तार कुंपण योजना महाराष्ट्र राज्य २०२४| Sheti Tar Kumpan Yojana 2024.सरकार देणार शेती तार कुंपणासाठी ९०% अनुदान | पहा संपूर्ण माहिती.

marathiyojanainfo.com
8 Min Read
तार कुंपण योजना महाराष्ट्र राज्य २०२४| Sheti Tar Kumpan Yojana 2024.सरकार देणार शेती तार कुंपणासाठी ९०% अनुदान | पहा संपूर्ण माहिती.

तार कुंपण योजना महाराष्ट्र राज्य २०२४

 काय आहे तार कुंपण योजना :-

  केंद्र सरकार तसेच महाराष्ट्र सरकार नेहमीच देशातील तसेच राज्यातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी तत्पर असते. शेतकरी हा देशाचा पोशिंदा तसेच बळीराजा म्हणून ओळखला जातो.जर शेतकऱ्यांने धान्य पिकवले तरच देशातील जनतेला पोटभर अन्न मिळू शकते.म्हणूनच केंद्र सरकार नेहमीच शेतकरी तसेच शेती संरक्षित राहावी म्हणून नेहमीच प्रयत्नशील असते.म्हणूनच महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतंत्य महत्वपूर्ण योजना अंमलात आणली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचे सरंक्षण करण्यास अनुदान मिळणार आहे.“तार कुंपण योजना “असे या योजनचे नाव असून राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

“तार कुंपण योजना” हि प्रामुख्याने ज्या शेतकऱ्यांची जमीन तसेच पिक हे जंगली तसेच हिंस्र प्राणी यांच्यापासून असरक्षित आहे किंवा त्यांच्यापासून शेतजमीन तसेच शेतापिकला धोका निर्माण होतो त्यांच्यासाठी आहे.जेणेकरून शेतकरी या योजनेचा फायदा घेऊन त्यांची जमीन तसेच पिक संरक्षित ठेऊ शकतात.ज्या शेतकऱ्यांची जमीन हि वन्य परिसर किंवा वन खात्याच्या हद्दीपासून जवळच आहे अश्या शेतकऱ्यांना वन्य तसेच हिंस्र प्राणी यांचा धोका जास्त निर्माण होतो.पारंपारिक कुंपण  पद्धत हि जास्त काळ न टिकणारी असून त्यापासून जमिनीचे तसेच पिकाचे सरंक्षण हे थोड्याच कालावधीसाठी होत असे त्यामुळे शेतकऱ्याला वन्य तसेच हिंस्र प्राण्यापासून होणाऱ्या नाहक त्रासाला बळी पडावे लागत असे.शेतकऱ्यांना या आणि अश्याच त्रासातून मुक्त करण्यासाठी तसेच त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी “तार कुंपण योजना ” अंमलात आणली आहे. तर चला पाहू काय आहे योजना ? काय आहेत योजनेचे लाभ ? आवश्यक कागदपत्रे,पत्रता ,अटी आणि शर्थी. या आणि अश्याच योजनांच्या माहितीसाठी आमच्या अधिकृत संकेतस्थळाला तुमच्या बुकमार्क मध्ये सेव करा.

तार कुंपण योजना थोडक्यात :

योजनेचे नाव
तार कुंपण योजना
Sheti Tar Kumpan Yojana
कोणी सुरु केली महाराष्ट्र सरकार
शासन प्रकल्प डॉ.श्यामप्रसाद मुखर्जी
जन-वन विकास योजना
लाभार्थी राज्यातील शेतकरी
लाभ हेक्टर नुसार ४०% ते ९०%
अनुदान
अर्ज प्रक्रिया ऑफलाईन.
अर्ज करण्याचे ठिकाण तालुका पंचायत समिती.
तार कुंपण योजना महाराष्ट्र राज्य २०२४

तार कुंपण योजना मुख्य उद्देश :

  •  तार कुंपण योजनेचा मुख्य उद्देश हा राज्यातील शेतकऱ्यांच्या जमिनीचे तसेच पिकाचे वन्य तसेच हिंस्र प्राण्यांपासून होणारे नुकसान टाळने हा आहे.
  • शेतीचे तसेच शेतातील पिकाचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे.
  • जेव्हा शेतकरी आणि वन्य प्राणी यांच्यामध्ये संघर्ष होतो त्यावेळी शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन त्याच्या उत्पन्नामध्ये लक्षनिय घट होताना दिसून येते.हि होणारी लक्षनिय घट कमी करून शेतकऱ्याच्या उत्पन्न वाढीसाठी प्रोत्साहन देणे.
  • शेतकऱ्यांच्या जमिनीचे तसेच पिकाचे सरंक्षण करणे.

मोफत शिलाई मशीन योजना २०२४ महाराष्ट्र राज्य

तार कुंपण योजनेचे फायदे :

पिकांचे संरक्षण  :

  •  तार कुंपण योजनेमुळे भटक्या तसेच वन्य ,हिंस्र प्राण्यांपासून होणारे पिकाचे नुकसान टाळता  येते.
  •  पिकांचे संरक्षण करता येते.
  • पिकांचे संरक्षण योग्यरित्या झाल्यामुळे उत्पनामध्ये वाढ होते.

आर्थिक फायदे :

  • तार कुंपण योजनेमुळे शेतकऱ्यांना अनुदान स्वरुपात आर्थिक मदत प्रदान केली जाते.
  • या योजनेमुळे पिकांचे संरक्षण होऊन उत्पनामध्ये वाढ होते त्यामुळे शेतकऱ्याला आर्थिक फायदा मिळतो.

 शेतीची सुरक्षितता :

  • तार कुंपण योजनेमुळे शेतीचे होणारे नुकसान टाळता येते.
  • शेतीला मजबूत तारेचे कुंपण असल्यामुळे शेतीमध्ये होणाच्या चोरीच्या प्रकारांना आळा घालता येईल.

मजबूत बांधणी :

  • तार कुंपण योजनेतून मिळणाऱ्या अनुदानाचा वापर करून शेतकरी उच्च प्रतीचे साहित्य खरेदी करून कुंपणाची बांधणी मजबूत करून घेऊ शकतो.
  • मजबूत बांधणीमुळे वारंवार कुंपण बदलाव्या लागणाऱ्या त्रासापासून शेतकरी मुक्त होतो.
तार कुंपण योजना महाराष्ट्र राज्य २०२४| Sheti Tar Kumpan Yojana 2024.सरकार देणार शेती तार कुंपणासाठी ९०% अनुदान | पहा संपूर्ण माहिती.

source – Google Photos

तार कुंपण योजना पात्रता :

  • अर्जदार शेतकरी हा संबधित शेतजमिनीचा कायदेशीर मालक असावा किंवा अर्जदार शेतकरी हा भाडे तत्वावर शेती करणारा असावा.
  • सदरच्या जमिनीवर अर्जदार शेतकऱ्याचे अतिक्रमण नसावे.
  • सदरची जमीन हि वन्य प्राण्यांच्या नैसर्गिक भ्रमण मार्गात नसावी.
  • ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा घ्यायचा असल्यास सदरच्या जमिनीमध्ये वन्य प्राण्यांकडून हस्तक्षेप होऊन नुकसान होत असलेला ठराव जोडावा.
  •  शासनाकडून शेतकऱ्यांना ९०% अनुदान प्रदान केले जाणार आहे तरी उर्वरित १०% रक्कम हि अर्जदार शेतकऱ्याला स्वखर्चातून करावी लागणार आहे.

लाभाचे स्वरूप :

शेती अनुदान [%मध्ये ]
एक ते दोन हेक्टर ९०%
दोन ते तीन हेक्टर ६०%
तीन ते पाच हेक्टर ५०%
पाच हेक्टर पेक्षा जास्त४०% पर्यंत
तार कुंपण योजना अनुदान

तार कुंपण योजना आवश्यक कागदपत्रे :

  • अर्जदार शेतकऱ्याचे आधार कार्ड 
  • सदर जमिनीचा सात बारा उतारा 
  • सदर जमिनीचा आठ अ उतारा 
  • अर्जदार शेतकऱ्याचे जात प्रमाणपत्र 
  • ग्रामपंचायतीचा दाखला.
  • समितीचा ठराव प्रमाणपत्र 
  • संबंधित वन परीक्षेक अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र.
  • बँक खाते माहिती किंवा तपशील 

तार कुंपण योजना अर्ज कसा कराल : 

  • तार कुंपण योजनेचां लाभ घ्यायचा असल्यास अर्जदार हा जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या तालुका ठिकाणी असणाऱ्या पंचायत समितीमध्ये हा अर्ज करू शकतो.
  • तुम्ही ज्या तालुक्यामध्ये राहता त्या तालुक्याच्या पंचायत समितीमध्ये जाऊन या योजनेसाठी ऑफलाईन अर्ज सादर करावा लागेल.
  • हा अर्ज तुम्हाला तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या पंचायत समितीमध्ये सहजरीत्या मिळू शकतो.
  • अर्जाची मागणी करा आणि त्याबद्दल माहिती जाणून घ्या.
  • अर्ज भरण्यापूर्वी सर्व कागदपत्रांची तपासणी करा.
  • सर्व माहिती अचूकरित्या भरा.
  • अर्जावरील सर्व प्रश्नांची उत्तरे द्या.
  • अर्जासोबत विचारलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करा.
  • पंचायत समितीमधील संबधित अधिकाऱ्यांकडे या अर्जाची मागणी करून अर्जासोबत तुम्हाला आवश्यक व योग्य ती कागदपत्रे जोडून संबधित अधिकाऱ्यांकडे जमा करावा.
  • तुम्ही यशस्वीरीत्या अर्ज भरल्यानंतर संबधित व्यक्तीकडून त्याची पावती घ्या.

तार कुंपण योजना महाराष्ट्र राज्य २०२४| Sheti Tar Kumpan Yojana 2024.सरकार देणार शेती तार कुंपणासाठी ९०% अनुदान | पहा संपूर्ण माहिती.

महाराष्ट्र सरकार योजना २०२४ :

तार कुंपण योजना काय आहे ?

उत्तर:
शेती तसेच पिकाचे सरंक्षण करण्यासाठी सरकारकडून अंमलात आणलेली एक योजना आहे.

तार कुंपण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?

उत्तर:
अर्जदार शेतकऱ्याचे आधार कार्ड 
सदर जमिनीचा सात बारा उतारा 
सदर जमिनीचा आठ अ उतारा 
अर्जदार शेतकऱ्याचे जात प्रमाणपत्र 
ग्रामपंचायतीचा दाखला.
समितीचा ठराव प्रमाणपत्र 
संबंधित वन परीक्षेक अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र.
बँक खाते माहिती किंवा तपशील 

तार कुंपण योजनेचा उद्देश काय आहे ?

उत्तर :
वन्य तसेच हिंस्र प्राण्यांपासून शेती तसेच पिकांचे सरंक्षण करणे.

तार कुंपण योजनेसाठी अर्ज कुठे करावा?

उत्तर:
संबंधित तालुका पंचायत समितीमध्ये जाऊन तुम्ही हा अर्ज भरू शकता.

तार कुंपण योजनेसाठी कोणत्या राज्यातील लोक अर्ज करू शकतात ?

उत्तर:
महाराष्ट्र राज्य.

Share This Article
3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *