“मुख्यमंत्री -माझी लाडकी बहिण योजना 2024” पाहिला हप्ता कधी मिळणार ? महिलांसाठी खुशखबर-या तारखेला जमा होणार ३००० रुपये.पहा संपूर्ण माहिती.

marathiyojanainfo.com
8 Min Read
"मुख्यमंत्री -माझी लाडकी बहिण योजना 2024"पाहिला हप्ता कधी मिळणार ? महिलांसाठी खुशखबर-या तारखेला जमा होणार ३००० रुपये.पहा संपूर्ण माहिती.

 “मुख्यमंत्री -माझी लाडकी बहिण योजना 2024″|mazi-bahin-yojana-first-installment-महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री मान.श्री.अजितदादा पवार यांनी महाराष्ट्र राज्याच्या सन २०२४ च्या अर्थसंकल्पामध्ये राज्यातील तरुण महिला ज्याचे वय २१ आहे तसेच ज्या महिलांचे वय ६५ आहे यांच्यासाठी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४ महाराष्ट्र ” सादर केली.या योजनेंतर्गत अनुदान किती तारखेला जमा होणार आहे ते आपण या लेखामध्ये पाहणार आहोत.या आणि अशाच योजनांची माहिती तुमच्या मोबाईलवर हवी असल्यास आमच्या अधिकृत संकेतस्थळाला तुमच्या बुकमार्क मध्ये सेव करून ठेवा.

Contents
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४ थोडक्यात:मुख्यमंत्री -माझी लाडकी बहिण योजना 2024 पहिला हप्ता कधी मिळणार :मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ कोणाला मिळणार?मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४ महाराष्ट्र उद्दिष्टे :  मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४ महाराष्ट्र वैशिष्ठे :मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४ फायदे :‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४’ आवश्यक कागदपत्रे:महाराष्ट्र राज्य सरकारच्या योजना २०२४:mazi-bahin-yojana-first-installment :सतत विचारले जाणारे प्रश्न :मुख्यमंत्री -माझी लाडकी बहिण योजनेचा पहिला हप्ता कधी मिळणार आहे ?मुख्यमंत्री -माझी लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज कसा करावा ?मुख्यमंत्री -माझी लाडकी बहिण योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ?मुख्यमंत्री -माझी लाडकी बहिण योजनेसाठी शासनाची अधिकृत वेबसाईट कोणती आहे ?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४ थोडक्यात:

योजनेचे नावमुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४
कोणी सुरु केलीमहाराष्ट्र राज्य सरकार
विभागमहिला व बाल कल्याण विभाग,महाराष्ट्र राज्य
लाभार्थीराज्यातील २१ ते ६५ वयोगटातील महिला
लाभ१५०० /- प्रत्येक महिना
वार्षिक निधी४६ हजार कोटी रुपये
अर्ज प्रकियाऑनलाईन.
अधिकृत संकेतस्थळ👉येथे क्लिक करा.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४ थोडक्यात

आपल्या कुटुंबात स्त्री हा एक महत्वाचा घटक आहे तसेच स्त्री हा कुटुंबाचा कणा असतो.भारतीय समाजामध्ये अजूनही स्त्रीला समाजामध्ये कमी लेखले जाते,असमानतेची वागणूक दिली जाते.या सर्व बाबींचा विचार करता महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना” हा उपक्रम राबवला जात आहे.या योजनेंतर्गत वय वर्ष २१ ते वय वर्ष ६५ असणाऱ्या महिलांसाठी सरकार प्रत्येकी १५०० रुपये दरमहिना देणार आहे.हि योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात येणार आहे.”मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी”सरकारने वार्षिक एकूण ४६ हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.समाजामधील महिलांना विचारात घेऊन सर्व बाबींची अंमलबजावणी केलेली आहे. या योजनेंतर्गत समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील महिलांना दर महिन्याला त्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा केले जातील.या योजनेचा लाभ हा राज्यातील वय २१ ते ६५ असणाऱ्या तसेच अविवाहित,विधवा,निराधार,आर्थिक दुर्बल इत्यादी महिलांना घेता येणार आहे.महाराष्ट्र राज्य सरकारने हि योजना ‘राज्यातील युवती तसेच महिलांना स्वावलंबी तसेच आत्मनिर्भर बनवण्यासाठी’ हि योजना चालू केली असल्याचे सांगितले जाते.महाराष्ट्र राज्याने मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर हि योजना चालू केली आहे.या योजनेची घोषणा हि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री मान.श्री.अजितदादा पवार यांनी महाराष्ट्र राज्याच्या सन २०२४ च्या अर्थसंकल्पामध्ये केली.

मुख्यमंत्री -माझी लाडकी बहिण योजना 2024

मुख्यमंत्री -माझी लाडकी बहिण योजना 2024 पहिला हप्ता कधी मिळणार :

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४” या उपक्रमांतर्गत राज्यातून खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.वय वर्षे २१ ते वय वर्षे ६५ गटातील महिलांसाठी हि योजना सुरु करण्यात आली आहे.या योजनेसाठी राज्यातून दररोज लाखो महिला अर्ज करत आहेत.या योजनेंतर्गत पात्र महिलांना त्यांच्या बँक खात्यामध्ये दरमहा १५०० रुपये इतकी रक्कम अनुदान म्हणून जमा केली जाणार आहे.हि रक्कम अर्जदाराच्या खात्यामध्ये थेट जमा केली जाणार आहे.राज्यातील अर्जदार महिलांना या योजनेचे अनुदान कधी जमा होणार याची उत्सुकता लागून राहिली आहे तर चला पाहू कधी मिळणार पहिला हप्ता..?

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४”योजनेचा पहिला हप्ता हा ३१ ऑगस्ट पर्यंत भरलेल्या अर्जदारांना जुलै तसेच ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे एकूण अनुदान ३००० रुपये जमा होणार आहे.मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा पहिला हप्ता हा दिनांक १७ ऑगस्ट २०२४ रोजी पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे.आत्तापर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेसाठी १ कोटी २७ लाख महिला पात्र झाल्या आहेत,तसेच अंतिम तारखेपर्यंत २ कोटी महिला पात्र होतील असा अंदाज शासनाने वर्तवला आहे.सूत्रांच्या माहितीनुसार पात्र अर्जदार महिलांच्या खात्यामध्ये अनुदान जमा करण्याची प्रक्रिया चालू करण्यात आली आहे.पात्र अर्जदारांच्या खात्यामध्ये हे अनुदान महा डी बी टी द्वारे जमा केली जाणार आहे.जवळपास ५ हजार २०० कोटी इतकी रक्कम १७ ऑगस्ट २०२४ रोजी खात्यामध्ये जमा केली जाणार आहे.

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४” योजनेसाठी पहिला हप्ता वितरणाचा कार्यक्रम हा वरिष्ठ पातळीवर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री.एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला जाणार आहे.तसेच प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या जिल्ह्याच्या पालक मंत्र्यांच्या हस्ते वितरणाचा कार्यक्रम पार पडला जाईल.राज्यातील महिलांसाठी सरकारकडून हि ओवाळणी असल्याचेही बोलले जात आहे.

अर्ज करण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२४ हि अंतिम तारीख असणार आहे.

मुख्यमंत्री -माझी लाडकी बहिण योजना 2024 पहिला हप्ता कधी मिळणार :

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ कोणाला मिळणार?

१. आर्थिक दुर्बल घटकातील महिलांना प्रत्येक महिन्यात १५०० थेट बँक खात्यामध्ये मिळणार.

२. या योजनेचा लाभ हा समाजातील २१ ते ६५ वयोगटातील विवाहित,विधवा,तसेच निराधार महिलांना मिळणार आहे.

३. ज्या महिलेचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न हे २.५० लाखापेक्षा कमी आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४ महाराष्ट्र उद्दिष्टे : 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४ महाराष्ट्र उद्दिष्टे पुढीलप्रमाणे :

१. या योजनेचा प्रमुख उद्देश हा राज्यातील महिला तसेच तरुणींना स्वावलंबी,आत्मनिर्भर,करण्यासाठी तसेच महिला व त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या संपूर्ण कुटुंब

तसेच,मुलांची आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारना व्हावी हा आहे.

२. आर्थिक तसेच दुर्बल घटकातील महिलांच्या बँक खात्यामध्ये थेट प्रतिमहिना १५०० रुपये आर्थिक मदत म्हणून जमा करणे.

३. या योजनेचा लाभ हा समाजातील २१ ते ६५ वयोगटातील विवाहित,विधवा,तसेच निराधार महिलांना मिळणार आहे.

४. समाजामध्ये महिलांना समानतेची वागणूक तसेच खांद्याला खांदा लाऊन काम करण्यास प्रोत्साहन देणे.

५. तरुणींना आर्थिक सहाय्य देऊन त्यांना आर्थिक स्वतंत्र प्रदान करणे.

 मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४ महाराष्ट्र वैशिष्ठे :

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४ महाराष्ट्र वैशिष्ठे पुढीलप्रमाणे :

१. योजनेचे लाभार्थी हे राज्यातील वय २१ ते ६५ वर्षे असलेल्या महिला असून त्यांच्या बँक खात्यामध्ये प्रत्येक महिन्याला १५०० रुपये जमा होणार .

२. या योजनेंतर्गत लाभार्थांच्या खात्यामध्ये “डी बी टी ” द्वारे अनुदान जमा केले जाणार.

३. योजनेसाठी ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येतो.

४. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेंतर्गत महिलांना प्रत्येक महिन्याला आर्थिक सहाय्य मिळणार.

५. राज्यातील 2 लाख युवतींना मिळणार लाभ.

"मुख्यमंत्री -माझी लाडकी बहिण योजना 2024" पाहिला हप्ता कधी मिळणार ? महिलांसाठी खुशखबर-या तारखेला जमा होणार ३००० रुपये.पहा संपूर्ण माहिती.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४ फायदे :


मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४ फायदे पुढीलप्रमाणे :-

१. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेंतर्गत मुलींना तसेच महिलांना आर्थिक सहाय्य मिळणार आहे,त्यामुळे कुटुंबाला आर्थिक सहायता मिळून कुटुंबाचा आर्थिक बोजा कमी होतो.

२. दर महिना मिळणाऱ्या १५०० रुपये अनुदानातून कुटुंबातील पाल्यांना उच्च प्रतीचा पोषण आहार मिळण्यास मदत होऊन त्यांचे आरोग्य सुधारते.

३. या योजनेतून मिळालेल्या रक्कमेतून मुलींना त्यांच्या विवाहासाठी थोड्या प्रमाणात आर्थिक मदत होऊ शकते.

४. या योजनेतून मिळणाऱ्या अनुदानामुळे मुलींना आर्थिक स्वतंत्र मिळते जेणेकरून त्या स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकतील.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४’ आवश्यक कागदपत्रे:


 मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४ आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे –

आधार कार्ड 

रेशन कार्ड 

रहिवाशी दाखला 

उत्पनाचा दाखला [२.५० लाखापर्यंतचा]

बँक खाते पासबुक 

पासपोर्ट आकाराचा फोटो

महाराष्ट्र राज्य सरकारच्या योजना २०२४:

Mukhyamantri Ladaki Bahin Yojana (2024) |मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४ महाराष्ट्र | महिलांना मिळणार प्रती महिना १५००/- रुपये.काय आहे योजना ?अर्ज कसा करायचा पहा सविस्तर एका क्लिक वर.
Maza Ladka Bhau Yojana 2024 Maharashtra | माझा लाडका भाऊ योजना २०२४ महाराष्ट्र राज्य.मिळणार महिना १०,००० रुपये,काय आहे योजना ?काय आहेत फायदे ?अर्ज कसा करायचा पहा सविस्तर माहिती. 
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना २०२४
गाय गोठा अनुदान योजना २०२४ महाराष्ट्र राज्य |Gay Gotha Yojana 2024| नोंदणी चालू झाली. पहा अर्ज कसा करायचा एका क्लिक वर…

mazi-bahin-yojana-first-installment :

“मुख्यमंत्री -माझी लाडकी बहिण योजना 2024″पाहिला हप्ता कधी मिळणार ? महिलांसाठी खुशखबर-या तारखेला जमा होणार ३००० रुपये.पहा संपूर्ण माहिती.

सतत विचारले जाणारे प्रश्न :

मुख्यमंत्री -माझी लाडकी बहिण योजनेचा पहिला हप्ता कधी मिळणार आहे ?

उत्तर:-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा पहिला हप्ता हा दिनांक १७ ऑगस्ट २०२४ रोजी जमा होणार आहे.
——————————————————————————————————————

मुख्यमंत्री -माझी लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज कसा करावा ?

उत्तर:-
मुख्यमंत्री -माझी लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
——————————————————————————————————————

मुख्यमंत्री -माझी लाडकी बहिण योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ?

उत्तर:-
आधार कार्ड, रेशन कार्ड ,रहिवाशी दाखला, उत्पनाचा दाखला [२.५० लाखापर्यंतचा],बँक खाते पासबुक,पासपोर्ट आकाराचा फोटो इत्यादी
——————————————————————————————————————

मुख्यमंत्री -माझी लाडकी बहिण योजनेसाठी शासनाची अधिकृत वेबसाईट कोणती आहे ?

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *