गाय गोठा अनुदान योजना २०२४ महाराष्ट्र राज्य
गाय गोठा अनुदान योजना २०२४ महाराष्ट्र राज्य|Gay Gotha Yojana 2024– नोंदणी चालू झाली | पहा अर्ज कसा करायचा एका क्लिक वर
महाराष्ट्र राज्य सरकार सैदवच जनतेचा विचार करून नवनवीन योजना लोकांपर्यंत पोहचवत असते.शेतकऱ्यांचा जोडधंदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुग्ध व्यवसायासाठी त्याचबरोबर शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी गाय गोठा अनुदान योजना चालु केली आहे .या योजनेचा प्रमुख हेतू हा आहे कि, प्रत्येक शेतकऱ्यांकडे आपल्या शेतीसाठी पूरक व्यवसाय म्हणून त्यांनी आपल्याकडे गाय,म्हैस,कोंबडी,शेळीपालन केलेलं असते,आपला भारत देशाला जवळपास उन्हाळा ,पावसाळा,आणि हिवाळा हे तीन ऋतू लाभलेले आहेत.प्रत्येक ऋतू मध्ये या जनावरांचे मानसिक आणि शाररीक संतुलन राहणे आवश्यक आहे . जर तसे नाही झाले तर बळीराजाचे आर्थिक गणित कोलमडून जाऊ शकते .याच सर्व बाबींचा विचार करून महाराष्ट्र सरकारने जनावरांचे संरक्षण व्हावे याकरिता २०२४ या वर्षात गाय गोठा अनुदान योजना चालू केली आहे.तर चला पाहूया काय आहे गाय गोठा अनुदान योजना ? कसा अर्ज करू शकता ? अवश्यक कागदपत्रे ,पात्रता एका क्लिक वर..
गाय गोठा अनुदान योजना २०२४ महाराष्ट्र राज्य – ग्रामीण भागामध्ये रोजगाराच्या संधी कमी प्रमाणात असल्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी रोजगाराच्या शोधामध्ये शहराकडे स्थलांतर करत आहे .याच गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र सरकाने ग्रामीण भागात शेतकरी स्व:ताचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह चालवावा म्हणून हि योजना चालू केली आहे .हि योजना महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत एकत्रीकरण करून हि योजना बनवण्यात आली आहे.त्याचबरोबर रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी केंद्राचा मनरेगा योजनेतूनही बांधकाम मजुरांना याचा फायदा होणार आहे. त्यामुळे हि योजना सर्वोतोपरी फायद्याची असणार आहे .शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा घ्यावा.आम्ही या लेखामध्ये गाय गोठा अनुदान योजना २०२४ महाराष्ट्र राज्य या योजनेची सविस्तर माहिती दिली आहे.तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचून तुमच्या मित्र शेतकऱ्यांना या योजनेची माहिती पाठवा जेणेकरून या योजनेचा फायदा सर्वांना होईल.
गाय गोठा अनुदान योजना महाराष्ट्र राज्य २०२४ थोडक्यात:
योजनेचे नाव | गाय गोठा अनुदान योजना महाराष्ट्र राज्य २०२४ |
शासन / राज्य | महाराष्ट्र शासन |
उद्देश | शेतकऱ्यांना पशुपालन करण्यास आर्थिक मदत तसेच दुग्ध व्यवसायास चालना देणे |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील शेतकरी . |
लाभार्थी रक्कम | १. २ ते ६ जनावरांच्या गोठा उभारणीसाठी- रुपये ७७ हजार १८८ २. ६ ते १२ जनावरांच्या गोठा उभारणीसाठी- रुपये १ लाख ५४ हजार ३. १८ पेक्षा जास्त जनावरांच्या गोठा उभारणीसाठी- रुपये २ लाख ३२ हजार |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन & ऑफलाईन. |
अधिकृत संकेतस्थळ | https://mahaegs.maharashtra.gov.in/ |
गाय गोठा अनुदान महाराष्ट्र राज्य २०२४ योजनेचा उद्देश :
- महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायासाठी आर्थिक पाठबळ देऊन त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करू देणे हा आहे .
- गाय गोठा अनुदान या योजनेचा मुख्य उद्देश असा आहे कि जनावरांसाठी पक्के छत किंवा शेड उभारणीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे .
- जनावरांचे उन्हाळा ,पावसाळा ,आणि हिवाळा या ऋतूपासून संरक्षण करणे .
- शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन आत्मनिर्भर करणे .
- शेतकरी वर्गाला दुग्ध व्यवसाय करण्यास प्रोत्साहन देणे.
गाय गोठा अनुदान महाराष्ट्र राज्य २०२४ योजना लाभार्थ्यास मिळणारे अनुदान
या योजनेसाठी वेगवेगळ्या जनावरांच्या गटासाठी वेगेवेगळ्या प्रमाणात अनुदान देण्यात आले आहे .या योजनेंतर्गत 2 ते ६ जनावरांच्या गोठा उभारणीसाठी एकूण रुपये ७७ हजार १८८ इतके अनुदान देण्यात येते .त्याचबरोबर ६ ते १२ जनावरांच्या गोठा उभारणीसाठी 2 ते ६ जनावरांच्या गोठा उभारणीसाठी एकूण लागणाऱ्यां रकमेपेक्षा दुप्पट अनुदान मिळणार आहे आणि १८ पेक्षा जास्त जनावरांच्या गोठा उभारणीसाठी एकूण तिप्पट रक्कम देण्यात येणार आहे.
गाय गोठा बांधणी आणि पद्धत कशी असावी ?
- गाय गोठा अनुदान योजनेसाठी महाराष्ट्र सरकारने काही नियमावली आखून दिली आहे ती खालीलप्रमाणे :
- २ ते ६ जनावरांच्या गोठयासाठी –
२६.९५ चौ .मी निवारा असावा आणि त्यासाठी लांबी ७.७० मी व रुंदी ३.५० मी असावी - २ ते ६ जनावरांच्या गव्हाणसाठी –
शासन निर्णयानुसार गोठ्याची गव्हाण हि ७.७ मी. × २. २ मी .×० .६५ मी . - मुत्र संचयासाठी २५० लिटर क्षमतेची टाकी बांधणेही आवश्यक आहे
- पिण्याच्या पाण्यासाठी त्याचबरोबर इतर खर्चासाठी २०० लिटर क्षमतेची टाकीही बांधणे आवश्य
गाय गोठा अनुदान महाराष्ट्र राज्य २०२४ योजना लाभार्थी प्रवर्ग पात्रता
- अनुसूचित जाती
- अनुसूचित जमाती
- भटक्या विमुक्त जमाती
- दारिद्र्य रेषेखालील इतर कुटुंब
- महिलाप्रधान कुटुंब
- भूसुधार योजनेचे लाभार्थी
- अल्पभूधारक शेतकरी
गाय गोठा अनुदान महाराष्ट्र राज्य २०२४ योजना अंतर्गत महत्वाच्या बाबी
१] लाभार्थ्याने स्वतःच्या जमिनीवर किंवा क्षेत्रावर कमीतकमी २० ते ५० फळझाडे /वृक्षलागवड केल्यानंतर : लाभार्थी हा गाय गोठा (छत विरहित ) या योजनेसाठी पात्र होऊ शकतो
2] लाभार्थ्याने स्वतःच्या जमिनीवर किंवा क्षेत्रावर कमीतकमी ५० पेक्षा जास्त फळझाडे /वृक्षलागवड केल्यानंतर : लाभार्थी हा गाय गोठा (छता सहित ) या योजनेसाठी पात्र होऊ शकतो
३] लाभार्थ्याने सार्वजनिक कामावर किमान १०० दिवस काम केले असल्यास : लाभार्थी हा छतासह गोठा या योजनेसाठी पत्र असेल .
4] या योजनेसाठी अर्ज करण्यासठी 2 ते ६ जनावरे असणे अवश्यक आहे .
५] अर्जदार हा पशुपालक असलेला पशुधन अधिकारी यांचा दाखला जोडणे आवश्यक .
६] अर्जदाराच्या कुटुंबाचे नरेगा प्रमाणपत्र असणे आवश्यक .
७] अर्जदाराच्या नावे जमीन किंवा क्षेत्र असणे आवश्यक .त्याचा ७/१२ ,व ८ अ जोडणे आवश्यक .
८] अर्जदार हा गावाचा रहिवाशी असणे अवश्यक असल्यास रहिवाशी प्रमाणपत्र जोडावे .
९] अर्जदाराचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे आवश्यक .
१०] ग्राम पंचायताचे शिफारस पत्र .
योजना मंजूर झालेनंतर आवश्यक फोटो / कागदपत्रे
- काम सुरु करण्यापूर्वीचा फोटो .
- काम चालू असतानाचा फोटो .
- काम पूर्ण झालेनंतर लाभार्थी आणि बोर्ड यांचा फोटो .
वरील सर्व फोटो हे अंतिम देयक प्रस्तावासोबत ७ दिवसात सदर करणे आवश्यक आहे .
गाय गोठा अनुदान महाराष्ट्र राज्य|Gay Gotha Yojana 2024|२०२४ योजना लाभार्थी
महाराष्ट्र राज्यातील शेतकरी त्याचबरोबर पशुपालक.
गाय गोठा अनुदान महाराष्ट्र राज्य २०२४ योजना अटी आणि शर्ती खालीलप्रमाणे :
- गाय गोठा अनुदान महाराष्ट्र राज्य २०२४ योजना फक्त महाराष्ट्रातील शेतकरी आणि पशुपालक यांसाठीच लागू असेल किंवा लाभ घेऊ शकतात.
- एका कुटुंबाला फक्त एकदाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
- अर्जदाराकडे कमीतकमी 2 ते ६ जनावरे असणे आवश्यक आहे.
- जनावरांचे टैगिंग आवश्यक असेल.
- अर्जदार पशुपालक असावा त्याला पशुपालनाचे योग्य ज्ञान आणि अनुभव असणे आवश्यक.
- अर्जदाराने शासकीय कामावर किमान १०० काम केलेले असावे .
- स्व:ताच्या क्षेत्रावर २० ते ५० फळझाडे किंवा वृक्षलागवड करणे आवश्यक.
गाय गोठा अनुदान महाराष्ट्र राज्य २०२४ योजनेसाठी लागणारी कागदपत्रे
- आधार कार्ड
- जनावरांचे टैगिंग असलेला दाखला
- रहिवाशी दाखला
- जातीचा दाखला
- कुटुंबाचे नरेगा ओळखपत्र ,ऑनलाईन जॉब कार्ड
- जमिनीचा ७/१२ व ८ अ आणि नमुना ९ चा उतारा
- बँक खात्याच तपशील
- ग्रामपंचायतीचे शिफारस पत्र
- मोबाईल नंबर
- ई -मेल आयडी
- पासपोर्ट आकाराचे फोटो
गाय गोठा अनुदान महाराष्ट्र राज्य २०२४ योजना PDF
FAQ’s :
- गाय गोठा अनुदान महाराष्ट्र राज्य २०२४ योजनेसाठी किती अनुदान आहे ?
- गाय गोठा अनुदान महाराष्ट्र राज्य २०२४ योजनेसाठी अर्ज कुठे करावा ?
- गाय गोठा अनुदान महाराष्ट्र राज्य २०२४ योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत ?
- गाय गोठा अनुदान महाराष्ट्र राज्य २०२४ योजनेसाठी अटी आणि शर्ती कोणत्या आहेत ?
- गाय गोठा अनुदान महाराष्ट्र राज्य २०२४ योजनेसाठी कोणत्या कागपत्रांची आवश्यकता आहे ?
महाराष्ट्र सरकार योजना :
Gay gotha anudan
Mu pimpalgaon khurd post warsa tal sakri Dist Dhule Maharashtra pin code 424306
अर्ज कधि करावा लागेल
धन्यवाद …..
पंचायत समितीच्या कृषी विभागामध्ये जाऊन या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कधी आहे याची पडताळणी करून अर्ज करावा.