मोफत बॅटरी फवारणी पंप योजना २०२४| Mofat Fawarani Pump Yojana 2024:भारत हा कृषीप्रधान देश आहे .देशातील ग्रामीण भागामध्ये प्रामुख्याने शेती हा व्यवसाय केला जातो.शेतकरी हा अन्नदाता म्हणून ओळखला जातो,म्हणून देशातील शेतकरी सुखी असेल तरच देशाला सुरळीत अन्नपुरवठा होतो हि बाब सरकार जाणते.म्हणूनच भारत सरकार देशातील शेतकऱ्यांसाठी नेहमीच नवनवीन उपक्रम राबवत असते.आजपर्यंत केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी विविध योजना अंमलात आणल्या आहेत उदा: पी एम किसान योजना,एक शेतकरी एक डीपी योजना,पोखरा योजना,नाविन्यपूर्ण योजना ,tractor अनुदान योजना,प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना,ठिबक सिंचन अनुदान योजना,शेतकरी सन्मान योजना इत्यादी.या योजनेंतर्गत सरकार शेतकऱ्यांना अनुदान स्वरुपात आर्थिक मदत करत असते.शेतीमधील उत्त्पन्न हे चढ उताराचे असल्यामुळे शेतकऱ्यांना महागड्या यंत्रसामुग्री विकत घेता येत नाही.या आणि अश्या प्रकारच्या अडचणींवर मात करण्यासाठी केंद्र सरकार तसेच राज्य सरकार राज्यातील शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजनाद्वारे आर्थिक रसद पुरवत असते.शेतीमधील शाररिक कष्ठ कमी करण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र राज्य सरकारने एक योजना सुरु केली आहे.काय आहे योजना ?काय आहेत योजनेचे फायदे ? काय आहेत आवश्यक कागदपत्रे ?अर्ज कसा कराल याची संपूर्ण माहिती आपण या लेखामध्ये घेणार आहोत.तुम्हाला या योजनेसाठी यशस्वीरीत्या अर्ज करायचा असेल हा आमचा लेख शेवटपर्यंत वाचा.या आणि अश्याच प्रकारच्या योजनाची माहिती मिळवण्यासठी आमच्या अधिकृत संकेतस्थळाला तुमच्या बुकमार्क मध्ये सेव करा.तर चला पाहूया काय आहे योजना…
महाराष्ट्र राज्य सरकार राज्यातील शेतकऱ्यांसाठी त्यांच्या पिकाचे संरक्षण करण्यासाठी तसेच पिकाची गुणवत्ता वाढावी यासाठी नेहमीच प्रयत्नशील असते.शेतीतील पिकाचे संरक्षण झाले तरच शेतकऱ्याच्या पिकाच्या उत्तम गुणवत्तेमध्ये तसेच शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये वाढ होऊन शेतकरी त्याची प्रगती करू शकतो हे सर्वांनाच माहित आहे.यासाठीच राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी “मोफत बॅटरी फवारणी पंप योजना” सुरु केली आहे.या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर हा फवारणी पंप मिळणार आहे.जेणेकरून शेतकऱ्यांचा शेतीवर होणारा खर्च कमी करणे तसेच त्यांना आधुनिक यंत्रसामुग्री उपलब्ध करून देणे.या योजनेमुळे शेतकऱ्यांना आधुनिक शेती करण्यास मदत होणार आहे तसेच पिक संरक्षणहि होणार आहे.पिकांचे रोग ,कीड तसेच इतर अनैसर्गिक आपत्तीपासून बचाव करता येणार आहे.या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महा डी बी टी पोर्टल वरून अर्ज करावा लागणार आहे.संपूर्ण माहिती खाली दिली आहे.
मोफत बॅटरी फवारणी यंत्र योजना थोडक्यात :
योजनेचे नाव | मोफत बॅटरी फवारणी पंप योजना |
कोणी सुरु केली | महाराष्ट्र सरकार |
बजेट | १००० कोटी |
लाभार्थी | राज्यातील शेतकरी |
लाभ | मोफत फवारणी पंप |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
अर्ज काण्याची शेवटची तारीख | ३१ ऑगस्ट २०२४ |
अधिकृत संकेतस्थळ | 👉येथे क्लिक करा |
मोफत बॅटरी फवारणी पंप योजना २०२४ उद्दिष्टे :
मोफत बॅटरी फवारणी पंप योजना २०२४ उद्दिष्टे खालीलप्रमाणे :
१. पिकांवरील रोगराई नियंत्रण :
⦿ फवारणी पंपाच्या सहाय्याने पिकावर कीटकनाशकांची फवारणी करून पिकावरील कीड तसेच रोगराई नियंत्रणामध्ये करता येत.
२. आर्थिक मदत :
⦿ १०० टक्के अनुदान प्रदान करून शेतकऱ्यांवरील आर्थिक भार कमी करणे.
३.उत्पादनामध्ये वाढ:
⦿ आधुनिक पंपाच्या सहाय्याने फवारणी करून पिकांवरील रोगराई कमी केल्याने शेतीतून मिळणाऱ्या उत्पादनामध्ये वाढ होते.
४. शारीरिक कष्ट कमी करणे :
⦿ पारंपारिक औषध फवारणी पंपाद्वारे फवारणी करताना शेतकऱ्यास जास्त शारीरिक कष्ट सहन करावे लागत होते,त्याएवजी आधुनिक पंपाच्या सहाय्याने फवारणी करून शारीरिक कष्टही कमी करता येणार आहे.
५. आर्थिक बचत :
⦿ मोफत बॅटरी फवारणी पंप योजनेंतर्गत अत्याधुनिक फवारणी पंप मोफत मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक भार कमी करून पैश्याची बचत होते.त्यामुळे शेतीसाठी लागणाऱ्या एकूण खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे.
६. आर्थिक उत्पन्नामध्ये वाढ :
⦿ उत्पादनामध्ये वाढ तसेच खर्च कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होते.
मोफत बॅटरी फवारणी पंप योजना २०२४ वैशिष्टे :
मोफत बॅटरी फवारणी पंप योजना २०२४ वैशिष्टे खालीलप्रमाणे :
⦿ मोफत बॅटरी फवारणी पंप योजनेंतर्गत शेतकऱ्यांना अत्याधुनिक फवारणी पंप हे विनामुल्य किंवा मोफत दिले जाणार आहेत.
⦿ या योजनेसाठी राज्यातील शेतकरी ज्यांच्याकडे स्व:ताची जमीन आहे तसेच जे महाराष्ट्र राज्याचे निवाशी आहेत अश्या शेतकऱ्यांना अर्ज करता येणार आहे.
⦿ मोफत बॅटरी फवारणी पंप योजनेसाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन तसेच ऑफलाईन अर्ज करता येणार आहे. हि अर्ज प्रक्रिया एकदम सुलभ ठेवण्यात आली आहे जेणेकरून शेतकऱ्यांना अर्ज करताना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही.
⦿ मोफत बॅटरी फवारणी पंप योजनेंतर्गत मिळणारे पंप हे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बनवलेले असतील जेणेकरून शेतकऱ्यांना औषध फवारणी वेळी कोणताही त्रास होणार नाही.
⦿ मोफत बॅटरी फवारणी पंप योजनेद्वारे मिळणारे पंप हे सरकारद्वारा वितरीत करण्यात येणार असल्यामुळे शेतकऱ्यांना विनाविलंब तसेच योग्य पद्धतीने मिळणार आहेत.
⦿ राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी हे फवारणी पंप कसे वापरावे याचे प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.
मोफत बॅटरी फवारणी पंप योजना २०२४ फायदे :
मोफत बॅटरी फवारणी पंप योजना २०२४ फायदे खालीलप्रमाणे :
⦿ आर्थिक बचत
⦿ पिक संरक्षण
⦿ उत्पादनामध्ये वाढ
⦿ रोगराईवर नियंत्रण
⦿ शेतीमध्ये सुधारणा
⦿ आर्थिक सुधारणा
⦿ अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
⦿ शेतीचा विकास
⦿ श्रम बचत
मोफत बॅटरी फवारणी पंप योजना २०२४ पात्रता :
मोफत बॅटरी फवारणी पंप योजना २०२४ पात्रता खालीलप्रमाणे :
⦿ मोफत बॅटरी फवारणी पंप योजनेसाठी अर्ज करण्याकरिता शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असला पाहिजे.
⦿ अर्जदार शेतकऱ्याकडे स्वताची जमीन असणे आवश्यक आहे.
⦿ अर्जदार शेतकऱ्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
⦿ बँक खात्याशी आधार कार्ड सलग्न असावे जेणेकरून आर्थिक व्यवहार सुलभरीत्या पार पडेल.
⦿ अर्जदार शेतकऱ्याने सर्व कागदपत्रे सादर करणे अनिर्वाय आहे.
⦿ शेतकऱ्याकडे ७/१२ ,८ अ असणे आवश्यक आहे.
मोफत बॅटरी फवारणी पंप योजना २०२४ आवश्यक कागदपत्रे :
मोफत बॅटरी फवारणी पंप योजना २०२४ आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे :
आधार कार्ड |
रहिवाशी दाखला |
७/१२ |
८ अ |
खरेदी करावयाच्या पंपाचे कोटेशन. |
पासपोर्ट आकाराचा फोटो |
मोबाईल क्रमांक |
बँक खातेबुक इत्यादी. |
मोफत बॅटरी फवारणी पंप योजनेसाठी अर्ज कसा करावा ?
तुम्हाला जर या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर खाली दिलेल्या बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे.
मोफत बॅटरी फवारणी पंप योजनेसाठी तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या ” महा.डी.बी.टी” पोर्टल वरून अर्ज करू शकता.त्याची संपूर्ण प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:
१. प्रथम महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत संकेतस्थळ “महा.डी.बी.टी” वर जाऊन तुम्हाला तुम्ही जर नवीन वापरकर्ते असाल तर नवीन नोंदणी करावी.
२. तुम्ही याआधी “महा.डी.बी.टी” पोर्टल वरून शासनाच्या विविध योजनाचा लाभ घेतला असेल तर तुम्हाला नवीन नोंदणी करावयाची आवश्यक्यता नाही.
३. अर्जदार शेतकऱ्याचे आधीचे खाते किंवा लॉगीन आयडी आणि पासवर्ड माहिती असल्यास तो टाकून लॉगीन करून घ्यावे.
४. यशस्वीरीत्या लॉगीन झाल्यानंतर मुख पृष्ठावर असलेल्या अर्ज करा या पर्यायावर क्लिक करा.
५. तुमच्या पसंतीच्या बाबी दाखवण्यात येतील त्यातून कृषी यांत्रिकीकरण हा पर्याय निवडायचा आहे.
६. त्या नंतर मुख्य घटक या पर्यायावर क्लिक करायचे आहे.त्यानंतर आपल्याला कृषी यंत्र औजारांच्या खरेदिसाठी अर्थसहाय्य हा घटक निवडायचा आहे.
७. आपल्याला तपशील या बटनावर क्लिक करून मनुष्यचलित औजारे हा पर्याय निवडायचा आहे.
८. त्यानंतर यंत्रसामुग्री,औजारे/उपकरणे यावर टिक करून पिक संरक्षण औजार हा पर्याय निवडायचा आहे.
९. त्यानंतर मशीन प्रकारावर जाऊन आपल्याला बॅटरी संचालित फवारणी पंप यावर क्लिक करायचे आहे.
१०. तसेच खाली दिलेल्या सर्व अटी आणि शर्थी मान्य करून आपला अर्ज सेव करयचा आहे.
११. अर्ज जतन केल्यांनतर होम पेज वर येऊन तुम्च्ला या योजनेसाठी अर्ज करायचा असल्यास अर्ज सादर करा या पर्यायावर क्लिक करा आणि आपण निवडलेल्या बाबींना १-२ प्राधान्य क्रमांक देऊन अर्ज सादर करायचा आहे.
१२. तुम्हाला २३ रुपये ६० पैसे इतके अर्जाचे पैसे ऑनलाईन भरायचे आहेत.हि फी यशस्वीरीत्या भरल्यानंतर शेतकऱ्यांनी पावती घ्यायची आहे.
१३. हि संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर अर्ज यशस्वीरीत्या भरल्याचा मेसेज प्राप्त होईल.
अर्जाचा तपशील पाहण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या कृषी अधिकाऱ्याशी संपर्क साधून संपर्क साधून माहिती घेऊ शकता.
मोफत बॅटरी फवारणी पंप योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने २६ ऑगस्ट २०२४ हि अंतिम तारीख जाहीर केलेली होती मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे या योजनेसाठी अर्ज करत असताना विलंब होत होता.तसेच राज्यातील राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेसाठी आज करता यावा यासाठी महाराष्ट्र सरकारने या योजनेसाठी अर्ज करण्यासाठीची अंतिम तारिख हि पुढे ढकलली आहे. या बातमीने शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.मोफत बॅटरी फवारणी यंत्र योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने ३१ ऑगस्ट २०२४ हिअंतिम तारीख जाहीर केली आहे.
Mofat Fawarani Pump Yojana 2024
महाराष्ट्र राज्य सरकारच्या योजना २०२४
सतत विचारले जाणारे प्रश्न:
मोफत बॅटरी फवारणी पंप योजनेसाठी कोण अर्ज करू शकते ?
उत्तर :
या योजनेसाठी महाराष्ट्र राज्यातील शेतकरी ज्यांच्याकडे रहिवाशी पुरावा आहे तसेच ज्या शेतकऱ्यांकडे स्व:ताची शेती आहे असे शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
.
मोफत बॅटरी फवारणी पंप योजनेसाठी अर्ज कसा करावा ?
उत्तर:
मोफत बॅटरी फवारणी पंप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतो.
.
अर्ज करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ?
उत्तर:
आधार कार्ड ,रहिवाशी दाखला,७/१२ ,८ अ,खरेदी करावयाच्या पंपाचे कोटेशन,पासपोर्ट आकाराचा,फोटो,मोबाईल क्रमांक ,बँक खातेबुक.
.
मोफत बॅटरी फवारणी पंप योजनेचा लाभ किती वेळा घेऊ शकतो ?
उत्तर:
एक शेतकरी एकदा या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
Mangesh