशन यावर क्लिक करा .
  • क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर आवेदन फॉर्म येईल .
  • त्यामध्ये सर्व गोष्टींची पूर्तता केल्यानंतर तुमचा  फॉर्म  भरून पूर्ण होईल.

अपंग पेन्शन योजना महाराष्ट्र राज्य २०२४ ऑफलाईन अर्ज कसा करावा ?

  • तुम्हाला जर OFFLINE पद्धतीने अर्ज करायचा असेल तर तुम्ही जवळच्या तहसीलदार / जिल्हा अधिकारी कार्यालय  किंवा तालाठी कार्यालामध्ये जावे लागेल .
  • त्याठिकाणी जाऊन तुम्ही  अपंग पेन्शन योजने साठी लागणारा अर्ज मागणी  करून घ्या .
  • अर्जामध्ये  लागणार्‍या संपूर्ण बाबींची पूर्तता करा .आणि तो अर्ज संबंधित विभागामध्ये जमा करा .
  • तुमच्या अर्जाची पडताळणी होऊन तुम्हाला अपंग पेन्शन योजनेचा लाभ मिळेल.

महाराष्ट्र सरकार द्वारे चालवण्यात येणाऱ्या योजना :

भारत सरकार तसेच महाराष्ट्र सरकार द्वारे अपंग व्यक्तिंसाठीअनेक  योजना सुरु करण्यात आल्या आहेत.

सरकरी संस्थामध्ये अपंग व्यक्तीला शिक्षण आणि प्रशिक्षण योजना :
अपंग विद्यार्थ्यांना सरकारी शाळांमध्ये मोफत शिक्षण ,भोजन ,त्याचबरोबर त्यांना मोफत प्रशिक्षण दिले जाते .
योजनेचा फायदा वय वर्षे ६ ते  वय वर्षे १८ पर्यंत घेऊ शकतात .
त्याचबरोबर वय वर्षे १८ पूर्ण असलेल्या विकलांग विध्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण हि दिले जाते जेणे करून तो व्यक्ती स्वताच्या पायावर उभा राहू शकेल.
या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमचे अपंग प्रमान पत्र त्या सरकारी संस्थेमध्ये दाखवणे आवश्यक आहे .
या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर तुमचे अपंगत्व हे ४० % च्या वर असायला पाहिजे .

  • अपंग कल्याण राज्य पुरस्कार योजना
  • ग्राम पंचायत अपंग योजना 
  • अपंग शेतकरी योजना 
  • अपंग कर्ज योजना 
  • अपंग घरकुल योजना 
  • फिरत्या वाहनावरील दुकान 
  • सूक्ष्म पतपुरवठा योजना 
  • युवा स्वावलंबन योजना 
  • केंद्र सरकार द्वारे चालवण्यात येणाऱ्या योजना:
  • वाहतूक व्यायासायाठी वाहतूक कर्ज योजना 
  • महिला समृद्धी योजना 
  • सूक्ष्म पतपुरवठा योजना
  • युवा स्वावलंबन योजना
  • शैक्षणिक कर्ज योजना 
  • ADIP योजना 

महाराष्ट्र राज्य सरकारच्या योजना २०२४

1. कुसुम सोलर पंप योजना २०२४ महाराष्ट्र राज्य |Kusum Solar Pump 2024 Maharashtra.ऑनलाईन अर्ज,पात्रता,लाभ.आजच अर्ज करा आणि वीजबिलातून मुक्त व्हा.
2. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना 2024 महाराष्ट्र | pradhan mantri jeevan jyoti bima yojana.फक्त ₹ ४३६मध्ये मिळवा विमा संरक्षण.जाणून घ्या संपूर्ण माहिती .
3. Tractor Anudan Yojana 2024.ट्रॅक्टर अनुदान योजना २०२४ महाराष्ट्र राज्य | आता सरकार करणार  ट्रॅक्टर घेण्यास ५०% मदत !पहा सविस्तर.
4. गाय गोठा अनुदान योजना २०२४ महाराष्ट्र राज्य |Gay Gotha Yojana 2024| नोंदणी चालू झाली. पहा अर्ज कसा करायचा एका क्लिक वर…
5. मुख्यमंत्री वयोश्री  योजना २०२४ महाराष्ट्र राज्य | Mukhyamantri Vayoshri Yojana 2024| जेष्ठ नागरिकांना मोठा दिलासा | जेष्ठ नागरिकांना मिळणार एकरकमी ३००० रुपये ! अर्ज,पात्रता ,कागदपत्रे पहा सविस्तर.

FAQ’s :

  • अपंगासाठी अपंग पेन्शन योजना काय आहे ?
  • अपंग प्रमाणपत्र किती टक्के असावे ?
  • सर्व संस्थामध्ये अपंग व्यक्तींसाठी किती टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत ?
  • विकलांग म्हणजे काय ?
  • ग्राम पंचायत अपंग योजना काय आहे ?
  • अपंग शेतकरी योजना काय आहे ?
  • अपंग कर्ज योजना काय आहे ?
  • अपंग घरकुल योजना काय आहे ?

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *