मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४ महाराष्ट्र | Mukhyamantri Ladaki Bahin Yojana 2024
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४ महाराष्ट्र :महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री मान.श्री.अजितदादा पवार यांनी महाराष्ट्र राज्याच्या सन २०२४ च्या अर्थसंकल्पामध्ये राज्यातील तरुण महिला ज्याचे वय २१ आहे तसेच ज्या महिलांचे वय ६० आहे यांच्यासाठी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४ महाराष्ट्र “ सादर केली.या योजनेंतर्गत महिलांना काय लाभ होणार आहेत ते आपण या लेखामध्ये पाहणार आहोत.या आणि अशाच योजनांची माहिती तुमच्या मोबाईलवर हवी असल्यास आमच्या अधिकृत संकेतस्थळाला तुमच्या बुकमार्क मध्ये सेव करून ठेवा.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४ थोडक्यात:
योजनेचे नाव | मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४ |
कोणी सुरु केली | महाराष्ट्र राज्य सरकार |
विभाग | महिला व बाल कल्याण विभाग,महाराष्ट्र राज्य |
लाभार्थी | राज्यातील २१ ते ६० वयोगटातील महिला |
लाभ | १५०० /- प्रत्येक महिना |
वार्षिक निधी | ४६ हजार कोटी रुपये |
अर्ज प्रकिया | लवकरच कळवण्यात येईल…… |
अधिकृत संकेतस्थळ | लवकरच कळवण्यात येईल…… |
आपल्या कुटुंबात स्त्री हा एक महत्वाचा घटक आहे तसेच स्त्री हा कुटुंबाचा कणा असतो.भारतीय समाजामध्ये अजूनही स्त्रीला समाजामध्ये कमी लेखले जाते,असमानतेची वागणूक दिली जाते.या सर्व बाबींचा विचार करता महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना” हा उपक्रम राबवला जात आहे.या योजनेंतर्गत वय वर्ष २१ ते वय वर्ष ६० असणाऱ्या महिलांसाठी सरकार प्रत्येकी १५०० रुपये दरमहिना देणार आहे.हि योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात येणार आहे.”मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी”सरकारने वार्षिक एकूण ४६ हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.समाजामधील महिलांना विचारात घेऊन सर्व बाबींची अंमलबजावणी केलेली आहे. या योजनेंतर्गत समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील महिलांना दर महिन्याला त्यांच्या बँक खात्यामध्ये १५०० रुपये जमा केले जातील.या योजनेचा लाभ हा राज्यातील वय २१ ते ६० असणाऱ्या तसेच अविवाहित,विधवा,निराधार,आर्थिक दुर्बल इत्यादी महिलांना घेता येणार आहे.महाराष्ट्र राज्य सरकारने हि योजना ‘राज्यातील युवती तसेच महिलांना स्वावलंबी तसेच आत्मनिर्भर बनवण्यासाठी’ हि योजना चालू केली असल्याचे सांगितले जाते.महाराष्ट्र राज्याने मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर हि योजना चालू केली आहे.या योजनेची घोषणा हि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री मान.श्री.अजितदादा पवार यांनी महाराष्ट्र राज्याच्या सन २०२४ च्या अर्थसंकल्पामध्ये केली.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४ महाराष्ट्र उद्दिष्टे :
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४ महाराष्ट्र उद्दिष्टे पुढीलप्रमाणे :
- या योजनेचा प्रमुख उद्देश हा राज्यातील महिला तसेच तरुणींना स्वावलंबी,आत्मनिर्भर,करण्यासाठी तसेच महिला व त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या संपूर्ण कुटुंब तसेच,मुलांची आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारना व्हावी हा आहे.
- आर्थिक तसेच दुर्बल घटकातील महिलांच्या बँक खात्यामध्ये थेट प्रतिमहिना १५०० रुपये आर्थिक मदत म्हणून जमा करणे.
- या योजनेचा लाभ हा समाजातील २१ ते ६० वयोगटातील विवाहित,विधवा,तसेच निराधार महिलांना मिळणार आहे.
- समाजामध्ये महिलांना समानतेची वागणूक तसेच खांद्याला खांदा लाऊन काम करण्यास प्रोत्साहन देणे.
- तरुणींना आर्थिक सहाय्य देऊन त्यांना आर्थिक स्वतंत्र प्रदान करणे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ कोणाला मिळणार ?
- आर्थिक दुर्बल घटकातील महिलांना प्रत्येक महिन्यात १५०० थेट बँक खात्यामध्ये मिळणार.
- या योजनेचा लाभ हा समाजातील २१ ते ६० वयोगटातील विवाहित,विधवा,तसेच निराधार महिलांना मिळणार आहे.
- ज्या महिलेचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न हे २.५० लाखापेक्षा कमी आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४ महाराष्ट्र वैशिष्ठे :
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४ महाराष्ट्र वैशिष्ठे पुढीलप्रमाणे :–
- योजनेचे लाभार्थी हे राज्यातील वय २१ ते ६० वर्षे असलेल्या महिला असून त्यांच्या बँक खात्यामध्ये प्रत्येक महिन्याला १५०० रुपये जमा होणार .
- या योजनेंतर्गत लाभार्थांच्या खात्यामध्ये “डी बी टी ” द्वारे अनुदान जमा केले जाणार.
- योजनेसाठी ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येतो.
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेंतर्गत महिलांना प्रत्येक महिन्याला आर्थिक सहाय्य मिळणार.
- राज्यातील 2 लाख युवतींना मिळणार लाभ.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४ फायदे :
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४ फायदे पुढीलप्रमाणे :-
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेंतर्गत मुलींना तसेच महिलांना आर्थिक सहाय्य मिळणार आहे,त्यामुळे कुटुंबाला आर्थिक सहायता मिळून कुटुंबाचा आर्थिक बोजा कमी होतो.
- दर महिना मिळणाऱ्या १५०० रुपये अनुदानातून कुटुंबातील पाल्यांना उच्च प्रतीचा पोषण आहार मिळण्यास मदत होऊन त्यांचे आरोग्य सुधारते.
- या योजनेतून मिळालेल्या रक्कमेतून मुलींना त्यांच्या विवाहासाठी थोड्या प्रमाणात आर्थिक मदत होऊ शकते.
- या योजनेतून मिळणाऱ्या अनुदानामुळे मुलींना आर्थिक स्वतंत्र मिळते जेणेकरून त्या स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकतील.
महाराष्ट्र सरकार २०२४ योजना:
लेक लाडकी योजना-महाराष्ट्र राज्य (२०२४) |
तार कुंपण योजना महाराष्ट्र राज्य २०२४ |
मोफत शिलाई मशीन योजना २०२४ महाराष्ट्र राज्य |
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४ पात्रता :
- लाभार्थी महिला तसेच युवती महाराष्ट्र राज्याच्या रहिवाशी असणे आवश्यक आहे.
- राज्यातील निराधार,आर्थिक दुर्बल,अविवाहित,विधवा महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
- वयाची किमान २१ वर्षे पूर्ण झालेली असावी तसेच कमाल वय हे ६० वर्षापर्यंत असावे.
- लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे २.५० लाखापेक्षा कमी असावे.
- लाभार्थ्याचे बँक खाते असणे अनिर्वाय.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४ आवश्यक कागदपत्रे :
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४ आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे –
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- रहिवाशी दाखला
- उत्पनाचा दाखला [२.५० लाखापर्यंतचा]
- बँक खाते पासबुक
- पासपोर्ट आकाराचा फोटो
Ladaki Bahin Yojana | मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४ अर्ज प्रक्रिया :
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री मान्य.श्री.अजितदादा पवार यांनी महाराष्ट्र राज्याच्या सन २०२४ च्या अर्थसंकल्पामध्येया योजेची घोषणा केली .जर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला थोडे दिवस प्रतिक्षा करावी लागणार आहे.अजुन महाराष्ट्र राज्य सरकारने अर्ज पद्धतीबाबत अजूनही काही माहिती अद्ययावत केलेली नाही. अद्ययावत केलेली माहिती तुम्हाला आमच्या अधिकृत वेबसाईट मिळेल.या आणि अशाच प्रकारच्या योजनांची माहिती मिळवण्यासाठी आमच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४ कोणत्या राज्यासाठी आहे ?
उत्तर:
महाराष्ट्र
.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण २०२४ योजनेंतर्गत किती लाभ मिळतो ?
उत्तर:
१५०० रुपये प्रती महिना.
.