मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना २०२४ |Mukhymantri Tirth Darshan Yojana 2024:भारत देश हा विविधतेने नटलेला देश आहे.देशामध्ये अनेक राज्यांमध्ये विविध धर्म,जाती,भाषा,प्रदेश विविधता आढळते.देशामध्ये विविध धर्माचे तसेच पंथांचे अनुयायी विविध ठिकाणी पाहायला मिळतात.देशामध्ये हिंदू,मुस्लीम,शीख,इसाई,बौध्द धर्माचे लोक राहतात.देशामध्ये हिंदू धर्मामध्ये चारधाम यात्रा,वैष्णोदेवी यात्रा,अमरनाथ यात्रा,केदारनाथ यात्रा तसेच इतर धार्मियांसाठीही अनेक मोठी तीर्थस्थळे आहेत.आयुष्यामध्ये एकदा तरी आपल्या धर्मातील तीर्थक्षेत्रांची यात्रा करावी हे प्रत्येक धार्मिकाचे स्वप्न असते.महाराष्ट्र राज्य हे संतांची भूमी तसेच पावनभूमी म्हणून ओळखले जाते.महाराष्ट्र राज्याने देशाला मोठ मोठे संत,महान व्यक्ती तसेच त्यांचे योगदान दिले आहे.महाराष्ट्र राज्याला वारकरी सांप्रदायाची परंपरा हि शेकडो वर्षापासून चालत आलेली आहे.पण गरिबी,आर्थिक दुर्बलता,अपुरी माहिती,यात्रेचा अनुभव नसल्यामुळे अनेकांचे हे तीर्थ दर्शन यात्रेचे स्वप्न अपूर्ण राहते.सदरची बाब लक्षात घेता तसेच इतर राज्यांनी सुरु केलेल्या उपक्रमांच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य सरकारनेही राज्यातील जे नागरिक आपल्या गरिबी,आर्थिक दुर्बलता किंवा इतर कारणास्तव या तीर्थ दर्शन यात्रेंचा लाभ घेऊ शकत नाहीत अश्या जेष्ठ नागरिकांसाठी किंवा ज्या नागरिकांचे वय हे ६० तसेच त्याहून अधिक आहे त्यांसाठी एक नवीन उपक्रम किंवा योजना चालू केली आहे.या योजनेंतर्गत राज्यातील नागरिकांना मनसोक्त तसेच इतर कोणत्याही गोष्टींची परवा न करता या तीर्थ दर्शन यात्रेचा लाभ घेऊ शकतील.”मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना” असे या योजनेचे नाव असून या योजनेतून जेष्ठ नागरिकांना शासनाने नमूद केलेल्या तीर्थ क्षेत्रांची यात्रा करता येणार आहे.तर चला पाहू काय आहे “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना”,काय आहेत या योजनेचे फायदे ? कोणाला मिळणार लाभ ? तसेच अर्ज कसा करायचा ?या आणि इतर योजनांची माहिती मिळवण्यासाठी आमच्या “www.marathiyojanainfo.com” या अधिकृत संकेतस्थळाला तुमच्या बुकमार्क मध्ये सेव करून ठेवा म्हणजे केंद्र तसेच राज्य सरकारच्या नवनवीन योजनाची माहिती तुमच्यापर्यंत मिळून जाईल.
शासन निर्णय [PDF]
महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मातील लोकांना ज्यांचे वय ६० किंवा त्यापेक्षा जास्त आहे,त्यांना देशातील धार्मिक तीर्थक्षेत्रांना यात्रा करण्याचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना २०२४”या योजनेस मान्यता देण्यात आली आहे.
योजना माहिती थोडक्यात
योजनेचे नाव | मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना २०२४ |
कोणी सुरु केली | महाराष्ट्र सरकार |
योजनेचा उद्देश | राज्यातील जेष्ठ नागरीकांना मोफत तीर्थ-दर्शन यात्रा. |
लाभार्थी | राज्यातील जेष्ठ नागरिक. |
लाभ रक्कम | यात्रेचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करेल. [३००००/-पर्यंत ] |
वयोमर्यादा | ६० वर्षे पूर्ण असावीत. |
अर्ज प्रक्रिया | ऑफलाईन व ऑनलाईन |
अधिकृत संकेतस्थळ | https://sjsa.maharashtra.gov.in/mr |
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना २०२४ उद्दिष्टे :
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत :
- १. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा मुख्य उद्देश हा महाराष्ट्र राज्यातील जेष्ठ नागरिक किंवा ज्यांचे वय हे ६० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त आहे अश्या नागरिकांना देशातील धार्मिक स्थळांची तीर्थयात्रा मोफत उपलब्ध करून देणे हा आहे.
- २. समाजामध्ये धार्मिकता निर्माण करणे.
- ३. समाजामध्ये एकोप्याची भावना निर्माण करणे.
- ४. राज्यातील जेष्ठ नागरिकांना धार्मिक स्थळांच्या यात्रेचा आनंद मिळवून देणे.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेची वैशिष्टे :
- १. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेंतर्गत राज्यातील जेष्ठ नागरिक जे आर्थिक दुर्बल किंवा इतर कारणामुळे तीर्थ यात्रेंचा लाभ घेऊ शकत नाहीत अश्या जेष्ठ नागरिकांना देशातील तीर्थ यात्रा करण्यासाठी आर्थिक मदत किंवा तीर्थयात्रा मोफत उपलब्ध करून देणे.
- २. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेंतर्गत महाराष्ट्र तसेच देशातील प्रमुख तीर्थ क्षेत्रांचा समावेश असेल.
- ३. तीर्थ यात्रेदरम्यान होणारा खर्च हा प्रती व्यक्ती ३००००/- असून यामध्ये जेष्ठ नागरिकांसाठी लागणाऱ्या प्रवास,भोजन,तसेच निवास याचा यामध्ये समावेश असणार आहे.
- ४. या योजनेचा लाभ हा महाराष्ट्र राज्यातील ज्या जेष्ठ नागरिकांचे वय ६० किंवा त्यापेक्षा जास्त आहे त्यांना घेता येणार आहे.
- ५. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन या योजनेंतर्गत जेष्ठ नागरीकांना देशातील जवळपास ७३ सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्रे तसेच महाराष्ट्रातील ६६ तीर्थक्षेत्रांच्या यात्रेचा लाभ घेता येणार आहे.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचे लाभ :
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचे लाभ पुढीलप्रमाणे आहेत :
- मोफत यात्रा दर्शन:
- मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेंतर्गत लाभार्थ्यांना निवडलेल्या तीर्थ क्षेत्रांची यात्रा मोफत करता येते.यामध्ये यात्रेंचा संपूर्ण खर्च महाराष्ट्र सरकार उचलणार आहे,यामध्ये प्रवास,भोजन,तसेच निवास या सोयी सुविधा उपलब्ध आहेत,त्यामुळे जेष्ठ नागरिकांना कोणताही आर्थिक भर उचलावा लागत नाही.
- मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेंतर्गत लाभार्थ्यांना निवडलेल्या तीर्थ क्षेत्रांची यात्रा मोफत करता येते.यामध्ये यात्रेंचा संपूर्ण खर्च महाराष्ट्र सरकार उचलणार आहे,यामध्ये प्रवास,भोजन,तसेच निवास या सोयी सुविधा उपलब्ध आहेत,त्यामुळे जेष्ठ नागरिकांना कोणताही आर्थिक भर उचलावा लागत नाही.
- जेष्ठांना प्राधान्य:
- मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्य सरकारने जेष्ठ नागरिक ज्यांचे वय ६० किंवा त्यापेक्षा जास्त आहे त्यांना प्राधान्य देण्यात आले आहे.
- जे नागरिक आर्थिकदृष्ट्या दुर्बल,गरीब,तसेच यात्रेचा खर्च उचलू शकत नाहीत अश्या लोकांनासुद्धा या यात्रेमध्ये प्राधान्य देण्यात आले आहे.
- सुरक्षित व सुंदर प्रवास:
- मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेंतर्गत लाभार्थ्यांना सुरक्षित तसेच सर्व सोई-सुविधांपूर्ण यात्रा दर्शन करता येणार आहे.
- या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना आवश्यक त्या सुविधा पुरवल्या जाणार आहेत.
- सामाजिक एकोपा:
- विविध धार्मिक स्थळांच्या यात्रेमुळे वेगवेगळ्या राज्यातील तसेच प्रदेशातील लोकांच्या गाठीभेटी जुळून येतात,त्यामुळे समाजामध्ये तसेच धर्मांमध्ये एकोप्याची भावना निर्माण होते.
- तीर्थयात्रा करून मानसिक संतुलन तसेच समाजामध्ये सामंजस्य वाढते.
- प्रवास खर्च :
- मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेंतर्गत नागरिकांवर होणारा संपूर्ण खर्च महाराष्ट्र सरकार उचलणार आहे त्यामुळे नागरिकांवर अतिरिक्त खर्चाचा बोजा असणार नाही आहे.
- प्रवासामध्ये रेल्वे टिकत किंवा बस तिकेटचा समावेश असणार आहे त्याचा संपूर्ण खर्च सरकार उचलणार आहे.
- राहण्याची उत्तम सोय :
- या योजनेंतर्गत यात्रेदरम्यान होणाऱ्या निवासाची सोय हि राज्य सरकार द्वारे करण्यात येणार आहे.
- निवासामध्ये राहण्याची तसेच इतर काळजी घेतली जाणार आहे.
- भोजन व्यवस्था :
- सकस तसेच उत्तम पोषक भोजनाची व्यवस्थाहि या योजनेंतर्गत केली जाणार आहे.
- सकस तसेच उत्तम पोषक भोजनाची व्यवस्थाहि या योजनेंतर्गत केली जाणार आहे.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेची पात्रता :
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेची पात्रता पुढीलप्रमाणे –
- १. अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवाशी असला पाहिजे.
- २. अर्जदाराचे वय हे ६० किंवा त्यापेक्षा जास्त असावे.
- ३. अर्जादाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे २.५० लाखापेक्षा कमी असावे.
- ४. या योजनेचा लाभ हा कुटुंबातील एकाच व्यक्तीला दिला जाणार आहे.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेची अपात्रता किंवा अटी आणि शर्थी :
१. अर्जदाराच्या कुटुंबामध्ये आयकर दाता नसावा.
२. अर्जदाराच्या कुटुंबामध्ये सरकारी नोकरदार नसावा.
३. कुटुंबामध्ये आजी किंवा माजी आमदार किंवा खासदार असणे.
४. अर्जदाराच्या कुटुंबामध्ये सदस्याच्या नावावर कोणतीही चारचाकी नसावी.
५. अर्जदार हा मानसिक तसेच शाररीक दृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे.
६. जे अर्जदार निवडीमध्ये पात्र होऊन त्यांना आमंत्रण देहूनही सहभागी झाले नाहीत ते नागरिक अपात्र राहतील.
७. जर अर्जदाराने खोटी माहिती देऊन या योजनेचा लाभ घ्यायचा प्रयत्न केला तर त्या नागरिकावर कायमची अपात्रता होईल.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना २०२४ महाराष्ट्र आवश्यक कागदपत्रे :
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत:
ऑनलाई अर्ज
आधार कार्ड
रेशन कार्ड
महाराष्ट्र राज्यातील अधिवास प्रमाणपत्र [अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास :-शाळा सोडल्याचा दाखला,रेशन कार्ड,मतदान ओळखपत्र किंवा जन्म दाखला ग्राह्य धरला जाईल.]
२.५० लाखांपर्यंतचा उत्पन्नाचा दाखला किंवा केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड.
वैद्यकीय प्रमाणपत्र.
पासपोर्ट साईझचा फोटो.
मोबाईल क्रमांक.
हमीपत्र.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना 2024 महाराष्ट्र- अर्ज कसा करावा ?
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेची घोषणा हि १४ जुलै २०२४ रोजी झाली असून या योजनेसाठी ऑनलाईन पोर्टल बनवण्याचे काम महाराष्ट्र राज्य सरकारकडून चालू आहे ती लवकरच तुम्हाला लेखाद्वारे कळवले जाईल.
तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज केल्यानंतर त्या अर्जाची छाननी होऊन तुमची निवड केली जाईल.
अर्ज करत असताना लागणारी महत्वाची कागदपत्रे:
कुटुंबाचे रेशन कार्ड
अर्जदाराचे आधार कार्ड.
भारतातील सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्रे :
सतत विचारले जाणारे प्रश्न :-
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना कोणी सुरु केली ?
उत्तर:
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेची सुरुवात महाराष्ट्र राज्य सरकारने केली आहे.
.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी कोण अर्ज करू शकते ?
उत्तर:
या योजनेसाठी जे जेष्ठ नागरिक अर्ज करू शकतात ज्यांचे वय हे ६० किंवा त्यापेक्षा जास्त आहे.
.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा काय फायदा आहे ?
उत्तर:
राज्यातील जेष्ठ नागरीकांना राज्यातील तसेच देशातील तीर्थ क्षेत्रांना मोफत यात्रा करता येते.
.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी अर्ज कसा करावा ?
उत्तर:
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी ऑनलाईन तसेच ऑफलाईन अर्ज करू शकतो.
.
महाराष्ट्र राज्य सरकारच्या योजना :
फेक लिंक
नोंदणी अर्ज मिळत नाही. तीच तीच भारूड माहिती गेत रहातात.
मला नोंदणी अर्ज पाहिजे.
8766764641
shriramkale.sk@gmail.com