MUKHYAMANTRI MAGEL TYALA SAUR KRUSHI PUMP YOJANA MAHARASHTRA 2024 | मुख्यमंत्री मागेल त्याला सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र राज्य २०२४.आजच अर्ज करा आणि आयुष्यभर विज बिलापासून मुक्त व्हा. 

marathiyojanainfo.com
12 Min Read
MUKHYAMANTRI MAGEL TYALA SAUR KRUSHI PUMP YOJANA MAHARASHTRA 2024 | मुख्यमंत्री मागेल त्याला सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र राज्य २०२४.आजच अर्ज करा आणि आयुष्यभर विज बिलापासून मुक्त व्हा. 

मुख्यमंत्री मागेल त्याला सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र राज्य २०२४

MUKHYAMANTRI MAGEL TYALA SAUR KRUSHI PUMP YOJANA MAHARASHTRA 2024 |मुख्यमंत्री मागेल त्याला सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र राज्य २०२४ : भारत हा देश जगामध्ये कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो.भारत हा संपूर्ण देश तसेच अनेक देशांना अन्नपुरवठा करतो. केंद्र सरकार तसेच राज्य सरकार नेहमीच राज्यातील बळीराजा म्हणजेच शेतकरी बांधवांसाठी नवनवीन उपक्रम अंमलात घेऊन येत असते .महाराष्ट्र राज्य सरकार तसेच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीद्वारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण उपक्रम किंवा योजना राबवली जात आहे.या योजनेच्या आधारे नैसर्गिक साधनांचा उपयोग करून राज्यातील शेतकऱ्यांचा शेतीवर तसेच इतर कामांसाठी होणारा खर्च कमी करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे.राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी वीजपुरवठा हा अनियमित तसेच अवेळी होत असल्यामुळे शेतकऱ्यांना अपरात्री शेतामध्ये जाऊन पाणीपुरवठा करावा लागतो.या आणि अश्याच कारणामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी हवा तसा वेळ देता येत नाही त्यामुळे शेतीच्या उत्पादकतेमध्ये तसेच शेतकऱ्याच्या उत्पन्नामधेही सातत्याने घट होत असते.शेतकऱ्यांचा हा विजेचा प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकार तसेच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीद्वारे शेतकऱ्यांसाठी “ मुख्यमंत्री मागेल त्याला सौर कृषी पंप योजना“सुरु करण्यात आली आहे.या योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांना होणारा भारनियमाचा त्रास हा खूप मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.शेतकऱ्यांचे पिक पाणी व्यवस्थापन सुरळीत होऊन शेतकऱ्यांच्या उत्पादकतेवर तसेच उत्पन्नामधेही वाढ होताना दिसते.तर चला पाहू काय आहे योजना? काय आहे योजनेची पात्रता ?आवश्यक कागदपत्रे ? काय आहेत या योजनेचे फायदे ? अर्ज कसा करायचा ?

काय आहे मुख्यमंत्री मागेल त्याला सौर कृषी पंप योजना :

ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत जलस्त्रोत आहे.उदा :विहीर,नदी,ओढा,बोअरवेल इत्यादी तसेच ज्या शेतकऱ्यांकडे शेतीच्या सिंचनाकरीता पारंपारिक पध्दतीने विजपुरवठा नाही,अशा शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषी पंप योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत राज्यात सौर कृषीपंप आस्थापित करण्यात येणार आहेत.या योजनेंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना महाराष्ट्र राज्य सकाराकडून सौर कृषी पंप संच सुरु करण्यासाठी भरघोस अनुदान दिले जाणार आहे.मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या मदतीने राज्यातील शेतकरी आपल्या शेतीमध्ये अनियमित तसेच अखंड होणाऱ्या वीजपुरवठावर मात करून शेतीमध्ये पिकाची उत्पादकता तसेच उत्पनामध्ये वाढ करू शकणार आहेत.रात्री अपरात्री होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पनावर तसेच उत्पादकतेवर बराच फरक जाणवतो पण या योजनेमुळे शेतकरी आता भरदिवसाही आपल्या शेतीमध्ये पाणीपुरवठा करू शकणार आहे.सौर उर्जा हि निसर्गामध्ये अमर्यादित तसेच मोफत उपलब्घ असल्यामुळे याच उर्जेचा वापर करून शेतीमध्ये पाणीपुरवठा तसेच इतर कारणासाठी होणाऱ्या अतिरिक्त विजेच्या खर्चावर शेतकऱ्यांना मात करता येणार आहे.तसेच डीझेल,रॉकेल,पेट्रोल या सारख्या इंधनाचा वापर केल्यामुळे पर्यावरणामध्ये कार्बन डायऑक्साइड चे प्रमाण वाढून पर्यावरणाचा समतोल बिघडला जातो पण या योजनेचा वापर करून आपण पर्यावरणाचा समतोल राखू शकतो तसेच वातावरणातील हवेची गुणवत्ता हि सुधारू शकतो.या योजनेसाठी सरकारने एकूण १४ हजार ७६० कोटी रुपये शेतकऱ्यांना अनुदान स्वरुपात देण्याचे ठरवले आहे.योजनेंतर्गत जवळपास राज्यातील ८ लाख ५० हजार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

मुख्यमंत्री मागेल त्याला सौर कृषी पंप योजना थोडक्यात :

योजनेचे नाव मुख्यमंत्री मागेल त्याला सौर कृषी पंप
कोणी सुरु केलीमहाराष्ट्र राज्य सरकार
लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील शेतकरी
मंजूर निधी १४ हजार ७६० कोटी रुपये
लाभ सौर कृषी पंपासाठी ९० % अनुदान
अर्ज प्रक्रिया ऑनलाईन/ऑफलाईन
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
मुख्यमंत्री मागेल त्याला सौर कृषी पंप योजना थोडक्यात :

महाराष्ट्र शासन निर्णय :

मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेची उद्दिष्ठे :

योजनेची उद्दिष्ठे खालीलप्रमाणे आहेत :

⦿ मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा मुख्य उद्देश हा राज्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक उर्जास्त्रोत सौर उर्जेचा वापर करून शेतीसाठी लागणारा वीजपुरवठा सुरळीत करणे.

⦿ पारंपारिक विजेचा वापर करून दिवसेंदिवस येणाऱ्या अमाप विजाबिलामध्ये बचत करता येते.

⦿ राज्यातील ज्या भागामध्ये विजेचा पुरवठा हा अनियमित तसेच अखंडित केला जातो अश्या भागांमध्ये हि योजना राबवून शेतकऱ्यांच्या होणाऱ्या अडचणीवर मत करणे.

⦿ शेतकऱ्यांना पाण्यासाठी रात्री अपरात्री करावी लागणारी मेहनत थांबवता येते.

⦿ शेतकऱ्यांना भर दिवसा त्यांच्या वेळेनुसार शेतामध्ये पाणीपुरवठा करता येतो.

⦿ अतिरिक्त इंधन वापरामुळे दिवसेंदिवस वाढत चाललेले वायू तसेच ध्वनी प्रदूषण कमी करता येते.

⦿ इतर पंपापेक्षा देखबालीचा खर्च कमी येतो.

मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेची वैशिष्टे :

योजनेची वैशिष्टे खालीलप्रमाणे आहेत :

१.सरकारी अनुदान 

शेतकऱ्यांना केवळ १० % इतकी रक्कम भरून संपूर्ण सौर कृषी पंपाची जोडणी करता येणार आहे.राहिलेल्या ९०% रक्कमेची जबाबदारी स्वत: महाराष्ट्र राज्य सरकार घेणार आहे.

२. सौर उर्जेवर संचालित पंप :

मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेंतर्गत राज्यातील पात्र शेतकऱ्यांना दिले जाणारे पंप संच हे सौर उर्जेवर चालणारे असणार आहेत त्यामुळे त्यांना दिवसही शेतीसाठी पाणीपुरवठा करता येणार आहे.

३. पर्यावरणपूरक उर्जा स्त्रोत :

मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेंतर्गत राज्यातील पात्र शेतकऱ्यांना दिले जाणारे पंप संच हे सौर उर्जेवर चालणारे असणार आहेत त्यामुळे हे पर्यावरणपूरक असणार आहेत.त्यातून पर्यावरणाला कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही.

४. नियमित आणि अखंडित पाणीपुरवठा :

मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमुळे शेतकऱ्यांना विजेवर अवलंबून राहण्याची गरज नाही त्यामुळे शेतीसाठी नियमित तसेच अखंडित पाणीपुरवठा करता येणार आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना विजेच्या बिलामधून मुक्तता मिळणार आहे.

५. टिकाऊ यंत्रणा :

मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेंतर्गत राज्यातील पात्र शेतकऱ्यांना दिले जाणारे पंप संच दीर्घकाळ टिकणारे तसेच कमी देखबाल खर्च असणारे आहेत त्यामुळे पंपावर होणारा नाहक खर्च कमी होणार आहे.

MUKHYAMANTRI MAGEL TYALA SAUR KRUSHI PUMP YOJANA MAHARASHTRA 2024 | मुख्यमंत्री मागेल त्याला सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र राज्य २०२४.आजच अर्ज करा आणि आयुष्यभर विज बिलापासून मुक्त राहा. 

मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचे फायदे :

⦿ विद्युत बचत :

मुख्यमंत्री मागेल त्याला सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र राज्य २०२४ अंतर्गत मिळणारा सौर कृषी पंप हा नैसर्गिक ऊर्जास्त्रोत म्हणजेच सौरुर्जेवर चालणारा पंप आहे.हा पंप सौर उर्जेवर काम करत असल्यामुळे विजेची गरज लागत नाही.त्यामुळे शेतकऱ्यांचा विजेवर होणाऱ्या खर्चामध्ये बचत होते.

⦿ पर्यावरण पूरक पंप :

सौर कृषी हा पूर्णता नैसर्गिक ऊर्जास्त्रोतावर काम करत असल्यामुळे इंधनामुळे होणारे प्रदूषण पूर्णता थांबले जाते.त्यामुळे पर्यावरणाला होणारी हानी या योजनेमुळे कमी होण्यास मदत होणार आहे.

⦿ शेती उत्पादकतेमध्ये वाढ:

सौर कृषी पंपामुळे शेतील हव्या त्या वेळेमध्ये पाणीपुरवठा केला जातो त्यामुळे शेतीच्या उत्पादनामध्ये वाढ होऊन शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये वाढ हाते.

⦿ शासन अनुदान

महाराष्ट्र राज्य सरकार तसेच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीद्वारे राबवण्यात येणाऱ्या या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना जवळपास ९० % अनुदान देण्यात येणार आहे जेणेकरून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत होणार आहे.सर्वसाधारण वर्गातील शेतकऱ्यांना फक्त १० % रकमेवरती तसेच अनुसूचित जाती जमाती मधील शेतकऱ्यांना फक्त ५ % अनुदानावर आपल्या शेतामध्ये सौर कृषी पंप बसवता येणार आहे.

⦿ सर्वोत्कृष्ट सेवा:

महाराष्ट्र राज्य सरकार तसेच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीद्वारे दिला जाणारा सौर कृषी पंप हा उत्कृष्ट प्रतीचा असून तब्बल ५ वर्षाचा विमा तसेच दुरुस्ती हि शासनाकडून दिली जाणार आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना ५ वर्षे निश्चिंत या सौर कृषी पंपाचा लाभ घेता येणार आहे.

⦿ शेती आकारानुसार पंप :

ज्या शेतकऱ्यांची शेती हि २.५ एकरापर्यंत आहे अश्या शेतकऱ्यांना ३ HP DC चा कृषी पंप तर, ५ एकरापर्यंतच्या शेतकऱ्यांना ५ HP DC तसेच ५ एकरपेक्षा शेती धारकर ७.५ HP DC क्षमतेचा सौर कृषी पंप मिळणर आहे.

योजनेची पात्रता किंवा लाभार्थी निवडीचे निकष :

योजनेची पात्रता खालीलप्रमाणे आहेत :

⦿ मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेसाठी वैयक्तिक शेततळे किंवा बोअरवेल ,विहीर इत्यादी किंवा बारमाही वाहणाऱ्या नद्या,नाले यांच्या शेजारील शेतमालक या योजनेसाठी पात्र राहतील.

⦿ ज्या शेतकऱ्याकडे शाश्वत जलस्त्रोत  वैयक्तिक शेततळे किंवा बोअरवेल ,विहीर इत्यादी किंवा बारमाही वाहणाऱ्या नद्या,नाले यांची तपासणी तसेच खात्री हि महावितरण कंपनीकडून करण्यात येईल.

⦿ या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अर्जदार हा शेतकरी असणे तसेच त्याच्या नावावर शेती असणे आवश्यक आहे.

⦿ यापूर्वी अटल सौर कृषी पंप योजना -१ ,अटल सौर कृषी पंप योजना -२ तसेच मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना यांचा लाभ न घेतलेले अर्जदार शेतकरीही या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

⦿ ज्या शेतकऱ्यांकडे पारंपारिक विजेची सुविधा उपलब्ध नाही अश्या शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल.

मुख्यमंत्री मागेल त्याला सौर कृषी पंप योजना आवश्यक कागदपत्रे :

मुख्यमंत्री मागेल त्याला सौर कृषी पंप योजना आवश्यक कागदपत्रे :
मुख्यमंत्री मागेल त्याला सौर कृषी पंप योजना आवश्यक कागदपत्रे :

अर्ज प्रक्रिया :

  1. ► महावितरणाच्या वेब पोर्टलवर (https://www.mahadiscom.in/solar) ऑनलाइन अर्ज करावा.
  2. ► सध्याच्या कृषीपंपाकरिता नवीन वीज जोडणीसाठी पैशाचा भरणा करुन प्रलंबित असलेल्या अर्जदाराने फक्त काही अनिवार्य फील्ड, उदा. अर्ज क्रमांक, पैसे भरल्याची पावती क्रमांक, मंजुरी क्रमांक आणि क्षमतेची मागणी इ. तपशील देणे अनिवार्य आहे.
  3. ► नवीन अर्जदार (परंपरागत कृषीपंप नवीन वीज जोडणीसाठी पैशाचा भरणा केलेला नाही) सर्व फील्ड अनिवार्य आहेत म्हणून तपशील भरणे आवश्यक आहे.
  4. ► ए – 1 फॉर्मवर संपूर्ण माहिती भरावीे सोबत (कागदपत्रांची प्रत अपलोड करावी)
    • 7/12 उतारा प्रत
    • आधार कार्ड
    • कास्ट प्रमाणपत्र (एससी / एसटी लाभार्थींसाठी)
  5. ► अर्जदाराने ए – 1 फॉर्मवर व घोषणापत्रावर सही करणे आवश्यक आहे.
  6. ► ऑनलाइन ए – 1 फॉर्म प्राप्त झाल्यापासून 10 दिवसांच्या आत, सर्वेक्षण केल्यानंतर फील्ड ऑफिसमधून डिमांड नोट जारी केले जाईल. जर काही विसंगती आढळली तर त्यानुसार अर्जदाराला कळविण्यात येईल.
  7. ► डिमांड नोट देय झाल्यानंतर लाभार्थी एजन्सीचे नाव सादर करेल / देईल (केवळ 25000 निविदासाठी लागू आहे).
  8. ► प्रत्येक टप्प्यावर अर्जदारांना एसएमएसद्वारे कळविण्यात येईल.

महाराष्ट्र राज्य शासनाच्या अधिकृत योजना २०२४ :

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *