मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण योजना २०२४ महाराष्ट्र |Mukhymantri Mazi Ladaki Bahin Yojana-2024 New Updates. काय आहेत ७ नवीन नियम ? घरबसल्या करा अर्ज.पहा सविस्तर माहिती..

marathiyojanainfo.com
7 Min Read
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण योजना २०२४ महाराष्ट्र |Mukhymantri Mazi Ladaki Bahin Yojana-2024 New Updates. काय आहेत ७ नवीन नियम ? घरबसल्या करा अर्ज.पहा सविस्तर माहिती..

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण योजना २०२४ महाराष्ट्र :महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री मान.श्री.अजितदादा पवार यांनी महाराष्ट्र राज्याच्या सन २०२४ च्या अर्थसंकल्पामध्ये राज्यातील महिला ज्यांचे वय २१ आहे तसेच ज्या महिलांचे वय ६० आहे यांच्यासाठी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४ महाराष्ट्र “ सादर केली.राज्य सरकारने प्रसारित केलेले सुधारित नियम,अर्ज प्रक्रिया तसेच या योजनेंतर्गत महिलांना काय लाभ होणार आहेत ते आपण या लेखामध्ये पाहणार आहोत.या आणि अशाच योजनांची माहिती तुमच्या मोबाईलवर हवी असल्यास आमच्या अधिकृत संकेतस्थळाला तुमच्या बुकमार्क मध्ये सेव करून ठेवा.

महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना” हा उपक्रम राबवला जात आहे.या योजनेंतर्गत वय वर्ष २१ ते वय वर्ष ६० असणाऱ्या महिलांसाठी सरकार प्रत्येकी १५०० रुपये दरमहिना देणार आहे.हि योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात येणार आहे.”मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी”सरकारने वार्षिक एकूण ४६ हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.समाजामधील महिलांना विचारात घेऊन सर्व बाबींची अंमलबजावणी केलेली आहे. या योजनेंतर्गत समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील महिलांना दर महिन्याला त्यांच्या बँक खात्यामध्ये १५०० रुपये जमा केले जातील.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेबद्दल थोडक्यात माहिती :

योजनेचे नावमुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४ [New Updates]
कोणी सुरु केलीमहाराष्ट्र राज्य सरकार
विभागमहिला व बाल कल्याण विभाग,महाराष्ट्र राज्य
लाभार्थीराज्यातील २१ ते ६५ वयोगटातील महिला
लाभ१५००/- प्रत्येक महिना
वार्षिक निधी४६ हजार कोटी रुपये
अर्ज प्रकियाऑनलाईन आणि ऑफलाईन.
अधिकृत संकेतस्थळ/
अप्प्लीकेशेन
“नारीशक्ती दूत
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेबद्दल थोडक्यात माहिती

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी बदल करण्यात आलेले ७ नवीन नियम :

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना बदल करण्यात आलेले ७ नवीन नियम खालीलप्रमाणे:

  • अर्ज मुदतवाढ :
    • मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी मुदत हि १ जुलै २०२४ पासून १५ जुलै २०२४ पर्यंत ठेवण्यात आली होती.पण अर्ज प्रक्रियेसाठी लागणारा वेळ,कागदपत्रांची जुळवाजुळव यासारख्या कारणामुळे योजनेच्या अर्ज प्रक्रियेमध्ये सुधारणा करण्यात आली असून अर्ज करण्याची मुदत हि दोन महिन्याची करण्यात आली आहे.
    • सुधारणा करण्यात आलेली अर्ज मुदतवाढ हि १ जुलै २०२४ पासून ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत आहे.१ जुलै २०२४ पासून ३१ ऑगस्ट २०२४ या कालावधी मध्ये भरलेल्या अर्जदार महिलांना या योजनेचा लाभ हा जुलै महिन्यापासून मिळणार आहे.
  • अधिवास प्रमाणपत्र :
    • मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद केल होत,पण आता यामध्ये सुधारणा करून अर्जदार महिलेस १५ वर्षापूर्वीचा रहिवाशी पुरावा किंवा कागदपत्रे सदर करणे आवश्यक आहे.
    • १५ वर्षापूर्वीचा रहिवाशी पुरावा.उदा:
      • रेशन कार्ड.
      • मतदान कार्ड.
      • जन्म दाखला.
      • शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र
    • वरीलपैकी कोणताही एक पुरावा किंवा एक ओळखपत्र ग्राह्य धरले जाईल.

  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी ५ एकर जमिनीची अट रद्द केलेली आहे.

  • वय मर्यादा :
    • सदरच्या योजनेसाठी राज्य सरकारकडून वयोगटामध्ये सुधारणा केलेली आहे.
    • वय वर्ष २१ ते वय वर्ष ६० वरून वय वर्ष २१ ते वय वर्ष ६५ करण्यात आले आहे.
  • परराज्यातील महिलांसाठी सुधारित नियम:
    • ज्या महिलांचा जन्म परराज्यात झाला आहे व त्यांचा विवाह हा महाराष्ट्रातील पुरुषाशी झाला आहे अश्या महिलांसाठी या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांना संबधित पुरुषाची कागदपत्रे सदर करावी लागतील.
    • पतीचे आवश्यक कागदपत्रे :
      • जन्म दाखला.
      • शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र.
      • रहिवाशी दाखला.
  • वार्षिक उत्पन्न :
    • मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी वार्षिक उत्पन्नाची अट हि अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे २.५ लाखांपर्यंत असावे यामध्ये सुधारणा करून ज्या अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे पिवळे किंवा केशरी रंगाचे रेशन कार्ड असल्यास त्या महिलेस वार्षिक उत्पन्न प्रमाणपतत्रातून सवलत मिळणार आहे.
    • अर्जदार हा पिवळे किंवा केशरी रंगाच्या रेशन कार्डद्वारे अर्ज करू शकतो.
  • अविवाहित महिला :
    • सदरच्या योजनेमध्ये हि महत्वपूर्ण सुधारणा केली गेली आहे.
    • कुटुंबातील एक अविवाहित महिला या योजनेसाठी अर्ज करू शकते.

Mukhyamantri Ladaki Bahin Yojana (2024) |मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४ महाराष्ट्र | महिलांना मिळणार प्रती महिना १५००/- रुपये.काय आहे योजना ?अर्ज कसा करायचा पहा सविस्तर एका क्लिक वर.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी महत्वाची कागदपत्रे :

  • आधार कार्ड.
  • १५ वर्षापूर्वीचा पुरावा: [खालीलपैकी कोणताही एक]
    • डोमासाईल दाखला.
    • शाळा सोडल्याचा दाखला.
    • जन्म दाखला.
    • मतदान कार्ड.
  • उत्पनाचा दाखला किंवा पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड.
  • हमीपत्र.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४ अर्ज -PDF

ऑनलाईन अर्ज कसा करावा ?

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या पद्धतीचा अवलंब करावा जेणेकरून तुम्ही तुमच्या मोबाईलवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी यशस्वी अर्ज करत येईल.

  • मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण योजना २०२४ महाराष्ट्र साठी अर्ज करण्यासाठी तुमच्या मोबाईल मध्ये “Google Play Store” मध्ये जाऊन “नारीशक्ती दूत” हे महाराष्ट्र राज्य सरकारचे अधिकृत अप्प्लीकेशेन डाऊनलोड करा.
  • अप्प्लीकेशेन उघडल्यानंतर डावीकडे असलेल्या “Skip” या पर्यायावर क्लिक करा.
  • Login करण्यासाठी तुमच्यासमोर एक पृष्ठ येईल त्यामध्ये तुमचा मोबाईल क्रमांक तसेच OTP टाकून Login करा.
  • तुमच्या समोर एक माहिती समोर येईल ज्यामध्ये “आपली माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा” असा पर्याय असेल त्यावर क्लिक करा.
  • पुढच्या पायरीमध्ये विचारलेली संपूर्ण माहिती अचूक तसेच योग्यरीत्या भरा आणि खाली दिलेल्या “अपडेट करा“या पर्यायावर क्लिक करा.
  • खाली डाव्या कोपऱ्यामध्ये दिसणाऱ्या दिसणाऱ्या “नारीशक्ती दूत” या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्हाला “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना असा एक पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
  • ज्या महिलेचा अर्ज करायचा त्या महिलेची संपूर्ण माहिती अचूकरीत्या भरा.
    • उदा : संपूर्ण नाव
    • गावाचे नाव.
    • पत्ता
    • आधार कार्ड क्रमांक
    • मोबाईल क्रमांक
    • बँक खाते तपशील इत्यादी माहिती भरा.
  • खाली दिलेली आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत:
आधार कार्ड
जन्म प्रमाणपत्र
उत्पन्न प्रमाणपत्र
अर्जदाराचे हमीपत्र
बँक खाते पासबुक
अर्जदाराचा फोटो
  • दिलेली माहिती अचूक आहे कि नाही याची खात्री करून घ्यावी.
  • तसेच अपलोड केलेली कागदपत्रे बरोबर आहेत कि नाही याची खात्री करून घ्यावी.
  • त्यानंतर फॉर्म सबमिट या पर्यायावर क्लिक करा.
  • फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुम्हाला एक OTP प्राप्त होईल,तो OTP टाकून “वेरीफाय OTP” यावर क्लिक करा.
  • अशाप्रकारे तुमचा अर्ज यशस्वीरीत्या भरला जाईल.
  • तुम्ही भरलेला अर्ज जर तुम्हाला पाहायचा असेल तर “यापूर्वी केलेले अर्ज”यावर क्लिक करून तुम्ही भरलेल्या अर्जाची संपूर्ण माहिती घेऊ शकता.

कडबा कुट्टी मशीन योजना महाराष्ट्र (२०२४) | मिळणार ५०% अनुदान . Kadaba Kutti Machine Yojana 2024.असा करा अर्ज.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना कोणी सुरु केली?

उत्तर:
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना महाराष्ट्र राज्य सरकारने सुरु केली
.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी सुधारित वय किती केले आहे?

उत्तर:
वय वर्ष २१ ते वय वर्ष ६५.
.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज कसा करू शकतो ?

उत्तर:
या योजनेसाठी “नारीशक्ती दूत ” या महाराष्ट्र राज्य सरकारच्या अधिकृत अप्प्लीकेशेन वरून तुम्ही अर्ज करू शकता.
.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?

उत्तर:
आधार कार्ड,मतदान कार्ड,शाळा सोडल्याचा दाखला,पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड इत्यादी.
.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *