PM सूर्य घर:मोफत वीज योजना २०२४.महाराष्ट्र राज्य | PM SURY GHAR:MOFAT VIJ YOJANA 2024 .सरकार देणार ३०० युनिट वीज मोफत.पहा अर्ज कसा करायचा,आवश्यक कागदपत्रे,पात्रता एका क्लिक वर.

marathiyojanainfo.com
8 Min Read
PM सूर्य घर मुफ्त बिजली योजना २०२४.महाराष्ट्र राज्य|सरकार देणार ३०० युनिट वीज मोफत.पहा अर्ज कसा करायचा,आवश्यक कागदपत्रे,पात्रता एका क्लिक वर....

PM सूर्य घर मुफ्त बिजली योजना २०२४ महाराष्ट्र राज्य.

PM सूर्य घर:मोफत वीज योजना २०२४.महाराष्ट्र राज्य | PM SURY GHAR:MOFAT VIJ YOJANA 2024 .सरकार देणार ३०० युनिट वीज मोफत.पहा अर्ज कसा करायचा,आवश्यक कागदपत्रे,पात्रता एका क्लिक वर.
PM सूर्य घर मुफ्त बिजली योजना २०२४.महाराष्ट्र

PM सूर्य घर: मोफत वीज योजना|PM SURY GHAR:MOFAT VIJ YOJANA 2024-भारत देश हा विविधतेने तसेच उन्हाळा ,पाऊसाळा,हिवाळा हे  तीन ऋतू लाभलेला देश आहे.भारतामध्ये तुम्ही पाहू शकता दर चार महिन्यांनी एक ऋतू आपल्याला पाहायला मिळतो .भारत सरकारने देशातील नागरिकांसाठी सौर उर्जेचा [उन्हाळा ऋतूचा ] फायदा करून देण्यासाठी ,विजेवर होणाऱ्या आवाढव्य खर्चाला कमी करण्यासाठी तसेच देशातील नागरिकांसाठी सौर उर्जेचा वापर करून कमीत कमी खर्चामध्ये स्वच्छ आणि स्वस्त वीज उपलब्ध करून देण्यासाठी हि योजना अंमलात आणली आहे. भारत सरकार नेहमीच देशातील नागरिकांचा आर्थिक,सामाजिक विकास व्हावा यासाठी प्रयत्नशील असते.या योजनेचा मुख्य उद्देश हा देशातील १ कोटी परिवारांना दर महिना ३०० युनिट एवढी वीज मोफत देऊन त्यांचे जीवन प्रकाशमय करणे हा आहे.या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी भारत सरकारने एकूण ७५००० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सदर केला आहे.भारत सरकारची हि योजना पारदर्शी असून यामध्ये लाभार्थ्यास मिळणारा निधी हा “DIRECT BENIFIT TRANSFER [DBT]” द्वारे लाभार्थ्याच्या थेट बँक खात्यामध्ये जमा होणार आहे.या योजनेमधून भारत सरकार नागरिकांना अनुदान स्वरुपात मदत देऊन हि योजना राबवण्यात प्रोत्साहन देत आहे.या योजनेतून देशभरातून १ कोटी परिवारांची वार्षिक १५००० कोटी रुपयांची बचत होणार आहे.या योजनेमुळे नागरिकांचा विजेवर होणारा खर्च हा कमी होणार असून आवश्यकतेपेक्षा जास्त निर्माण झालेली वीज नागरिक वीज वितरण कंपनीला विक्री करून त्यातून उत्पन्न मिळू शकतात.तसेच या योजनेतून सौर पॅनल बनवणाऱ्या तसेच जोडणी करणाऱ्या युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.

PM सूर्य घर: मोफत वीज योजना थोडक्यात माहिती :

योजनेचे नाव PM सूर्य घर: मोफत वीज
योजना महाराष्ट्र राज्य २०२४.
कोणी सुरु केली केंद्र सरकार [२२ जाने २०२४].
लाभार्थी देशातील नागरिक.
उद्देशदेशातील नागरिकांना मोफत
वीज देणे.
लाभ महिन्याला ३०० युनिट मोफत
वीज.
विभाग नवीकरणीय उर्जा मंत्रालय .
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन.
अधिकृत संकेतस्थळ www.pmsuryaghar.gov.in

PM सूर्य घर: मोफत वीज योजना उद्दिष्टे : 

  • PM सूर्य घर मुफ्त बिजली या योजनेचा मुख्य उद्देश हा देशातील नागरिकांना स्वस्त आणि स्वच्छ वीज पुरवठा करण्यास मदत करणे ,पर्यावरणाचा होणार ऱ्हास कमी करून नैसर्गिक ऊर्जास्रोतांचा वापर करणे  तसेच वीज बिलामध्ये बचत करणे हा आहे .
  • या योजनेतून देशातील जवळपास १ कोटी परिवारांना सौर उर्जेचा वापर करण्यास प्रोत्साहन देऊन दर महिना ३०० युनिट वीज मोफत देणे .
  • छतावरील सोलर पॅनलद्वारे वीज निर्मिती करून पारंपारिक कोळश्यावर चालणाऱ्या विजेचा वापर करून पर्यावरणाचा समतोल राखणे.
  • छतावरील सोलर पॅनलद्वारे वीज निर्मिती सौर उर्जेला चालना देणे.
  • नैसर्गिक ऊर्जास्त्रोताचा उपयोग करून विजेवर होणारा खर्च कमी करणे .
  • सौर पॅनल विक्री करण्यासाठी अनुदान तसेच बँकेचे कर्ज उपलब्ध करून देणे.
  • PM सूर्य घर मुफ्त बिजली योजनेद्वारे रोजगार उपलब्ध करून देणे.
  • PM सूर्य घर मुफ्त बिजली योजेद्वारे अखंडित वीज पुरवठा करणे.

PM सूर्य घर: मोफत वीज योजना वैशिष्ट्ये 

  • देशातील एक कोटी कुटुंबांना या योजनेचा फायदा घेता येणार आहे.
  • घरगुती विजेमध्ये होणारा अपव्यय टाळून बचत करणे.
  • ३ किलोवॅट पर्यंत ४० % अनुदान तसेच १० किलोवॅट पर्यंत २०% अनुदान.
  • शिल्लक वीज हि वीज वितरक कंपनीला विक्री करता येते.त्यामुळे उत्पन्नामध्ये वाढ होते.
  • अखंडित वीज पुरवठा.
  • दर महिन्याला ३०० युनिट वीज मोफत मिळणार.

PM सूर्य घर: मोफत वीज योजना सुरुवात :

  • दिनांक : २२ जानेवारी २०२४.
PM सूर्य घर मुफ्त बिजली योजना २०२४.महाराष्ट्र राज्य

PM सूर्य घर: मोफत वीज योजनेंतर्गत मिळणारे लाभ किंवा अनुदान:

या योजनेंतर्गत अर्जदारास खालीलप्रमाणे लाभ किंवा अनुदान मिळणार आहे.

  • १ किलोवॅट = १८०००/- अनुदान.
  • २ किलोवॅट = ३६०००/- अनुदान.
  • ३ किलोवॅट = ५४०००/- अनुदान.
सोलर
सिस्टीम
क्षमता
अंदाजे
खर्च
[ रुपये ]
अनुदान
[ रुपये ]
प्रत्यक्ष
खर्च
[ रुपये ]
१ किलोवॅट ५२,०००/-१८,०००/-३४,०००/-
२ किलोवॅट १,०५,०००/-३६,०००/-६९,०००/-
३ किलोवॅट १,५७,०००/-५४,०००/-१,०३,०००/-

महाराष्ट्र सरकार योजना 2024 :

मोफत शिलाई मशीन योजना २०२४ महाराष्ट्र राज्य | Silai Machine Yojana Maharashtra 2024.

तार कुंपण योजना महाराष्ट्र राज्य २०२४| Sheti Tar Kumpan Yojana 2024.सरकार देणार शेती तार कुंपणासाठी ९०% अनुदान | पहा संपूर्ण माहिती.

पात्रता :

PM सूर्य घर मुफ्त बिजली योजनेसाठी लागणारी पात्रता खालीलप्रमाणे आहे :

  • PM सूर्य घर मुफ्त बिजली योजनेसाठी अर्जदार हा भारतीय नागरिक असला पहिजे.
  • अर्जदाराचे वय हे १८ वर्षे पूर्ण असावे.
  • अर्जदाराच्या कुटुंबामध्ये सरकारी नोकरदार नसावा.
  • या योजनेसाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व जातीतील नागरिक पात्र असतील.
  • अर्जदाराचे बँक खाते हे त्याच्या आधार कार्ड शी सलंग्न किंवा लिंक असावे.
  • अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे २.५ लाखापेक्षा जास्त नसावे.

