ट्रॅक्टर अनुदान योजना २०२४महाराष्ट्र राज्य
ट्रॅक्टर अनुदान योजना 2024|Tractor Anudan Yojana 2024 महाराष्ट्र राज्य: भारत देश हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो.भारतामध्ये बहुतांश नागरिक हे शेतकरी तसेच शेतीच्या कामांशी जोडले गेलेले आहेत.भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताची संपूर्ण अर्थव्यवस्था हि कृषी क्षेत्रावर अवलंबून होती,आणि आजही ग्रामीण भाग हा संपूर्ण शेतीवरती अवलंबून आहे.केंद्र सरकार नेहमीच देशातील शेतकऱ्यांचा विचार करून ,शेतकरी अजून प्रगतशील व्हावा म्हणून नवनवीन योजना अंमलात आणत असते.अशीच एक योजना देशातील प्रत्येक राज्यातील शेतकऱ्यांसाठी अंमलात आणली आहे.”ट्रॅक्टर अनुदान योजना” असे या योजनेचे नाव असून या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील शेतकरी घेऊ शकतो.या योजनेचा मुख्य हेतू हाच आहे कि देशातील शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देणे तसेच शेतीतील उर्जा वापराचे प्रमाण वाढवणे.जेणेकरून शेतीला मशागत करण्यास सोयीस्कर यंत्रणा मिळेल.या योजनेमधून प्रमुख्याने अल्पभूधारक शेतकरी,लहान शेतकरी,विशेष:त अनुसूचित समाजातील लोकांना प्राधान्य दिले जाणार आहे.तर चला पाहू काय आहेत या योजनेचे फायदे,काय आहेत आवश्यक कागदपत्रे? अर्ज कसा करायचा? अश्या आणि शेतीविषयक योजनांची माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईट ला आपल्या बुकमार्क मध्ये सेव करा. तर चला पाहू काय आहे योजना.
ट्रॅक्टर अनुदान योजना थोडक्यात :
योजनेचे नाव | ट्रॅक्टर अनुदान योजना २०२४महाराष्ट्र राज्य |
योजनेचा उद्देश | शेतकऱ्यांना आर्थिक साहाय्य करणे |
शासन/राज्य | महाराष्ट्र राज्य |
लाभार्थी | राज्यातील सर्व प्रवर्गातील शेतकरी |
लाभ | ५०% पर्यंत अनुदान |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन/ऑफलाईन |
अधिकृत संकेतस्थळ | http://mahadbt.maharashtra.gov.in |
ट्रॅक्टर अनुदान योजना उद्दिष्टे:
- ⦿ या योजनेचा मुख्य उद्देश हा राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी आधुनिक यंत्रसामुग्री उपलब्ध करून देणे त्याचबरोबर त्यांना त्या यंत्रसामग्रीसाठी ५० टक्क्यांपर्यंत अनुदान उपलब्ध करून देणे हा आहे.
- ⦿ राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे जेणेकरून शेतकरी आर्थिकदृष्ट्या बळकट होईल.
- ⦿ शेतकऱ्यांना अनुदान मंजूर करून आर्थिक मदत करणे.
- ⦿ योजनेंतर्गत शेतीमालामध्ये किंवा उत्पनामध्ये वाढ करणे.
- ⦿ आधुनिक यंत्रसामग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे.
- ⦿ शेतीकामामधील गती वाढवणे.
ट्रॅक्टर अनुदान योजनेची वैशिष्ट्ये
- ⦿ ट्रॅक्टर अनुदान योजने अंतर्गत राज्यातील सर्व शेतकरी अर्ज करून या योजनेचा फायदा घेऊ शकतात.
- ⦿ ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र राज्याच्या अधिकृत कृषी विभागाद्वारे सुरु करण्यात आलेली योजना आहे.
- ⦿ या योजनेतून राज्यातील शेतकऱ्यांना ६० ते ९० % पर्यंतचे अनुदान मिळणार आहे.
- ⦿ समाजातील सर्वच शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे.
- ⦿ ट्रॅक्टर अनुदान योजना केवळ ट्रॅक्टर साठी मर्यादित नसून,शेतकरी शेतीसाठी लागणारे इतर साहित्य हि या योजनेद्वारे मिळवू शकतात.
- ⦿ अर्ज प्रक्रिया हि ऑनलाईन/ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने करू शकतो.
- ⦿ निवड प्रक्रिया शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहू शकता.
ट्रॅक्टर अनुदान योजना अनुदान
ट्रॅक्टर प्रकार/अश्व शक्ती | अनुदान [टक्केवारीत] | अनुदान [रुपये] |
८ एच.पी ते २०एच.पी | ४० % | ७०,०००/- |
२० एच.पी ते ४० एच.पी | – | १,००,०००/- |
४० एच.पी ते ७० एच.पी | – | १,२५,०००/- |
शासनाच्या नवीन नियमानुसार मिळू शकते ५ लाखापर्यंतचे अनुदान.
ट्रॅक्टर अनुदान योजना फायदे
- ⦿ या योजनेतून राज्य सरकार शेतकऱ्यांना जवळपास ६० ते ९०% अनुदान देणार आहे त्यामुळे शेतकऱ्याची आर्थिक बचत होणार आहे.
- ⦿ शेतीमध्ये या योजनेतून मिळालेल्या अत्याधुनिक अवजारे तसेच ट्रॅक्टर यामुळे शेतामध्ये होणाऱ्या कामांना गती मिळणार आहे त्यामुळे शेतकऱ्याच्या उत्पादनामध्ये वाढ होणार आहे.
- ⦿ अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा वापर केल्यामुळे उत्पादनामध्ये वाढ होवून आर्थिक स्थर आणि जीवनशैलीमध्ये सुधारणा होते.
- ⦿ ट्रॅक्टर अनुदान योजनेमुळे शेतकऱ्यांची कामे जलद गतीने होतील त्यामुळे त्यांचा वेळ आणि श्रमामध्ये बचत होणार आहे.
- ⦿ ट्रॅक्टर अनुदान योजनेमधून मिळणाऱ्या अनुदानामुळे शेतकऱ्याला कर्जाची गरज भासत नाही त्यामुळे कर्जामुळे होणाऱ्या आत्महत्या हि थांबतील.
ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी पात्रता
- ⦿ अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवाशी असला पाहिजे.
- ⦿ अर्जदार हा लहान शेतकरी किंवा अल्पभूधारक शेतकरी असला पाहिजे.
- ⦿ अर्जदार शेतकऱ्याची स्वतःची जमीन असायला पाहिजे.
- ⦿ शेतकऱ्याचे आधार कार्ड असणे अनिवार्य.
- ⦿ शेतकऱ्याकडे ७/१२ आणि ८ अ असणे आवश्यक.
- ⦿ अर्जदार शेतकरी अनुसूचित जातीतील असल्यास दाखला असणे आवश्यक.
ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- ⦿ आधार कार्ड
- ⦿ रेशन कार्ड
- ⦿ रहिवाशी दाखला
- ⦿ ७/१२ उतारा
- ⦿ ८ अ दाखला
- ⦿ जातीचा दाखला
- ⦿ योजनेंतर्गत घेण्यात येणाऱ्या सामग्री चे कोटेशन
- ⦿ मोबाईल क्रमांक
- ⦿ ईमेल आयडी
- ⦿ पासपोर्ट आकाराचे फोटो
- ⦿ स्वयं घोषणापत्र
- ⦿ पूर्वसंमती पत्र
ट्रॅक्टर अनुदान योजना अर्ज प्रक्रिया
१. ऑफलाईन अर्ज प्रक्रिया –
२. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया –
ऑफलाईन अर्ज प्रक्रिया
- ⦿ ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करण्यासाठी प्रथम आपल्या जिल्ह्यातील जिल्हा कृषी कार्यालयामध्ये जावे लागेल.
- ⦿ कृषी कार्यालयामध्ये जावून ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी लागणारा फॉर्म संबधित अधिकाऱ्यांकडून मागणी करून घ्या.
- ⦿ संबधित अर्जामध्ये विचारलेली माहिती अचूक आणि योग्यरित्या भरा.
- उदा : नाव,रहिवाशी दाखला,मोबाईल क्रमांक,७/१२ उतारा, ८ अ दाखला,इत्यादी.
- ⦿ अर्जामध्ये मागणी केलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता अचूकरित्या करा आणि संबधित अर्ज अधिकाऱ्यांकडे जमा करा.
- ⦿ अर्ज अधिकाऱ्यांकडून तुमच्या अर्जाची छाननी केली जाईल आणि सुधारण्यास करण्यास सुचवण्यात येईल.
- ⦿ तुम्हाला सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्जाची रशीद प्राप्त होईल
- ⦿ अश्याप्रकारे तुमचा ऑफलाईन अर्ज भरून पूर्ण होईल.
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
- ⦿ ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी प्रथम आपल्याला शासनाच्या https://mahadbt.maharashtra.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर भेट दयावी लागेल.
- ⦿ महाडीबीटी या अधिकृत संकेतस्थळावर भेट दिल्यानंतर तुम्हाला तिथे नोंदणी करावी लागेल.
- ⦿ यशस्वी नोंदणी केल्यांनतर तुम्हाला नवीन खाते तयार करण्यासाठी ‘नवीन नोंदणी’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- ⦿ नाव,आधार कार्ड,पत्ता,ईमेल आयडी,मोबाईल क्रमांक योग्यरीत्या भरा.
- ⦿ अर्जदाराला मिळालेला ‘USERNAME’ आणि ‘PASSWORD’ टाकून लॉग इन करावे लागेल.
- ⦿ तुम्हाला आता ‘माझी योजना’ या पर्यायवर क्लिक केल्यानंतर ‘ट्रॅक्टर अनुदान योजना’ पर्यायावर क्लिक करा.
- ⦿ तुमच्या समोर आलेल्या अर्जामध्ये विचारलेल्या माहितीची पूर्तता योग्यरीत्या करा.
- उदा: वयक्तिक माहिती ,शेतीची माहिती,इत्यादी.
- ⦿ आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करा.
- ⦿ सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ‘सबमिट’ या पर्यायावर क्लिक करा.
- ⦿ तुमची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
ट्रॅक्टर अनुदान योजना निवड प्रक्रिया
- ⦿ निवडा झालेल्या अर्जांची लिस्ट शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल.
- ⦿ तुम्हाला निवड झालेली माहिती हि तुम्ही दिलेल्या मोबाईल क्रमांक तसेच ईमेल आयडीवर मिळेल.
या अजून काही योजनाच्या माहितीसाठी आमच्या अधिकृत संकेतस्थळाला सेव करा.
ट्रॅक्टर अनुदान योजना निवड प्रक्रिया?
उत्तर:
ऑनलाईन/ऑफलाईन.
.
ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी कोण अर्ज करू शकते?
उत्तर:
महाराष्ट्र राज्यातील सर्व समाजातील शेतकरी तसेच लहान,अल्पभूधारक शेतकरी.
.
ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी किती अनुदान आहे?
उत्तर:
या योजनेसाठी शेतकऱ्यास ६०% ते ९०% अनुदान मिळते.
.
ट्रॅक्टर अनुदान योजना निधी कसा मिळतो?
उत्तर:
निवड झालेल्या अर्जदाराच्या बँक खात्यामध्ये थेट अनुदान दिले जाते.
.
योजनेचे पैसे लवकर मिळावेत शेतकरी बांधवांना
नक्कीच मिळतील.महाराष्ट्र राज्य सरकार नेहमीच प्रयत्नशील असते.तुम्हाला काहीही अडचण आल्यास संपर्क साधा.
धन्यवाद