कुसुम सोलर पंप योजना २०२४ महाराष्ट्र राज्य |Kusum Solar Pump 2024 Maharashtra.ऑनलाईन अर्ज,पात्रता,लाभ.आजच अर्ज करा आणि वीजबिलातून मुक्त व्हा.

marathiyojanainfo.com
9 Min Read
कुसुम सोलर पंप योजना २०२४ महाराष्ट्र राज्य |Kusum Solar Pump 2024 Maharashtra.ऑनलाईन अर्ज,पात्रता,लाभ.आजच अर्ज करा आणि वीजबिलातून मुक्त व्हा.

कुसुम सोलर पंप योजना २०२४ महाराष्ट्र राज्य – नमस्कार माझ्या बळीराजाला,शेतकरी बंधू-बघिणींना,आज आपण या लेखामध्ये केंद्र सरकारने शेतकर्यासाठी चालू केलेल्या योजनांची माहिती घेणार आहोत .केंद्र सरकार नेहमीच देशातील शेतकऱ्यानां नवनवीन योजना घेऊन येऊन उत्स्फूर्त करत असते.शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचा मोबदला मिळावा हाच त्यापाठीमागचा मुख्य उद्देश असतो.अशीच एक योजना सरकार देशातील शेतकऱ्यासाठी घेऊन आले आहे. “कुसुम सोलर पंप योजना/Kusum Solar Pump 2024 Maharashtra.” हे या योजनेचे नाव असून या योजनेमधून शेतकरी नैसर्गिक साधनसंपत्ती चा वापर करून आपल्या शेतीला अजून आधुनिक बनवू शकतात.देशात वाढणाऱ्या महागाईला आजचा शेतकरी तोंड देऊ शकत नाही ,म्हणूनच केंद्र सरकार तसेच राज्य सरकार यांनी शेतकऱ्यासाठी हि योजना अंमलात आणली आहे.? भारत हा कृषिप्रधान देश आहे ,त्याचबरोबर भारत देश हा जगातील सर्वात मोठा निर्यातदार देश आहे.आजच्या या युगात शेती आणि शेतकरी जगला तरच देशाला लागणारे बहुतांश अन्न त्याचबरोबर भाजीपाला योग्यरीत्या पुरवू शकतो.या योजनेचा मुख्य हेतू हा आहे कि,शेतीला आधुनिकीकरणाची जोड देणे आणि शेतीच्या उत्पन्नात वाढ करणे .कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत  शेतकरी हा नैसर्गिक साधनसंपत्तीचा म्हणजेच सौर उर्जेचा वापर करून शेतीमध्ये लागणाऱ्या विजेची बचत करू शकतो.प्रमुख्यान्ने शेती हि पाण्यावर चालली जाते ,जर पाणी असेल तरच शेती करू शकतो.पाण्याची एका ठिकाणावरून दुसरां ठिकाणी ने आन करण्यासाठी पूर्वी पाठ पद्धत वापरली जायची .हि पद्धत एका उंच भागावरून सखल भागाकडे पाणी पोहचवण्यासाठी वापरली जायची तसेच विहिरीच्या सखल भागातुन उंच ठिकाणी पाणी न्यायचे असेल तर आपण पूर्वी बैलांचा वापर करून मोट पद्धत पाणी बाहेर काढायचो .पण जसजसे अधुकीकरण वाढत गेले तसे शेतीसाठी बैल किंवा जनावरांचा वापर कमी होऊ लागले.आजच्या आधुनिकीकरणाच्या युगात शेतकरी विहीर,कालवा,किंवा इतर सखल भागातून पाणी बाहेर काढण्यासाठी विजेवर चालणाऱ्या पंपाचा वापर करू लागला.वाढणाऱ्या महागाई बरोबर विजेचे दरही गगनाला भिडू लागले आहेत. शेतकऱ्यांसाठी वाढलेले विजेचे दर त्याचबरोबर महागाई कमी करण्यासाठी सरकारने शेतकऱ्याठी कुसुम सोलर पंप योजना चालू केली आहे .तर चला पाहू काय आहे योजना ,काय आहेत योजनेचे फायदे ,आवश्यक कागदपत्रे,अर्ज कसा करायचा

कुसुम सोलर पंप योजना मुख्य उद्दीष्टे :

  • कुसुम सोलर पंप योजनेचे मुख्य उद्दीष्टे हे आहे कि, देशातील शेतकरी बांधवांना कुसुम सोलर पंप योजनेतून सौर उर्जेवर चालणारे पंप उपलब्ध करून देऊन डीझेलवर चालणारे पंप बंद करून पर्यावरणातील प्रदूषण कमी करणे तसेच विजेवर चालणाऱ्या पंपांना पर्याय उपलब्ध करून विजेची बचत करणे त्याचबरोबर शेतकऱ्याच्या खर्चामध्ये हि बचत करणे हा आहे.
  • सिंचनासाठी शेतकऱ्यास आर्थिक मदत करणे.
  • आधुनिकीकरणास प्राधान्य देणे .
  • शेतीसाठी होणारा खर्च कमी करणे.

योजनेचे नाव कुसुम सोलर पंप योजना २०२४ महाराष्ट्र राज्य
कोणी चालू केली केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार
लाभार्थी राज्यातील शेतकरी
लाभ ९०% ते ९५% अनुदानावर सौरपंप मिळतो.
उद्दीष्टे राज्यातील शेतकऱ्यांना सौर पंप पुरवठा करणे
अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन
अधिकृत संकेतस्थळ https://www.mahaurja.com/meda/en/kusumlogin

कुसुम सोलर पंप योजना फायदे

  • कुसुम सोलर पंप योजनेंतर्गत अर्जदार शेतकऱ्यास सरकार कडून सौर पाठी त्याचबरोबर सौरुर्जेवर चालणारा पंप दिले जाणार आहेत.
  • या योजनेचा फायदा घेऊन शेतकरी आपल्या शेतामधील विजेचा खर्च वाचवू शकतात.
  • कुसुम सोलर पंप योजनेचा वापर करून शेतकरी वीज निर्मिती करून त्यातूनही आर्थिक उत्पन्न मिळवू शकतात.
  • कुसुम सोलर पंप योजनेमुळे डिझेल पम्पामुळे होणारे प्रदूषण थांबून शेतकऱ्याचा इंधनावर होणारा खर्च कमी होईल.
  • या योजनेमुळे शेतकऱ्यास रात्री अपरात्री शेतामध्ये सिंचनासाठी जाण्याची गरज नाही,आता दिवसही शेतकरी आपल्या शेतीमध्ये सिंचन करू शकतात.
  • विजेवर होणारा उपरोक्त खर्च कमी करता येईल.

कुसुम सोलर पंप योजना अनुदान किती ?

अर्जदार किंवा लाभार्थी शेतकऱ्यास फक्त खाली दिलेली रक्कम भरावयाची आहे,इतर कोणतीही रक्कम भरावी लागणार नाही.

पंप[अश्व शक्ती/HP]अनुसूचित जाती/जमाती खुला प्रवर्ग
३ एच.पी ९,६९० /- १९,३८०/-
५ एच.पी १३,४८८/-२६,९७५/-
७.५ एच.पी १८,७२०/-३७,४४०/-
कुसुम सोलर पंप योजना अनुदान किती ?

कुसुम सोलर पंप योजना पात्रता 

  • अर्जदार शेतकरी हा भारतीय नागरिक असावा.
  • अर्जदार शेतकऱ्यास  कुसुम सोलर पंप योजनेचा लाभ घ्यायचा झाल्यास त्या शेतकऱ्याकडे स्वताच्या जागेमध्ये शाश्वत जलस्त्रोत असणे आवश्यक आहे ,पण त्याच्याकडे पारंपारिक पद्धतीने विद्युत जोडणी केलेली नसावी . उदा : विहिरीवरील पंपास विद्युत जोडणी.
  • पारंपरिक वीज जोडणी नसावी .
  • शेतकऱ्याचे वय हे अधिनियमानुसार १८ पेक्षा जास्त असावे.
  • अर्जदार शेतकऱ्याचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार शेतकरी इतर प्रवर्गातील असल्यास त्याचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे शाश्वत जलस्त्रोत आहे कि नाही याची पडताळणी महाउर्जा विभागाद्वारे करण्यात येईल.
  • या योजनेतून मिळणाऱ्या पंपाचा वापर फक्त मंजूर झालेल्या जलस्त्रोतासाठीच होईल.

कुसुम सोलर पंप योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

  • अर्जदाराचा ७/१२ उतारा .
  • अर्जदाराचे आधार कार्ड.
  • राष्ट्रीयकृत बँकेचे खातेबुक किंवा त्याची झेरोक्स.
  • पासपोर्ट आकाराचा फोटो.
  • अर्जदाराचा मोबाइल नंबर.

कुसुम सोलर पंप योजना ऑनलाईन अर्ज कसा करावा ?

अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या गोष्टींची पूर्तता करा :

  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी प्रथम तुम्हाला शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर यावं लागेल.
  • अधिकृत संकेतस्थळ- https://www.mahaurja.com/meda/en/kusumlogin
  • शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर आल्यानंतर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी उजव्या बाजूला तुम्हाला अर्ज करण्यासाठी लिंक सापडेल.
  • लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक सूचना येईल त्यामध्ये तुम्हाला कुसुम सोलर पंप योजने संधर्भातील सर्व अति आणि शर्थी तुम्हाला तेथे दिसतील.
  • त्या सूचनेच्या उजव्या बाजूला चिन्हावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक फॉर्म येईल,त्यानंतर तुम्हाला सेफ विलेज लिस्टमध्ये तुमच्या गावाचे नाव असल्यास तुम्ही डिझेल पंप ग्राहक किंवा वापरकर्ता नाही म्हणून नोंद करा.
  • जर सेफ विलेज लिस्टमध्ये तुमच्या गावाचे नसल्यास तुम्ही त्यामध्ये डीझेल पंप वापरकर्ता किंवा ग्राहक आहे म्हणून नोंद करा.
  • जर पंप आहे असा पर्याय जर तुम्ही निवडला तर त्या पंपाची संपूर्ण माहिती तुम्हाला भरावी लागणार आहे .
  • डीझेल पंप धारक किंवा वापरकर्ता नाही असा पर्याय निवडला असल्यास तुम्हाला काहीही माहिती भरण्याची गरज नाही.
  • पुढे गेल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर ,तुमचा जिल्हा,तालुका,गाव याचा पर्याय निवडावा लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून तुमची जी जात आहे तो पर्याय निवडावा लागेल.
  • एका मोबाईल क्रमांकावरून एकच अर्ज करता येतो.
  • हि संपूर्ण माहिती योग्यरीत्या भरल्यानंतर पेमेंट फोर ऑनलाईन अप्प्लीकेशेन या पर्यायावर क्लिक करा.
  • जमिनीच्या माहितीवरून तुम्हाला पंप कोटा दाखवला जाईल.
  • तुम्हाला तुमच्या जमिनीची योग्य ती माहिती भरावी लागेल जसे कि जमीन कुठे आहे,७/१२,८अ नंबर इत्यादी माहिती.
  • हि सर्व माहिती भरल्यानंतर खाली असणाऱ्या पेमेंट पर्यायावर क्लिक करा.पेमेंट पूर्ण केल्यानंतर तुम्हाला तुमच्या रजिस्टर केलेल्या मोबाईल क्रमांकावर MK id आणि पासवर्ड पाठवला जाईल.
  • MK id आणि पासवर्ड टाकून तुम्ही लॉग इन करू शकता.

कुसुम सोलर पंप योजना|Kusum Solar Pump 2024 Maharashtra. अधिकृत संकेतस्थळ

https://www.mahaurja.com/meda/en/kusumlogin

कुसुम सोलर पंप योजना हेल्पलाईन क्रमांक

  • हेल्पलाईन क्रमांक: 1800-180-3333
  • अधिकृत हेल्पलाईन संकेतस्थळ: www.mnre.gov.in

महाराष्ट्र राज्य सरकारच्या योजना २०२४

“मुख्यमंत्री -माझी लाडकी बहिण योजना 2024” पाहिला हप्ता कधी मिळणार ? महिलांसाठी खुशखबर-या तारखेला जमा होणार ३००० रुपये.पहा संपूर्ण माहिती.
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना 2024 महाराष्ट्र | pradhan mantri jeevan jyoti bima yojana.फक्त ₹ ४३६मध्ये मिळवा विमा संरक्षण.जाणून घ्या संपूर्ण माहिती.
PM सूर्य घर:मोफत वीज योजना २०२४.महाराष्ट्र राज्य | PM SURY GHAR:MOFAT VIJ YOJANA 2024 .सरकार देणार ३०० युनिट वीज मोफत.पहा अर्ज कसा करायचा,आवश्यक कागदपत्रे,पात्रता एका क्लिक वर.
मोफत बॅटरी फवारणी पंप योजना २०२४| Mofat Fawarani Pump Yojana 2024 शेतकऱ्यांना मिळणार १००% अनुदान. आजच करा अर्ज.
महाराष्ट्र राज्य सरकारच्या योजना २०२४

FAQ’s :

  • कुसुम सोलर पंप योजना किती अनुदान मिळते?
  • सौर पंपाची किंमत किती आहे?

कुसुम सोलर पंप योजना अधिकृत संकेतस्थळ?

उत्तर :
https://www.mahaurja.com/meda/en/kusumlogin
_______________________________________________________________________

कुसुम सोलर पंप योजना किती अनुदान मिळते?

उत्तर :
_______________________________________________________________________

कुसुम सोलर पंप योजनेसाठी पात्रता काय आहे ?

उत्तर :
अर्जदार शेतकरी हा भारतीय नागरिक असावा.
अर्जदार शेतकऱ्यास  कुसुम सोलर पंप योजनेचा लाभ घ्यायचा झाल्यास त्या शेतकऱ्याकडे स्वताच्या जागेमध्ये शाश्वत जलस्त्रोत असणे आवश्यक आहे ,पण त्याच्याकडे पारंपारिक पद्धतीने विद्युत जोडणी केलेली नसावी . उदा : विहिरीवरील पंपास विद्युत जोडणी.
पारंपरिक वीज जोडणी नसावी .
शेतकऱ्याचे वय हे अधिनियमानुसार १८ पेक्षा जास्त असावे.
अर्जदार शेतकऱ्याचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे आवश्यक आहे.
अर्जदार शेतकरी इतर प्रवर्गातील असल्यास त्याचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक.
_______________________________________________________________________

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *