‘मुख्यमंत्री -माझी लाडकी बहिण योजना 2024| Mazi Ladki Bahin Yojana Third Installment.-महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री मान.श्री.अजितदादा पवार यांनी महाराष्ट्र राज्याच्या सन २०२४ च्या अर्थसंकल्पामध्ये राज्यातील तरुण महिला ज्याचे वय २१ आहे तसेच ज्या महिलांचे वय ६५पर्यंत आहे यांच्यासाठी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४ महाराष्ट्र” सादर केली.या योजनेंतर्गत तिसरा हप्ता किती आणि कधी तारखेला जमा होणार आहे ते आपण या लेखामध्ये पाहणार आहोत.या आणि अशाच योजनांची माहिती तुमच्या मोबाईलवर हवी असल्यास आमच्या अधिकृत संकेतस्थळाला तुमच्या बुकमार्क मध्ये सेव करून ठेवा.
ladki bahin Yojana, 3rd installment
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४ थोडक्यात:
योजनेचे नाव | मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४ |
कोणी सुरु केली | महाराष्ट्र राज्य सरकार |
विभाग | महिला व बाल कल्याण विभाग,महाराष्ट्र राज्य |
लाभार्थी | राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील महिला |
लाभ | १५०० /- प्रत्येक महिना |
वार्षिक निधी | ४६ हजार कोटी रुपये |
अर्ज प्रकिया | ऑनलाईन. |
अधिकृत संकेतस्थळ | 👉येथे क्लिक करा. |
आपल्या कुटुंबात स्त्री हा एक महत्वाचा घटक आहे तसेच स्त्री हा कुटुंबाचा कणा असतो.भारतीय समाजामध्ये अजूनही स्त्रीला समाजामध्ये कमी लेखले जाते,असमानतेची वागणूक दिली जाते.या सर्व बाबींचा विचार करता महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना” हा उपक्रम राबवला जात आहे.या योजनेंतर्गत वय वर्ष २१ ते वय वर्ष ६५ असणाऱ्या महिलांसाठी सरकार प्रत्येकी १५०० रुपये दरमहिना देणार आहे.हि योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे.“मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी”सरकारने वार्षिक एकूण ४६ हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.समाजामधील महिलांना विचारात घेऊन सर्व बाबींची अंमलबजावणी केलेली आहे. या योजनेंतर्गत समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील महिलांना दर महिन्याला त्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा केले जातील.या योजनेचा लाभ हा राज्यातील वय २१ ते ६५ असणाऱ्या तसेच अविवाहित,विधवा,निराधार,आर्थिक दुर्बल इत्यादी महिलांना घेता येणार आहे.महाराष्ट्र राज्य सरकारने हि योजना ‘राज्यातील युवती तसेच महिलांना स्वावलंबी तसेच आत्मनिर्भर बनवण्यासाठी’ हि योजना चालू केली असल्याचे सांगितले जाते.महाराष्ट्र राज्याने मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर हि योजना चालू केली आहे.या योजनेची घोषणा हि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री मान.श्री.अजितदादा पवार यांनी महाराष्ट्र राज्याच्या सन २०२४ च्या अर्थसंकल्पामध्ये केली.
मुख्यमंत्री -माझी लाडकी बहिण योजना 2024 तिसरा हप्ता कधी मिळणार | Mazi Ladki Bahin Yojana Third Installment :
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४” या उपक्रमांतर्गत राज्यातून खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.वय वर्षे २१ ते वय वर्षे ६५ गटातील महिलांसाठी हि योजना सुरु करण्यात आली आहे.या योजनेसाठी राज्यातून दररोज लाखो महिला अर्ज करून या योजनेचा लाभ घेतला आहे.आतापर्यंत या योजनेसाठी राज्यातून जवळपास २ कोटी ते २.२५ कोटी महिलांनी अर्ज केला आहे. या योजनेंतर्गत पात्र महिलांना त्यांच्या बँक खात्यामध्ये दरमहा १५०० रुपये इतकी रक्कम अनुदान म्हणून जमा केली जाते.हि रक्कम अर्जदाराच्या खात्यामध्ये थेट जमा केली जाते.राज्यातील लाभार्थी महिलांना या योजनेचा तिसरा हप्ता कधी जमा होणार याची उत्सुकता लागून राहिली आहे तर चला पाहू कधी मिळणार तिसरा हप्ता..?
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण योजना 2024 तिसरा हप्त्याची तारीख निश्चीत झाली असून राज्यातील पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये लवकरच हा जमा होणार आहे.ज्या महिलांचा अर्ज हा जुलै तसेच ऑगस्ट महिन्यामध्ये यशस्वीरीत्या भरला गेला होता तसेच त्यांना दोन महिन्याचे एकूण ३००० हजार जमा झाले आहेत अश्या महिलांना १५०० रुपयांचा तिसरा हप्ता जमा होणार आहे तसेच ज्या महिलांचा अर्ज हा ३१ ऑगस्ट ते आजपर्यंत यशस्वीरीत्या भरला गेला आहे अश्या महिलांना पहिला,दुसरा आणि तिसरा असा एकूण ४५०० रुपयाचा निधी त्याच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे.
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण योजनेचा तिसरा हप्ता हा दिनांक २९ सप्टेंबर २०२४ रोजी रायगड येथे होणाऱ्या कार्यक्रमामध्ये सर्व पात्र महिलाच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्याच्या मंत्री मान.अदिती तटकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.योजनेचा तिसरा हप्ता हा दिनांक २९ सप्टेंबर २०२४ रोजी ठीक ५ वाजल्यापासून पात्र महिलाच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होईल.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ कोणाला मिळणार?
१. आर्थिक दुर्बल घटकातील महिलांना प्रत्येक महिन्यात १५०० थेट बँक खात्यामध्ये मिळणार.
२. या योजनेचा लाभ हा समाजातील २१ ते ६५ वयोगटातील विवाहित,विधवा,तसेच निराधार महिलांना मिळणार आहे.
३. ज्या महिलेचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न हे २.५० लाखापेक्षा कमी आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४ महाराष्ट्र उद्दिष्टे :
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४ महाराष्ट्र उद्दिष्टे पुढीलप्रमाणे :
१. या योजनेचा प्रमुख उद्देश हा राज्यातील महिला तसेच तरुणींना स्वावलंबी,आत्मनिर्भर,करण्यासाठी तसेच महिला व त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या संपूर्ण कुटुंब
तसेच,मुलांची आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारना व्हावी हा आहे.
२. आर्थिक तसेच दुर्बल घटकातील महिलांच्या बँक खात्यामध्ये थेट प्रतिमहिना १५०० रुपये आर्थिक मदत म्हणून जमा करणे.
३. या योजनेचा लाभ हा समाजातील २१ ते ६५ वयोगटातील विवाहित,विधवा,तसेच निराधार महिलांना मिळणार आहे.
४. समाजामध्ये महिलांना समानतेची वागणूक तसेच खांद्याला खांदा लाऊन काम करण्यास प्रोत्साहन देणे.
५. तरुणींना आर्थिक सहाय्य देऊन त्यांना आर्थिक स्वतंत्र प्रदान करणे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४ महाराष्ट्र वैशिष्ठे :
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४ महाराष्ट्र वैशिष्ठे पुढीलप्रमाणे :–
१. योजनेचे लाभार्थी हे राज्यातील वय २१ ते ६५ वर्षे असलेल्या महिला असून त्यांच्या बँक खात्यामध्ये प्रत्येक महिन्याला १५०० रुपये जमा होणार .
२. या योजनेंतर्गत लाभार्थांच्या खात्यामध्ये “डी बी टी ” द्वारे अनुदान जमा केले जाणार.
३. योजनेसाठी ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येतो.
४. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेंतर्गत महिलांना प्रत्येक महिन्याला आर्थिक सहाय्य मिळणार.
५. राज्यातील 2 लाख युवतींना मिळणार लाभ.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४ फायदे :
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४ फायदे पुढीलप्रमाणे :-
१. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेंतर्गत मुलींना तसेच महिलांना आर्थिक सहाय्य मिळणार आहे,त्यामुळे कुटुंबाला आर्थिक सहायता मिळून कुटुंबाचा आर्थिक बोजा कमी होतो.
२. दर महिना मिळणाऱ्या १५०० रुपये अनुदानातून कुटुंबातील पाल्यांना उच्च प्रतीचा पोषण आहार मिळण्यास मदत होऊन त्यांचे आरोग्य सुधारते.
३. या योजनेतून मिळालेल्या रक्कमेतून मुलींना त्यांच्या विवाहासाठी थोड्या प्रमाणात आर्थिक मदत होऊ शकते.
४. या योजनेतून मिळणाऱ्या अनुदानामुळे मुलींना आर्थिक स्वतंत्र मिळते जेणेकरून त्या स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकतील.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४’ आवश्यक कागदपत्रे:
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४ आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे –
आधार कार्ड
रेशन कार्ड
रहिवाशी दाखला
उत्पनाचा दाखला [२.५० लाखापर्यंतचा]
बँक खाते पासबुक
पासपोर्ट आकाराचा फोटो
महाराष्ट्र राज्य सरकारच्या योजना २०२४:
- ⦿ शेतकऱ्यांसाठी खुशखबर -‘पी एम किसान योजना २०२४’| P M Kisan Yojana 18 th installment 2024.टाटानगरमधून या तारखेला जमा होणार १८ वा हप्ता.पहा संपूर्ण माहिती.
- ⦿ अण्णासाहेब पाटील कर्ज योजना महाराष्ट्र २०२४| Annasaheb Patil Loan Scheme 2024| आता मिळावा व्यवसायासाठी बिनव्याजी १० ते ५० लाखापर्यंतचे कर्ज.तरुणांसाठी सुवर्णसंधी. पहा कसा अर्ज करायचा संपूर्ण माहिती एका क्लिक वर.
- ⦿ अपंग पेन्शन योजना महाराष्ट्र राज्य २०२४
- ⦿ महिलांसाठी खुशखबर..! पिंक ई-रिक्षा योजना २०२४ महाराष्ट्र राज्य
- ⦿ कुसुम सोलर पंप योजना २०२४ महाराष्ट्र राज्य |Kusum Solar Pump 2024 Maharashtra.ऑनलाईन अर्ज,पात्रता,लाभ.आजच अर्ज करा आणि वीजबिलातून मुक्त व्हा.
- ⦿ प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना 2024 महाराष्ट्र | pradhan mantri jeevan jyoti bima yojana.फक्त ₹ ४३६मध्ये मिळवा विमा संरक्षण.जाणून घ्या संपूर्ण माहिती.
- ⦿ Tractor Anudan Yojana 2024.ट्रॅक्टर अनुदान योजना २०२४ महाराष्ट्र राज्य | आता सरकार करणार ट्रॅक्टर घेण्यास ५०% मदत !पहा सविस्तर.. गाय गोठा अनुदान योजना २०२४ महाराष्ट्र राज्य |Gay Gotha Yojana 2024| नोंदणी चालू झाली. पहा अर्ज कसा करायचा एका क्लिक वर…
- ⦿ मुख्यमंत्री वयोश्री योजना २०२४ महाराष्ट्र राज्य | Mukhyamantri Vayoshri Yojana 2024| जेष्ठ नागरिकांना मोठा दिलासा | जेष्ठ नागरिकांना मिळणार एकरकमी ३००० रुपये ! अर्ज,पात्रता ,कागदपत्रे पहा सविस्तर.
महाराष्ट्र राज्य सरकारच्या योजना २०२४: