संजय गांधी निराधार अनुदान योजना २०२४ महाराष्ट्र राज्य
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2024 Maharashtra|संजय गांधी निराधार अनुदान योजना २०२४: भारत सरकार नेहमीच आपल्या देशातील वृद्ध नागरिक त्याचबरोबर अपंग ,दारिद्र्य रेषेखालील नागरिक ,इत्यादी घटकांचा नेहमीच विचार करत असते .या सर्व घटकांचा विचार करत भारत सरकारने एक विशिष्ठ योजना जरी केली आहे .सामाजिक न्याय व विशेष सहय्य विभागाकडून संजय गांधी निराधार अनुदान योजना २०२४ हि योजना अंमलात आणली आहे .या योजनेचा मुख्य उद्देश असा आहे कि समाजातील दुर्बल आणि त्याचबरोबर निराधार व्यक्ती ,कर्करोग पिडीत,अपंग प्रवर्गातील सर्व अपंग ,अनाथ मुले ,एडस पिडीत त्याचबरोबर विधवा किंवा घटस्फोटीत विधवा ,अत्याचार किंवा वेश्या व्यवासायातून मुक्त केलेल्या महिला ,३५ वर्षापेक्षा जास्त वय झालेल्या महिला ,त्याचबरोबर ज्या नागरिकांना तुरुंगवास झालेला आहे व त्यांची पत्नी यांना घर चालवण्यासाठी आर्थिक मदत करणे हा आहे .
संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा उद्देश
समाजातील दुर्बल घटकांना आर्थिक मदत करणे .या योजनेचा मुख्य उद्देश असा आहे कि समाजातील दुर्बल आणि त्याचबरोबर निराधार व्यक्ती ,कर्करोग पिडीत,अपंग प्रवर्गातील सर्व अपंग ,अनाथ मुले ,एडस पिडीत त्याचबरोबर विधवा किंवा घटस्फोटीत विधवा ,अत्याचार किंवा वेश्या व्यवासायातून मुक्त केलेल्या महिला ,३५ वर्षापेक्षा जास्त वय झालेल्या महिला ,त्याचबरोबर ज्या नागरिकांना तुरुंगवास झालेला आहे व त्यांची पत्नी यांना घर चालवण्यासाठी आर्थिक मदत करणे हा आहे .या योजनेतून समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील लोकांना आर्थिक सहाय्य होऊन त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होते.त्यामुळे त्यांना समाजामध्ये इतर घटकांवर अवलंबून न राहता आत्मविश्वासाने जगता येते.
योजनेचे नाव | संजय गांधी निराधार अनुदान योजना २०२४ |
शासन/राज्य | महाराष्ट्र राज्य |
उद्देश | समाजातील दुर्बल घटकांना आर्थिक मदत करणे. |
लाभार्थी | समाजातील दुर्बल घटक ,निराधार व्यक्ती ,कर्करोग पिडीत,अपंग प्रवर्गातील सर्व अपंग ,अनाथ मुले ,एडस पिडीत,विधवा,वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला,३५ वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या महिला. |
लाभार्थी रक्कम | कुटुंबात एक लाभार्थी असल्यास महिन्यास ६०० रुपये आणि एकापेक्षा जास्त लाभार्थी असतील तर त्या कुटुंबास ९०० रुपये निधी |
अर्ज प्रक्रिया | ऑफलाईन/ऑनलाईन |
अधिकृत संकेतस्थळ | https://www.myscheme.gov.in/schemes/sgngs |
संजय गांधी निराधार अनुदान योजना २०२४ पात्रता
- अर्ज करण्यासाठी अर्जदार हा मुळ महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असला पाहिजे.
- अर्जदार हा दारिद्र्य रेषेखाली असला पाहिजे.
- जे नागरिकांचे वय वर्ष हे ६५ वर्षापेक्षा कमी आहे त्याचबरोबर जे अर्जदार गंभीर आजाराने त्रस्त आहेत असे नागरिक या योजनेसाठी पात्र असतील.
- जे अपंग अर्जदार आहेत त्याचे अपंगत्व हे किमान ४०% असायला हवे.
- अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे रुपये २१००० पेक्षा कमी असायला पाहिजे.
- या योजनेसाठी अनाथ मुले ,विधवा महिला ३५ वय वर्ष पूर्ण झालेल्या महिला इत्यादी पत्र असतील.
संजय गांधी निराधार अनुदान योजना २०२४ आवश्यक कागदपत्रे
- संजय गांधी निराधार योजनेचा विहित अर्ज.
- वयाचा दाखला : किमान १८ ते ६५ वर्षापर्यंतचा असावा [२४ वर्षाखालील लाभार्थ्याला त्याच्या पाल्यामार्फात लाभ दिला जाईल ]
- अर्जदार कमीतकमी १५ वर्षे महाराष्ट्राचा रहिवाशी असावा .[DOMACILE CERTIFICATE ]
- विधवा महिलाकडे पतीचा मृत्यू दाखला असणे आवश्यक.
- दिव्यांग व्यक्तीसाठी दिव्यांग दाखला आवश्यक.
- अनाथ अर्जदारासाठी अनाथ प्रमाणपत्र किंवा अनाथ दाखला.
- मोठ्या आजाराने पिडीत असल्यास दुर्धर प्रमाणपत्र.
- उत्पनाचा दाखला.
- आधार कार्ड.
- मतदान ओळखपत्र.
- रेशन कार्ड.
- बँक पासबुक झेरोक्स.
- अर्जदाराचे पासपोर्ट आकाराचे फोटो.
संजय गांधी निराधार अनुदान योजना २०२४काय लाभ मिळणार ?
संजय गांधी निराधार अनुदान योजना २०२४ या योजनेतून पात्र लाभार्थ्यास प्रत्येक कुटुंबात एक लाभार्थी असल्यास महिन्यास ६०० रुपये आणि एकापेक्षा जास्त लाभार्थी असतील तर त्या कुटुंबास ९०० रुपये निधी किंवा अनुदान थेट बँक खात्यामध्ये जमा होणार आहे .या अनुदानाचा उपयोग करून लाभार्थी आपली व आपल्या कुटुंबाची दैनंदिन गरज भागवू शकतो.
संजय गांधी निराधार अनुदान योजना २०२४ ऑनलाईन अर्ज कसा कराल ?
संजय गांधी निराधार अनुदान योजना २०२४ या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासठी खालील प्रक्रिया पूर्ण करा :
- सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर जा .तिथे होम पेज वर क्लिक करा.
- होम पेज वर आल्यानंतर तिथे “New user? Register here” या पर्यायावर क्लिक करा.
- नवीन पेज उघडल्यानंतर संजय गांधी निराधार अनुदान योजना २०२४ या पर्यायावर क्लिक करा.
- मागितलेली सर्व माहिती काळजीपूर्वक त्यामध्ये भर ,जर चुकीची माहिती भरली गेली तर तुमचा अर्ज बाद होऊ शकतो .
- संपूर्ण माहिती योग्यरीत्या भरल्यानंतर “Register” या पर्यायावर क्लिक करा.
- अश्याप्रकारे संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता , आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता.
संजय गांधी निराधार अनुदान योजना २०२४ ऑफलाईन अर्ज कसा कराल ?
संजय गांधी निराधार अनुदान योजना २०२४ ऑफलाईन अर्ज करण्यासठी आपल्या तालुक्यातील संबधित तलाठी किंवा तहसीलदार कार्यालयाला भेट द्या आणि सर्व कागदपत्रांची पूर्तता करा.यशस्वीरीत्या पूर्तता केल्यानंतर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.
संजय गांधी निराधार अनुदान योजना २०२४ अटी आणि शर्ती
- अर्जदार किमान १५ वर्षे महारष्ट्र राज्यचा रहिवाशी असावा.
- लाभार्थ्याच्या उत्पन्नासाहित त्याच्या कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न हे रुपये २१००० पेक्षा कमी असेल तरच अर्जदार हा या योजनेसाठी पत्र असेल.
- या योजनेसाठी अपत्य संख्येची अट राहणार नाही.
- अनाथ म्हणजे ज्याचे आई वडील मृत्युमुखी पडलेत तसेच अनाथ आश्रमामध्ये राहत असलेल्या अर्जदारांना अनाथ प्रमाणपत्र असणे आवश्यक राहील तरच त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
- अनाथ अर्जदार जर अज्ञान नसेल तर अर्जदार सज्ञान होईपर्यंत त्याच्या संबधित पालकाकडून त्याचा लाभ दिला जाईल.
- विधवा अर्जदारासाठी अर्जदाराकडे पतीचा मृत्यू दाखला प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र राज्य सरकारच्या योजना २०२४
FAQ’s
संजय गांधी निराधार योजना अनुदानसाठी आवश्यक कागदपत्रे ?
अर्जदार कमीतकमी १५ वर्षे महाराष्ट्राचा रहिवाशी असावा .[DOMACILE CERTIFICATE ]
विधवा महिलाकडे पतीचा मृत्यू दाखला असणे आवश्यक.
दिव्यांग व्यक्तीसाठी दिव्यांग दाखला आवश्यक.
अनाथ अर्जदारासाठी अनाथ प्रमाणपत्र किंवा अनाथ दाखला.
मोठ्या आजाराने पिडीत असल्यास दुर्धर प्रमाणपत्र.
उत्पनाचा दाखला.
आधार कार्ड.
मतदान ओळखपत्र.
रेशन कार्ड.
बँक पासबुक झेरोक्स.
अर्जदाराचे पासपोर्ट आकाराचे फोटो.