मुख्यमंत्री वयोश्री योजना २०२४ महाराष्ट्र राज्य.
मुख्यमंत्री वयोश्री योजना २०२४ महाराष्ट्र राज्य|Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 : महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील लोकसंखेच्या जवळपास ११ ते १२ टक्के वयोवृद्ध नागरिक किंवा जेष्ठ नागरिकांसाठी ज्यांचे वय ६५ वर्षे पूर्ण व त्यापेक्षा जास्त आहे त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयानुसार येणारे अपंगत्व ,अशक्तपणा यावर उपयोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने खरेदी करता यावीत त्याचबरोबर मन:स्वास्थ केंद्रे ,योग उपचार केंद्रे इत्यादी द्वारा त्यांचे मानसिक त्याचबरोबर शारिरीक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी “मुख्यमंत्री वयोश्री योजना ” सुरु केली आहे.या योजन्द्वारे लाभार्थ्याला त्याच्या बँक खात्यामध्ये थेट एकरकमी रुपये ३००० [डी .बी .टी] द्वारे जमा होणार आहेत .या योजनेसाठी वार्षिक उत्पन्न हे 2.0 लाख मर्यादित असावे किंवा त्यापेक्षा कमी असावे . तर चला आपण या लेखामध्ये पाहूया या योजनेसाठी लागनारी कागदपत्रे ,अर्ज कसा करावा ? ,त्याचबरोबर या योजनेसाठी पात्रता काय असेल ? तुम्हाला जर ऑनलाईन अर्ज करून या योजनेचा संपूर्ण फायदा घ्यायचा असेल तर हा लेख तुम्हाला मदत करू शकतो .आम्ही या लेखामध्ये शासन निर्णय त्याचबरोबर पात्रता ,अर्ज कसा करायचा,अर्जाची पद्धत,फायदे,इत्यादी माहिती दिली आहे.यासारख्या अजून योजनाची माहिती आपल्या मोबाईल वर पाहिजे असेल तर आमच्या अधिकृत संकेतस्थळाला आपल्या बुकमार्क संपादिती करा.
योजनेचे नाव | मुख्यमंत्री वयोश्री योजना २०२४. |
शासन / राज्य | महाराष्ट्र राज्य |
उद्देश | राज्यातील जेष्ठ नागरिकांना आर्थिक मदत करणे. |
लाभ रक्कम | एकरकमी ३००० रुपये. |
लाभार्थी | राज्यातील जेष्ठ नागरिक |
बजेट | ४८० कोटी रुपये. |
वयोमर्यादा | ६५ वर्षापेक्षा जास्त |
अर्ज प्रक्रिया | ONLINE |
अधिकृत संकेतस्थळ | https://www.maharashtra.gov.in/Site/1567/Senior%20Citizens |
शासन निर्णय
मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी सरकारने G .R म्हणजेच शासन निर्णय जारी केला आहे .महाराष्ट्र सरकारने दिनांक ६ फेब्रुवारी २०२४ रोजी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळवर प्रसिद्ध केला आहे .या योजनेमधून लाभार्थी जेष्ठ नागरिक एकरकमी ३००० रुपये आपल्या खात्यात थेट मिळवू शकतो .याची संपूर्ण माहिती PDF मध्ये पाहू शकता .
मुख्यमंत्री वयोश्री योजना २०२४ PDF:
मुख्यमंत्री वयोश्री योजना उद्दिष्टे
- देशातील तसेच राज्यातील वयाची ६० वर्षे पूर्ण असलेले किंवा जेष्ठ नागरिक यांना त्यांच्या वृद्धापकाळामध्ये त्यांच्या काही कुटुंबाकडून त्यांना मदत मिळते तर काहींना मिळत नाही.त्यासाठी भारत सरकार तसेच महाराष्ट्र सरकाने जेष्ठ नागरिकासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना हि योजना चालू केली आहे.
- या योजनेतून जेष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरणे घेण्यासाठी सरकार आर्थिक मदत करते.
- या योजनेचे मुख्य उद्दिष्ट हे राज्यातील जेष्ठ नागरिकांना आत्मनिर्भर आणि स्वावलंबी बनवणे हे आहे .
- जेष्ठ नागरिकांना त्यांचे आयुष्य मोकळेपणाने जगता यावे त्याच बरोबर त्यांना कोणासमोर मदतीसाठी हात पसरावे लागणार नाहीत .
मुख्यमंत्री वयोश्री योजना वैशिष्ट्ये
- मुख्यमंत्री वयोश्री योजना हि संपूर्ण राज्यामधील ग्रामीण तसेच शहरी भागामध्ये राबवली जाणार आहे .
- प्रत्येक जिल्ह्यातील जवळपास ३०टक्के लाभार्थ्या ह्या महिला असतील.
- या योजनेतून मिळणारी सामुग्री हि मोफत दिली जाणार आहे.
- या योजनेचा लाभ राज्यातील सर्वच जेष्ठ तसेच अपंग नागरीक घेऊ शकतात.
मुख्यमंत्री वयोश्री योजनेंतर्गत मिळणारी उपकरणे
- चष्मा
- श्रवणयंत्र
- स्टिक व्हिल चेअर
- फोल्डिंग वॉकर
- कमोड खुर्ची
- नि-ब्रेस
- लंबर बेल्ट
- सर्वाइकल कॉलर इत्यादि.
मुख्यमंत्री वयोश्री योजना पात्रता
- मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी शासनाने काही नियमावली सादर केली आहे .त्याच नियमावलीच्या आधारे आपण आपली पात्रता तपासू शकतो.
- लाभार्थी हा भारतीय असावा.
- लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा नागरिक असावा त्याचबरोबर तो राज्याचा कायमस्वरूपी रहिवाशी असावा.
- लाभार्थ्याचे वय हे ६५ वर्षे पूर्ण केलेली असावीत किंवा त्यापेक्षा जास्त असावे.
- लाभार्थ्याकडे त्याचे ओळखपत्र म्हणजेच आधार कार्ड असावे ,किंवा आधार कार्ड साठी अर्ज केला असेल तर त्याची पावती असावी.
- लाभार्थी जेष्ठ नागरिकाचे वार्षिक उत्पन्न हे 2.५ लाखापेक्षा कमी असावे.
- लाभार्थ्याने म्हणजेच जेष्ठ नागरिकांनी देण्यात येणाऱ्या ३००० रुपये रकमेची सामग्री घेऊन त्याचे प्रशिक्षण पूर्ण केलेले प्रमाणपत्र संबधित सहायक आयुक्त यांच्याकडे ३० दिवसांच्या आत जमा करणे आवश्यक आहे.
मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे फायदे
या योजनेचे अनेक फायदे हे लाभार्थी वयोवृद्ध किंवा जेष्ठ नागरिक यांना होणार आहेत. जेष्ठ नागरिकांना महाराष्ट्र सरकार कडून एकरकमी ३००० रुपये इतका निधी आर्थिक मदत म्हणून देण्यात येणार आहे .या योजनेचा मुख्य उद्देश हा आहे कि ,उतारवयात जेष्ठ नागरिकांना अनेक व्याधी जडल्या जातात त्याच व्याधी अथवा अशक्तपणा यांवर उपचार घेता यावा किंवा या आर्थिक मदतीतून त्यांना त्यांच्यासाठी लागनारी विविध सामग्री खरेदी करता यावी हा आहे .यामुळे त्यांचे मानसिक त्याचबरोर शाररीक आरोग्य सुधारून त्यांना सदृढ राहण्यास मदत होईल . याच निधीमधून लाभार्थी विविध साधनसामग्री घेऊन त्यांचा उपयोग करू शकतात .
मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी अर्ज कसा करावा :
महाराष्ट्र सरकारद्वारे मुख्यमंत्री वयोश्री योजना हि दिनांक ५ फेब्रुवारी २०२४ रोजी मंत्रीमंडळामध्ये सदर करण्यात आली त्याचबरोबर ६ फेब्रुवारी २०२४ ला या योजनेचा शासन निर्णय जरी करण्यात आला .परुंतु अद्याप हि या योजनेची अधिकृत अर्ज करण्याची प्रक्रिया शासनाकडून जाहीर करण्यात आलेली नाही .या योजनेसाठी राष्ट्रीय योजनेच्या धरतीवर महाराष्ट्र राज्यासाठी महाराष्ट्र राज्य माहिती तंत्रज्ञान विभागाकडून नवीन पोर्टल तयार करून त्याची माहिती अधिकृत संकेतस्थळावर जरी केली जाईल . अर्ज करण्याची प्रकिया शासनाद्वारे जाहीर करण्यात येईल . तत्पूर्वी सर्व कागदपत्रांची जुळवाजुळव करून ठेवावी.अजून शासनाकडून अर्ज करण्याची तारीख जाहीर झाली नसल्यामुळे अंतिम तारीख हि शासनाकडून जाहीर करण्यात आलेली नाही .शासनाकडून अर्ज करण्याची तारीख जाहीर करण्यात आल्यानंतर तुम्हाला आपल्या संकेतस्थळावर कळवण्यात येईल .त्यासाठी आत्ताच आपले संकेतस्थळ बुकमार्क मध्ये सेव्ह करून ठेवा .
शिलाई मशीन योजना २०२४ महाराष्ट्र राज्य | Silai Machine Yojana Maharashtra 2024.
मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा कराल ?
- राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या धरतीवर मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत पोर्टल वर ऑनलाईन फॉर्म भरण्यास सुरुवात होईल .त्यासाठी खालीलप्रमाणे प्रक्रिया असेल .
- सर्वप्रथम महाराष्ट्र सरकारद्वारे चालू करण्यात आलेल्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या .
- अधिकृत संकेतस्थळावर गेल्यानंतर मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन असा पर्याय असेल त्यावर क्लिक करा .
- रजिस्ट्रेशन करताना काळजीपूर्वक संपूर्ण माहिती भरावयाची आहे.चुकीची माहिती भरल्यास तुम्ही योजनेमधून बाद होऊ शकता .
- वर दिलेल्या कागदपत्रांची पूर्तता सोफ्ट कॉपी स्वरूपात ऑनलाईन भरायची आहे .
- संपूर्ण फॉर्म भरून झाल्या नंतर सबमिट यावर क्लिक करायचे आहे.
- अशा प्रकारे तुम्ही मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.
मुख्यमंत्री वयोश्री योजना २०२४ महाराष्ट्र राज्य | Mukhyamantri Vayoshri Yojana 2024
FAQ’s :
- मुख्यमंत्री वयोश्री योजने अंतर्गत लाभार्थ्याला किती अनुदान मिळते ?
- मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतील ?
- मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा ?
- मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी लाभार्थी कोणत्या राज्याचा रहिवाशी असावा ?
- मुख्यमंत्री वयोश्री योजने मधून लाभार्थ्यास किती रक्कम मिळणार आहे ?