PM सूर्य घर: मोफत वीज योजनेसाठीआवश्यक कागदपत्रे :

PM सूर्य घर मुफ्त बिजली योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे  –

  • आधार कार्ड 
  • रहिवाशी दाखला 
  • सहा महिन्यापर्यंतचे वीज बिल 
  • बँक पासबुक 
  • पासपोर्ट आकाराचा फोटो 
  • रेशन कार्ड 
  • उत्पन्नाचा दाखला
  • मोबाईल क्रमांक

PM सूर्य घर: मोफत वीज योजना ऑनलाईन अर्ज कसा करावा ?

PM सूर्य घर मुफ्त बिजली योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर खाली दिलेल्या प्रक्रियेचा अवलंब करून तुम्ही सहजरीत्या ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

PM सूर्य घर: मोफत वीज योजना
PM सूर्य घर: मोफत वीज योजना.

PM सूर्य घर: मोफत वीज योजना नोंदणी प्रक्रिया :

  • प्रथमता भारत सरकारच्या www.pmsuryaghar.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
  • तुम्हाला या योजनेची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असल्यास “QUICK LINK” या विभागामध्ये “SUBSIDY STRUCTURE ” या पर्यायावर क्लिक करा ,तेथे तुम्हाला या योजनेची संपूर्ण माहिती मिळून जाईल.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी “APPLY FOR ROOFTOP SOLAR ” या पर्यायावर क्लिक करा.
  • अर्ज करण्यासाठी तुम्हाला प्रथमता REGESTER प्रक्रिया पूर्ण करावी लागणार,त्यासाठी “REGESTER  HERE ” या पर्यायावर क्लिक करा.
  • तुमच्या समोर REGESTER फॉर्म समोर येईल ,त्यामध्ये तुमचे संपूर्ण नाव,पत्ता ,मोबाईल क्रमांक ,इत्यादी विचारलेली माहिती अचूकरीत्या भरून REGESTER [नोंदणी ] प्रक्रिया पूर्ण करा.

LOGIN प्रक्रिया :

  • REGESTER [नोंदणी ] प्रक्रिया पूर्ण झालेनंतर  “LOGIN HERE “या पर्यायावर क्लिक करा.
  • REGESTER [नोंदणी ]प्रक्रियेमध्ये दिलेला मोबाईल क्रमांक तसेच स्क्रीन वर दिसत असलेला CAPTCHA कोड भरा.अचूकरीत्या CAPTCHA  भरल्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक OTP येईल ,तो भरून तुम्ही LOGIN करू शकता.
  • “LOGIN “झाल्यानंतर “PROCEED ” पर्यायावर क्लिक करा.
  • तुमच्या समोर एक फॉर्म येईल त्या फॉर्म मध्ये विचारलेली माहिती तसेच आवश्यक कागदपत्रांची पूर्तता तसेच तुमच्या वीज वितरक कार्यालयाची माहिती योग्यरीत्या भरा.
  • SOLAR ROOFTOP DETAILS” मध्ये विचारलेली माहिती अचूकपणे भरा.
  • तिसऱ्या  पायरीमध्ये मागिल सहा महिन्यापर्यंतचे वीज बिलाची PDF फाईल अपलोड करा.
  • फाईल साईझ हि ५०० के बी पर्यंतची असावी.
  • फाईल यशस्वीपणे अपलोड झाल्यानंतर खाली उजव्या कोपऱ्यामध्ये  “FILE SUBMISSION” पर्यायावर क्लिक करा.
  • अशाप्रकारे संपूर्ण प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर तुमचा अर्ज भरला जाईल.

PM सूर्य घर: मोफत वीज योजना सतत विचारले जाणारे प्रश्न :

प्रश्न : PM सूर्य घर: मोफत वीज योजनेसाठी किती अनुदान मिळणार आहे ?

  • १ किलोवॅट = १८०००/- अनुदान.
  • २ किलोवॅट = ३६०००/- अनुदान.
  • ३ किलोवॅट = ५४०००/- अनुदान.

सतत विचारले जाणारे प्रश्न :

प्रश्न : PM सूर्य घर: मोफत वीज योजनेची अधिकृत वेबसाईट कोणती आहे?

उत्तर: www.pmsuryaghar.gov.in

प्रश्न : PM सूर्य घर: मोफत वीज योजनेचा लाभ किती लोकांना मिळणार आहे ?

उत्तर: या योजनेचा लाभ हा देशातील जवळपास १ कोटी कुटुंबांना मिळणार आहे.

प्रश्न : PM सूर्य घर: मोफत वीज योजनेसाठी कोण अर्ज करू शकतात ?

उत्तर: या योजनेसाठी देशातील सर्व नागरिक अर्ज करू शकतात.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *